पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ १८ लो० टिळकांचे केसरींतील लेख श्रीशिवाजीमहाराजाची सत्तेचाळिसावे वर्षी मुंज करण्यात येऊन त्यास शास्रोक्त रीतीने राज्याभिषेक केला व तेव्हापासून त्याच्या राजशकास सुरवात झाली, हो। गोष्ट इतिहासात नमूद आहे. हल्ली ज्या काही मराठे लोकानीं वेदोक्ताचे खूळ माजविले आहे ते आपल्यास शिवाजी महाराजापेक्षा ज्ञातीनें अधिक श्रेष्ठ समजत असतील असें आम्हांस वाटत नाही. तसेच त्याकाली भैंसलेकुलावर महाराष्ट्रांतील लोकांची जी श्रद्धा जडलेली होती व तेव्हा महाराष्ट्रातील सर्व आबालवृद्ध स्रीपुरुष हिंदुधर्माचे सरक्षण करणाच्या पुरुषास व्यवहाराने व शास्त्रानें ज्या काहीं सवलती देण्यासारख्या असतील त्या सर्व किंवा त्याहूनही काकणभर जास्त देण्यास जितक्या उत्सुकतेने, हौसेने आणि कृतज्ञताबुद्धीनें तयार होते तसा आता कोणाही मराठ्याचा अधिकार राहिलेला नाही. अशा वेळीं, अशा स्थितींत या प्रश्नाचा जो निकाल लागला आहे तो कांकणभर मराठ्याच्या बाजूचाच लागला असेल हें कोणासही आम्ही सांगावयास पाहिजे असें नाही. तो कालच असा होता कीं दुसरा निर्णय होणेंच अशक्य होतें; आणि अशा स्थितीत झालेला निर्णय आम्हांला कबूल नाही म्हणून भेोसल्याच्या कुळापेक्षां ज्याचे कूळ कर्तबगारीर्ने, ज्ञातीनें आणि मानाने कमी आहे अशा मराठे लोकांनीं आता तक्रार करावी अथवा उचल खावी हें व्यवहारास, शिष्टपरंपरेस अथवा ज्ञातिसंप्रदायपद्धतीस अगर न्यायास अनुसरून आहे असें आम्हांत वाटत नाहीं. श्रीशिवाजीमहाराजास महाराष्ट्रातील सर्व लोक केवळ शिवाचा अवतार समजून ईश्वराप्रमाणे वद्य मानीत होते आणि अद्यापहेि मानतात; व त्याच्याबद्दल जेो काहीं निर्णय झाला असेल तो गागाभट्ट किंवा त्यानीं पाचारण करून आलेले क्षेत्रोंक्षेत्रीचे शकडेो विद्वान् ब्राह्मण यानीं मनात कांही कुचर टेवून केला असेल असे म्हणणें अगदीं वेडेपणाचे आहे. हिंदुपातशहा राज्याभिषेक होऊन केव्हां नजरेस पडतो व त्याचा शक कसा चालू होतो इकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होतें. श्रीसमर्थ रामदास, चिंचवडचे देव वगैरे अनेक सत्पुरुषही त्यावेळी हजर होते. या सर्वोच्या सल्लयर्ने क्षत्रियास उचित अशा शास्रोक्त रीतीनें राज्याभिषेक व तदंगभूत व्रतबंध करून भेोसले घराण्यांत गृह्यकर्माबद्दल जी परंपरा तेव्हा लावून दिली गेली व जी सातारचे महाराज व कोल्हापुरचे महाराज याच्या घराण्यात अद्याप चालत आहे ती निर्मूल आणि अप्रमाण असे म्हणण्याचे साहस करून वेदोक्ताचे बंड माजविणारांनी काय पुरुषार्थ योजिला असेल कोण जाणे ! बरें, हे खूळ माजविणाराची योग्यता आणि आधिकार पाहूं गेले तर तेही श्रीशिवाजी महाराजाच्या अधिकारतेजापुढे खद्योतवत् देखील पासंगास लागावयाचे नाहीत. ज्या पुरुषार्ने आपल्या पराक्रमानें सर्व महाराष्ट्रातील लोकांत आपल्याबद्दल पूज्यबुद्धि उत्पन्न करून जगाच्या इतिहासांत आपलें नांव अजरामर करून ठेविले त्याला स्वत:च्या वंशांत किंवा स्वत:च्या कुलांत गृह्यकर्मे करण्याची जी पद्धत मान्य झाली व जी पद्धत तत्कालीन सर्व धर्मज्ञ ब्रह्मवृंदांनीही मोठ्या आनंदानें आणि कृतज्ञताबुद्धीनें कबूल केली ती बरोबर