पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञेयाज्ञेयमीमांसा. ३ ०९ न्यायदर्शनकारांनाच केलला आहे. द्रव्य म्हणजे ज्यांस इग्रजींत मूलतत्त्र्वे म्हणतात तीं एकदां पृथक मानल्यावर मग त्यांचे गुण त्यांच्याहून भिन्न किंवा अभिन्न किंवा क्रिया हा त्यांचा गुण अथवा पृथक पदार्थ इत्यादि प्रश्नाचे विवेचन येथे करू गेल्यास फारच विस्तार होईल. प्रस्तुत लेखाचा उद्देश एवढेच सांगण्याचा आहे कीं, नैयायिकांनी ‘ पदार्थ ? म्हणून जे जगांतील वस्तुमात्राचे वर्ग कल्पिलेले आहेत त्यांचे आणि स्पेन्सरसाहेबांनी दाखविलेल्या निरनिराळ्या शास्त्रांतील सामान्य सिद्धान्ताचे ब-याच अंशीं सादृश्य आहे. नैयायिक हे कांहीं एकटेच अशा रीतीनें पदार्थमात्राचे वर्गीकरण करणारे आहेत असे नाहीं. “ गुणा गुणेषु वर्तन्ते ” म्हणजे एका गुणापासून दुसरा गुण, त्यापासून तिसरा अशी त्याच्यापासून परंपरा उत्पन्न करितां येते. या तत्त्वावर नैय्यायिकाचे सप्त पदार्थ टाकून देऊन त्याऐवजीं सांख्यशास्रांत प्रकृति आणि पुरुष हीं दोनच तत्त्वें अनादि मानिलेली आहेत; आणि त्यांचे इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनीं मानिलेल्या * मेंटर ? आणि * स्पिरिट ’ या दोन वर्गाशीं, बरेंच सादृश्य आहे. पुरुष उदासीन राहून सर्व गुणांचे अधिष्ठान जी प्रकृति तिच्या सान्निध्यानें अनेकविध भासतो, परंतु खरी तत्त्वं प्रकृति आणि पुरुष हीं दोनच आहेत असें सांख्याचे म्हणणें आहे. यांमध्ये आणि नैयायिकांच्या सप्तपदार्थामध्यें पुष्कळ भेद आहे हें सहज लक्षांत येईल. तो भेद येथे सांगत बसण्यास अवकाश नाहीं. तथापि, सामान्य दृष्टीनें पाहतां शेय गोष्टींचे नैयायिकांनीं सात तर सांख्यांनीं दोनच वर्ग केले असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. परंतु या दोन्ही शास्रांत ज्ञानाचे अद्याप पुरें एकीकरण झालेले नाहीं; व तशा प्रकारचे एकीकरण आमच्या पूर्वीच्या तत्त्वज्ञांनी केलेलें ज्यास पाहावयाचे असेल त्यानें वेदांतशास्राचा अभ्यास केला पाहिजे. परिमाणु, सप्तपदार्थ किंवा प्रकृति आणि पुरुष हीं न्यायाचीं व सांख्यांची तत्वें अनित्य असून खया जिज्ञासूनें यांच्याही बुडाशीं जाऊन ज्या एका महाशक्तीचे हे विकार आहेत तिचे ज्ञान किंवा ओळख करून घेतली पाहिजे असें वेदातशास्त्र सागर्ते. शंकराचार्याच्या भाष्यांत न्याय आणि वेदांत यांचे ठिकठिकाणीं जें खडण आलेलें आहे त्यांतील किरकोळ मुद्दे सोडून दिले तर बाकीचा भाग पदार्थाचे सप्तत्व किंवा प्रकृति आणि पुरुष हें द्वंद्व खरें नाहीं, * एकमेवाद्वितीयम् ? ब्रह्मच काय तें नित्य व सर्वोचे आदिकारण आहे असें सिद्ध करून दाखविण्यांत गेलेला आहे. एकपक्षीं न्याय आणि सांख्य आणि दुस-या पक्षीं वेदात यांच्यामधील विरोध ब-याच अंशीं स्पेन्सरसाहेबांनीं सांगितलेले अनेक शास्त्रांचे सिद्धांत आणि सर्वोच्या बुडाशी असलेलें आशेयतत्त्व यांच्यामधील विरोधासारखाच आहे. परंतु सर्वाच्या बुडाशी असलेल्या अज्ञेय तत्त्वासंबंधानें पाहिले तर स्पेन्सरसाहेबापेक्षांही आमचे तत्त्वज्ञ बरेच पुढे गेलेले आहेत. ब्रह्मासंबंधानें बोलतांना जुन्या संस्कृत ग्रंथांतून चार शब्द मुख्यतः ब्रह्माचे स्वरूपाचे वाचक म्हणून वापरलेले आढळतात. ते शब्द सत्, चित, ज्ञान आणि आनंद हे होत. सर्व सृष्टीच्या किंवा सर्व आधि