पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२२ लो० टिळकांचे केसरींतील लेख स्वातंत्र्याचा आहे. ही गोष्ट खरी आहे; युरोपियन लीक वेदांचे पठण करीत असतां जर त्यास आमच्यानें मनाई करवत नाहीं तर मराठ्यांस तरी का करावी हे म्हणणें प्रथमत: बरेच सयुक्तिक असते. परंतु या प्रश्नाचा विचार करते वेळीं हा वेदपठनाचा प्रश्न नाहीं. वेदोक्तसंस्कार करण्याचा प्रश्न आहे हें लक्षात ठेवलें पाहिजे. कोणाही युरोपियनाचे ब्राह्मणानीं वेदोक्त संस्कार केलेले नाहीत, व व्यक्तिस्वातंत्र्याचेच मत घेतले तर कोणाही ब्राह्मणास अशा प्रकारें मराठ्याचे वेदोक्त सस्कार करण्यास लावणे किंवा ती न करील तर त्याची जहागीर जप्त करणे हें अयेोग्यच नव्हे तर अन्यायाचे होईल. समाजामध्ये आज शैकडौं वर्षे ज्या रीतीभाती चालत आलेल्या आहेत वविशेषेकरून ज्या रीतीभातींचा धर्माशी संबंध आहे त्यांत फेरबद्दल करणें तो जुलमानें न करता खुषीने केला पाहिजे, हें तत्त्व सार्वभौम इग्रजसरकारने कबूल केलेले आहे;व याच तत्त्वास अनुसरून हिंदुस्थानातील माडलिक संस्थानिकांनॉर्हा आपलें वर्तन टेविलें पाहिजे. राजाला जो अधिकार आहे ती समाजाची घडी मोडून समाजात असंतोष उत्पन्न करण्याकरिता नव्हे; व या अधिकाराचा जर एखाद्या संस्थानिकाकडून दुरुपयोग होईल तर त्याची दाद घेणें सार्वभौम सरकारास भाग पडेल. संस्थानातील प्रजेमध्यें ज्ञातीज्ञातांतील तंटे संस्थानच्या अधिपतींच्या प्रोत्साहनाने अधिक विकोपास जाऊं नयेत अशाबद्दल खबरदारी घेणे हे इंग्रजसरकारचे कर्तव्य आहे. मराठेशाहींत किंवा ब्राह्मणी राज्यात जर असे प्रकार घडले असते तर राजा आणि प्रजा यांच्यामध्यें किंवा ज्ञातीज्ञातींमध्ये तंटे माजून अखेरीस दंगेधेोपे होण्यापर्यंतही मजल आली असती, हल्ली इंप्रजसरकारच्या अमलाखाली तशी गोष्ट होणे शक्य नाही; पण त्याबरोबरच असा बंदोबस्त आहे की, पूर्वापार धार्मिक वहिवाटींत कोणीही विनाकारण बळजबरी करून बिघाड करूं नये. या तत्त्वाप्रमाणे पाहिले असता असे दिसून येईल कीं, मराठे लोकाच्या घरी ब्राह्मण वेदोक्त कर्म करीत नाहीत म्हणून त्यांचीं इनार्म किंवा जहागिरी जप्त करण्याचा जो कित्येक ठिकाणीं धाक दाखविण्यात आला आहे तो अन्यायाचा व संस्थानास अपायकारक आहे. तसेंच ठिकठिकाणच्या देवळांतील, मठातील वगैरे पूजा अर्चा चालविण्याचे अधिकार किंवा केोणत्याही मराठी संस्थानिकाकडे धर्मकर्मे करण्याचे अधिकार ज्याजकडे आहेन ते वहिवाटीप्रमाणे हे अधिकार चालविण्यास जेोपर्यंत तयार आहेत तोंपर्यंत त्याचीं वतनें, किंवा जहागिरी काढून घेणे हेही जुलमाचे व अन्यायाचे आहे. फार लाब कशाला ? महाराष्ट्रात इंग्रज सरकारचे राज्य झाल्यावर गांवोगांव जें सटलमेट झाले तेव्हा देशपाडेपणाची किंवा जोशीपणाचीं वतनें होती तीं सदर वतनदारांची सरकारास जरूर नसताही त्याजकडे चालविण्यांत आलीं. धर्मसंबंधीं देणग्थांस व वतनास हाच न्याय लागू आहे. मराठे संस्थानिकास जर पुराणोक्त कर्मे करणार ब्राह्मण उपाध्ये नको असतील तर त्यास त्यांनीं बोलावू •ये; पण तेवढ्याकरितां सदर उपाध्ये जोपर्यंत वहिवाटीप्रमाणे कर्मे कर