पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२४ ली० टिळकांचे केसरींतील लेख. मनाला व्यामोह होऊन कर्तव्याची दिङ्मूढता आली असताना आणि अन्तःकरण अस्वस्थ झाले असतां धर्मबुद्धि जागृत ठेऊन कर्तव्याची योग्य दिशा दाखवणारा ग्रन्थ जगाच्या वाङ्मयात भगवद्गीता हाच एक होय, हे प्रतिपादन मी करणार आहे. गीतेचा अर्थ अनेक टीककारांनी आपल्या मताच्या पुष्टीकरणास योग्य असा केलेला आहे. त्याबद्दलची संगती आज लावावयाची नसून अर्वाचीन अध्ययनपद्धतीस अनुसरून गीता वाचल्यास जे चार विचार सुचतात त्याचे मला थोडेस दिग्दर्शन करावयाचे आहे. ग्रंथ कशासाठीं लिहिला, त्यातलें प्रमेय कोणते, फल काय, निरनिराळ्या भागांची संगति कशी आहे, आणि हा ग्रंथ लिहिण्यात कत्र्याचा हेतु काय, इत्यादि गोष्टी आजकालच्या अध्ययन पद्धतींत महत्त्वाच्या समजतात. ही पद्धति आजकालच्या इंग्रजी शिक्षणामुळे आलेली नव्हे; आमच्या मीमांसकास ही पूर्वीच ठाऊक होती आणि ग्रंथाची एकवाक्यता कशी करावयाची हें त्याना चागल्या त-हेने अवगत होतें. ** उपक्रमेोपसंहारौ अभ्यासो पूर्वता फलं । अर्थवादोपपत्तीच लिंगं तात्पर्य निर्णये ॥ ” या छेकावरून आमची ग्रन्थाध्ययनाची जुनी रीत ध्यानात येण्याजेोगी आहे. भारती युद्धाच्या वेळीं विषाद ग्रस्त झालेल्या अर्जुनास संदेह पडला कीं, लढाईत जयश्री प्राप्त होण्यास आपल्या आप्तावर हात टाकला पाहिजे व वडिलाचा उपमर्द केला पाहिजे, अथवा क्षत्रियधर्म सोडून देऊन युद्धापासून तरी पराङ्मुख झाले पाहिजे.साराश,दोन कर्तव्यापैकीं कोणतें तरी सोडून दिलें पाहिजे.तें कोणते सोडावें अथवा हीं दोन परस्परविरुद्ध कर्तव्यें कशीं पाळावी ह्याबद्दल भ्रात झाल्यामुळे त्याने श्रीकृष्णास यांतून तरण्याचा उपाय विचारला आहे. आप्ताच्या रक्ताने विटाळलेली राज्यश्री घेऊं कीं युद्ध सोडून वनात जाऊं,हा अर्जुनाचा प्रश्न होता. हा भगवद्गीतेचा उपक्रम झाला;आणि **नष्टो मोह: स्मृतिलैब्धा त्वत्प्रसादान्मयाऽच्युत । स्थितोस्मि गत संदेह्ः करिष्ये वचनं तव ॥ हा गीतचा उपसहार झाला. हे दोन बिंदु सांपडले, की गणित शास्राच्या नियमाप्रमाणे मधली सरळ रेपा काढण्यास प्रयास पडत नाहीं. अर्जुनास आपलें कर्तव्य कोणतें याबद्दल व्यामोह उत्पन्न झाला होता; तो व्यामेोह श्रीकृष्णानें गीर्तेतल्या उपदेशानें नाहीसा केला. कोणत्या मार्गानें जाणे ठीक, केोणत्या मार्गानें गेले असतां वाईट, याबद्दल व्यामोह आपणांलाही आयुष्यात अनेक वेळा होती; अणि अशा वेळी त्यांतून आपली निवृति व्हावयास भगवद्गीता हेंच उत्तम साधन होय. ह्या कार्याकार्यविचारणेचे निर्णायक नीतिशास्रांत (Ethics) सांपडतें, आण भगवद्गीतेत पूर्वीच्या हिंदूशास्त्रास धरून केलेले नीतिसंबंधाचे सिद्धात आहेत. सध्या देखील आपल्या कर्तव्याची दिशा खुटलेली आहे. कॅोणच्या गोष्टींत पुण्य आहे, कोणत्यांत पाप आहे, कोणती गोष्ट न्याय्य आहे व कोणती अन्यायाची आहे. याचा निर्णय करण्याचे काम नीतिशास्राचे आहे. वडिलाविषयीं पूज्यभाव ठेवण्याचे एक व क्षत्रिय म्हणून धर्मयुद्धापासून पराङ्मुख न होणें हें दुसरें, अशा या दोन कर्तव्यापैकी कोणतें करावें, या अर्जुनाच्या प्रश्नास जर