पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठे आणि वेदोक्त कर्म. ३२१ नेषु रूढः ॥ ' अशी क्षत्रिय शब्दाची कालिदासानें व्याख्या केली आहे. परंतु हल्लींचा काल असा आला आहे कीं, क्षत्रियाने देखील क्षतास मलमपट्टी लावूनच आपलें कर्तव्य उरकले पाहिजे. अशा स्थितींत आपले संस्कार वेदोक्त करण्यास झटण्यापेक्षां खच्या क्षात्रधर्मीस उचित वर्तन ठेवणें हें खच्या क्षत्रियाचे किंबहुना ब्राह्मणाचेही कर्तव्य आहे, हें आम्ही सांगावयास नको. देशाला अनेक प्रकारची जी अनेक क्षते पडली आहेत ती भरून काढण्याची महाराष्ट्रातील मराठे व ब्राह्मण यांनीं ईर्षा बाळगिली पाहिजे, व परवा कर्नल सिलीसाहेबानी मराठ्यांस कोल्हापूर येथे जेो उपदश केला तोही अशाच प्रकारचा आहे. तिकड लक्ष न देता व श्रीशिवाजीमहाराजांच्या काली जो निर्णय झाला त्यासही न जुमानता काही उच्छृखल मराठे लेोकांनी नवीन खुळे काढावी आणि त्यास मराठे संस्थानिकानीं उत्तेजन द्यावें हें अत्यंत शोचनीय होय. यात देशहिताचा बिलकूल संबंध नसून उलट जातीतील सलोखा मात्र मोडला जाणार आहे. काही मराठे मंडळींनीं इट्टानें जरी वेदोक्त क्रिया केली तरी सामाजिक किवा राष्ट्रीयदृष्टया त्यापासून त्यास काही फायदा नाहीं. कारण, हल्लीं कित्येक युरोपियन लोकही जर वेदपठण करतात तर त्याप्रमाणेच वेदोक्त कर्म करणाच्या मराठ्याची स्थिति होईल. यात काहीं भूषण नाहीं, बहुमान नाही आणि देशकार्यही नाहीं. महाराष्ट्रात मराठे लोकास जी मान आहे तो त्याच्या वाडवडिलाच्या शैौर्यामुळे त्यास प्राप्त झालेला आहे व तशाप्रकारचे शौर्य, धाडस व देशाभिमान हे गुण जोपर्यंत त्याच्यामध्ये जागृत राहतील तेोपर्यंत त्याचा मान कधीही कमी व्हावयाचा नाही. वेदोक्त कर्म करणारे ब्राह्मण पाणी भरतात आणि पुराणोक्त कर्म करणारे मराठे राजपदाचा अनुभव घेतात हें जर आम्हीं डोळ्याने पाहात आहों, तर वेदोक्त मत्रानीच आपले संस्कार झाले पाहिजत असा मराठ्यानीं आग्रह धरणें चुकीचे नव्हे काय ? संस्काराच्या वेळीं वैदिक मंत्र म्हणणे हे आज हजारों वर्षे चालत आलल्या वहिवाटानें एका विशिष्ट जातींतील पुरुषाचे (स्रियाचे नव्हे) (४क्षण झाले आहे; परंतु जातीजातीस जो काहीं मान आहे ती या लक्षणावर नसून त्या त्या ज्ञातीत कार्यकर्ते पुरुष ज्या प्रमाणावर निपजतात त्या प्रमाणावर आहे ही गोष्ट इतिहासावरून सिद्ध होत आहे. असें असता केवळ अज्ञानाने किंवा मत्सरानें एका जातीोने दुस-या जातीच्या विशिष्ट लक्षणाचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा व त्यास शहाण्या माणसानी उत्तेजन द्यार्वे हें बरोबर नाही. परंतु कित्येकाचे असे म्हणणें पडल की, हल्लींचा मनु पालटलेला असल्यामुळे पाहिजे त्यास पाहिजे तें करण्याची मुभा आहे, मात्र धिनलकोडाप्रमाणे तो गुन्हा नसला म्हणजे झालें; आणि हें तत्त्व लक्षात आणले म्हणजे साहेब लोकांस जर वेद म्हणण्याची किंवा शिकण्याची मुभा आहे तर हिदुधमांतील ब्राह्मणांखेरीज इतर जातींस ती अवश्य असली पाहिजे. हृल्लीचा काल व्यक्ति Y о