पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठे आणि वेदोक्त कर्म. ३ १९ नाहीं व त्या पद्धतींत आपला मानभंग होऊन आपला ज्ञातिमूलक दर्जा व अधिकार कमी होतो असें मराठेवंशातील आधुनिक पुरुषास वाटावें हें आमचे मोठे दुर्भाग्य होय. आपल्या प्रातातील किंवा राष्ट्रांतील लोकांकडून धन्य म्हणवून घेण्यास हल्लींच्या * वेदोक्ता 'च्या खुळाखेरीज दुसरे हजारों मार्ग आहेत. परंतु ज्ञातिमूलक खोट्या अभिमानानें आणि अवदशेच्या फे-याने आम्हांस इतके ग्रासले आहे की, माझी मुंज लागताना अमुक मंत्र म्हटला नाही तर माझा व माझ्या देशाचा सर्वस्वी घात झाला असें मानण्यापर्यंत मजल येऊन ठेपली आहे. आपल्या थोर वाडवडिलानीं किंवा कुलप्रवर्तकानी स्थापलेली व मान्य केलेली व तेथपासून आतापर्यंत अव्याहत चालत आलेली परंपरा किंवा तत्काली निर्णित झालेली गोष्ट ही पुन: उकरून काढून निवळ वाद वाढविणे व त्यातच भूषण मानणें या पलीकडे आम्हास काही उद्योग राहिला नाही; व सुधारणा काय ती हीच आहे व मराठे ज्ञातीचे खरें हित यातच आहे असे उद्गार काही ठिकाणीं निघू लागले आहेत. पूर्वपरंपरा, इतिहास व निर्णय लक्षात आणता हे सर्व विचार अवनतीचे आणि अविचारीपणाचे आहेत असे कोणाच्याही सहज लक्षात येईल. श्रीशिवाजीमहाराजांच्या वेळच्या मराठे लोकाच्या हल्लींच्या वंशजानीं अशीं काय थोर कृत्यें केली आहत किंवा पुरावा मिळविला आहे कीं, त्यामुळे श्रीशिवाजीमहाराजास संतोषाने जे ज्ञातिधर्मासबंधी अधिकार देण्यात आले त्यापेक्षा अधिक अधिकार हल्लींच्या पुरुपास महाराष्ट्रीयानीं देण्यास कबूल व्हावे ? इल्लीचा मनु फिरला आहे आणि परधर्मी सार्वभौम छत्राखाली एवढेच चार करणें आमच्या हातात राहिले आहे, असल्या समजुतीवरच जर हो चळवळ चालली असेल तर त्याचा विचार निराळा केला पाहिजे; आजच्या लेखात परंपरा कशी आहे हे सांगून हल्ली ची चळवळ पूर्व निर्णयाशी किती विसंगत व विरुद्ध आहे एवढे दाखविले आहे. बाकीच्या गोष्टींचा विचार स्थलसंकाचास्तव पुढील खेपेवर टाकणें भाग आहे. “མིང་། ཅ་། ཅས། *मराठे आणि वेदोक्त कर्म नं. २ गेल्या खेपेस श्रीशिवाजी महाराजांच्या वेळीं या प्रश्नाचा कसा काय निकाल झाला याचे दिद्भर्शन केले आहे. महाराजास राज्याभिषेक वेदोक्तमंत्राने झाला व तदंगभूत व्रतबंधही तसाच करण्यात आला अशाबद्दल इतिहासात उल्लेख आहे; पण त्याच्या घरचे सर्व संस्कार वेदोक्त होत असत अशाबद्दल कोठेही पुरावा नाही. उलट सातारच्या महाराजांच्या घराण्यात जी परंपरा चालू आहे, व जी मध्यंतरीं विच्छिन्न झाली होती असे म्हणण्यास पुरावा नाही, तिजवरून

  • [केसरी- तारीख २९ अक्टोबर, १९०१ ].