पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२० लो० टिळकांचे केसरींतील लेख पाहतां भेंसले कुळांतील गृह्यसंस्कार पुराणोक्तच होत असत असें दिसून येतें. आणि असें जर आहे तर श्रीशिवाजीमहाराजांच्या जातकुळीपेक्षां ज्यांची जातकुळी अधिक श्रेष्ठ नाहीं त्यांनीं वेदोक्ताचे खूळ माजवून लोकांच्या शांततेचा व हक्काचा विनाकारण भंग करावा, आणि सुशिक्षित संस्थानिकांनी हे प्रकार आपल्या संस्थानांत घडू द्यावे, किंबहुना त्यांस उतजन द्यावें हें आमच्या मतें अगदीं गैराशस्त होय. वेदोक्त मंत्रसंस्काराचे वेळीं म्हटल्यानें कोणत्याही जातीस अधिक श्रेष्ठपणा येतो किंवा संस्कार अधिक शास्राक्त होतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. कारण, ब्राह्मण जातींतदखील स्रियाचे संस्कार, व्रतै, पूजा वगैरे पुराणोक्तच होतात. पण तेवढ्याकरितां ब्राह्मणांच्या सर्व स्रिया शूद्रजातीच्या आहेत असें कोणी समजत नाहीं. सोळा संस्कारांत ज्या निरनिराळ्या क्रिया आहेत त्या चालविताना वेदोक्त मंत्र म्हणण्याची आवश्यकताच आहे असें नाहीं; व ब्राह्मण जातींतील संस्कार करते वेळीं जे वेदोक्त मंत्र म्हणतात त्याचाही विनियोग अथौवरून न करतां पुष्कळ वेळां शब्दसादृश्यावरूनच केलेला असतो. अशा विनियोगास विनियोग असे म्हणतात; व वैदिक मंत्राचे अशात-हेचे विनियोग केल्यामुळेच आज हजारों वर्षे वेदाचे रक्षण झालें. असा आमच्याकडील व पश्चिमेकडील विद्वानांचा सिद्धान्त झाला आहे. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत शास्त्ररीत्या सं*कार होणें हें जितकें अवश्य तितकेंच ते वैदिकमंत्रानें झाले पाहिजत हें अवश्य नाही; आणि वेदिकमंत्रानीं संस्कार झाले म्हणजे मराठे व ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तीही निर्मूल आहे. ब्राह्मण जातींतील स्रियास वेदोक्तमंत्र म्हणण्याचा अधिकार नसतांही त्या जातीनें ब्राह्मण आहेत; आणि मराठे लोकानीं वेदोक्त मंत्र म्हटले तरी ते मराठेच राहातील हे लक्षांत ठेविले पाहिजे. दुसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी कीं, मराठे लोकांस आपण खरे क्षत्रिय असें जर वाटत असेल तर आपलें क्षात्रतेज व्यक्त करण्यास वेदोक्त मंत्रानें श्रावणी करणे हा कांहीं खरा मार्ग नव्हे. ज्या लोकांच्या पूर्वजांनीं गेल्या शतकांत मुसलमानी राज्याची लाट भार्गे हटवून हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन केलें ते जातीनें अस्सल क्षत्रिय असात वा नसोत त्यांची योग्यता स्नानसध्या करून धर्म राखणा-या ब्राह्मणापेक्षां कोणत्याही रीतीनें कमी आहे असें आम्ही मानोत नाहीं. हें मत आज आम्ही नव्यान सांगतेंौ असें नाहीं. विश्वगुणदशौत कृशानूनें महाराष्ट्रांतील ब्राह्मणांस “ उपनयनविवाहौ उत्सवैकप्रधानैौ ” म्हणजे ते लग्न- मुंजी उत्सव म्हणून करतात, शास्रोक्त म्हणून करीत नाहीत, असा दोष दिला असता ** चमू नियमनेन वा जनपदाधिकारेण वा । द्विजव्रज उपव्रजन् प्रभुपदं महाराष्ट्रज: ॥ न वृत्तिमिह पालयेद्यदि धरासुराणां ततो । भवेद्यवनवष्टितं भुवनमतदब्राह्मणम् ॥ '’ असा विश्वावसूनॆ। त्याचा परिहार केला आहे; आणि हाच न्याय मराठे लोकांसही पूर्णपणें लागू आहे. त्यांच्या घरच्या क्रिया वेदोक्त झाल्यानें त्यांस विशेष महती प्राप्त होईल असें मानणें अगदीं चुकीचे आहे. * क्षताकिल त्रायत इत्युदग्रः ? क्षत्रस्य शब्दो भुव