पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ १० लो० टिळकांचे केसरीतील लेख भौतिक शास्राच्या बुडाशीं जी शक्ति आहे ती शब्दांनीं जरी अवर्णनीय असली किंवा तिच्या स्वरूपाचे आम्हांस यथार्थ शान होणे शक्य नसलें, अर्थात् ती जरी एकप्रकारे अज्ञेय असली, तरी तशा प्रकारची शाक्ति विद्यमान आहे एवढे निर्विवाद सिद्ध होतें असें स्पेन्सरसाहबांनीं सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे; व आमच्या तत्त्वज्ञांनी हाच गोष्ट लक्षांत आणून या शक्तीस * सत् ’ हा शब्द पहिल्यानें लाविला आहे. ब्रह्म सत् आहे अथवा तें आहे याबद्दल शंका नाही, त्याचे अस्तित्व निर्विवाद आहे किंघा त्याचे स्वरूपच आस्तत्वरूप आहे, अथवा जै आहे तें तेंच आहे, दुसरे कांहीं नाहीं ही गोष्ट वेदांतील सर्व ग्रंथांस कबूल आहे. व स्पेन्सरसाहेबानीं निरनिराळ्या शास्त्राच्या अवलोकनार्ने नव्या पद्धतीनें कोणती गोष्ट सिद्ध केली तर ती हाच होय कीं, आदिशाक्त अज्ञेय किंवा जाणण्यास अशक्य असली तरी ती सतू म्हणजे विद्यमान् आहे (The unknowable) येथवर वेदांतशास्राची व स्पेन्सरसाहेबांची पुरी एकवाक्यता आहे. ही शाक्त चिद्रप आहे असा आमचेकडील वेदांतशास्राचा दुसरा सिद्धान्त आहे व तो पाहल्याइतका सेपन्सरसाहेबांच्या ग्रंथांत स्पष्ट आला नसला तरी ज्याअर्थी जगांतील वस्तुमात्र आणि त्यांचे गुणधर्म हे या शक्तींचीच स्वरूपांतरें आहेत असें त्यांचे मत आहे त्या अर्थी ही शाक्त चिन्मय असावी ही गोष्ट त्यांस मान्य आहे असें स्पष्ट होतें. पण चित् किंवा चैतन्य याचा आमच्या वेदांतशास्रांतून जेो अर्थ धरलेला आहे तितका स्पेन्सरसाहेबांस आभप्रेत आहे किंवा नाहीं, हैं खात्रीनें सांगतां यावयाचे नाहीं. ब्रह्म आणि ज्ञान याचे तादात्म्यसंबंधार्नेही स्पेन्सरसाहेबाचे मत असावें तितकें स्पष्ट नाहीं. ज्ञय असेो कीं अज्ञेय असो, पण ज्ञानविषय आहे, ज्ञाता व ज्ञान तद्भिन्न आहे येथपर्यंतच त्यांची मजल गेलेली दिसते. * यत्र हि एकमेव भवति तत्केन कं पश्येत् ’ ही पूर्णाद्वैताची कल्पना अतःकरणात ठसल्याशिवाय ब्रह्म ज्ञानस्वरूपच आहे ही कल्पनाहि सुचावयाची नाहीं,ब्रह्मासंबंधानें चवथा शब्द वापरला तो ‘आनद' हा हीप पण त्याबद्दल स्पेन्सरसाहेबांच्या तत्त्वज्ञानांत मुळींच विचार केलेला दिसत नाहीं. आमचेकडेही ब्रह्म आनंदमय आहे किंवा आनंदस्वरूप आहे याबद्दल बरीच चर्चा व वादविवाद झालेले आहेत; व कित्येकांच्या मतें सत् आणि चित् ही दोनच पर्दे काय तीं जगाच्या आदिशक्तीस यथार्थत्वानें लागू आहेत. हे वाद इतके गहन आहेत कीं, त्याचा या ठिकाणीं नुसता निर्देश करण्यापलीकडे जास्त कांहीं लिहिता यावयाचे नाहीं. स्पेन्सरसाहेबांच्या ज्ञेयमीमासेस न्याय आणि सांख्य व अज्ञेयमीमांसेस वेदान्त हीं आमच्याकडील तोडीचीं शास्ने आहेत एवढेच प्रधानत्वेंकरून सांगण्याचा आमचा उद्देश आहे. वेदातामध्यें जीव, परब्रह्म आणि जडसृष्टि यांचे अन्योन्य संबंध कोणत्या प्रकारचे आहेत याचा विचार करून या तिहींचे ब्रह्मस्वरूपांत एकीकरण होण्याचे शक्य आहे कीं नाहीं व असल्यास तें कोणत्या प्रकारें होतें याचे जे सूक्ष्म विचार सिद्धांत आहेत ते कांहीं सर्व स्पेन्सरसाहेबांच्या तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांत उपलब्ध नाहीत. तथापि सर्वांचा