पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर यांच्या वेळची स्थिति. २९३ पुढारी होण्यास विद्वतेपेक्षां सदाचरण, धर्मनिष्ठा आणि स्वार्थत्याग याची अधिक जरूर लागत असते, ही या पिढीतील विद्वान् मंडळी अगदीच विसरली होती, असे म्हटल तरी चालेल. त्यांस असे वाटे कीं, आम्हीं नवीन विद्या संपादन केली, सरकारात आमचा मान झाला, तरी अद्याप आमचे लोक ऐकत नाहीत हे काय ? दुस-या पक्षी-आणि हा पक्ष अगदींच अडाणी होता असे नाही-लोकांस असें वाटे की, पाश्चिमात्य शिक्षणाचा थोडाबहुत लाभ झाल्यानें मनुष्य कांहीं सर्वज्ञ होतो असें नाही. त्यातून या नवीन पिढांचे अद्वातद्वा आचारविचार, आहार, मतें वगैरे लोकांच्या नेहमी नजरस पडत असल्यामुळे त्याच्याबद्दल लोकाची चांगली बुद्धि राहिलेली नव्हती. हजारों वर्षे चालत आलेली समाजव्यवस्था व रचना आपण चुटकीसरसी उडवून देऊं असें मानणारा किंवा म्हणणारा मनुष्य उपहासास पात्र झाल्यास त्याचा दोष लोकांकडे देणे चुकीचे होय. परंतु पाश्चिमात्य शिक्षणाच्या पहिल्या मदानें धुंद झालेल्या मंडळींच्या नजरेस ही विसंगतता आली नाही, व स्वदेशकल्याण करण्याची मोठी हांव धरून कोणी धर्माच्या तर व कोणी सामाजिक सुधारणेच्या मागे लागले. हिदु राष्ट्राचे इग्रजांच्या अमलापासून हित होत आहे की आहेत होत आहे,लोकांच्या उपजीविकेची साधनै उत्तरोत्तर कमी होत आहेत की वाढत आहेत, संघशक्तीनें काम करण्याची सवय त्यास लागण्याचा कितपत संभव आहे, मनुष्याच्या आगची बुद्धि,कर्तबगारी किंवा हुषारी दाखविण्यास नवीन राज्यव्यवस्थेत अवकाश आहे कीं नाहीं इत्यादि ज्या गोष्टींचा सन १८७५ नंतर महाराष्ट्रांत खल होऊँ लागला त्याजकडे तत्पूर्वीच्या दोन तीन पिढ्यानीं फारसें लक्ष दिलेलें दिसत नाहीं. याचा भर कायतो धार्मिक आणि सामाजिक सुधारणेवर होता. आणि या दोन्ही बाबतीत पुढारीपणा घेण्यास ज्या गुणाची आवश्यकता असते त्यांचा बहुतकाच्या आगी पूर्ण अभाव होता. परंतु ही नवीन शिकलेली मंडळी अधिकारारूढ असल्यामुळे समाजातील इतर लोकास याचे स्वेच्छाचार ऐकून किवा पाहूनच स्वस्थ बसावे लागे. समाजास यांचे आचार व विचार बिलकूल ग्राह्य नव्हते इतकेच नव्हे, तर समाजास केोणत्याही प्रकारचे व्यवस्थित रूप देण्यास ज पुढायाचे अांगी गुण पाहिजेत ते याच्यांत नाहीत अशी समाजाची खात्री झालेली होती. साराश, उतावळ्या नव-याप्रमाणें बाशिंग बाधून आपले व आपल्याबरोबर समाजाचेही आपण काढलेल्या नवीन संस्था व व्यवस्था याशी लग्न लावून देण्यास ही मंडळी जरी तयार झाली होती, तरी यांच्या अद्वातद्वा आचरणानें आणि अव्यवस्थित गृइस्थितीनें समाजाचा याच्यावर पूर्वी कांही विश्वास असल्यास तो अगदी उडून गेलेला होता, व याचे पुढारीपण याच्या परिवाराखेरीज समाजातील इतर लोक कबूल करण्यास तयार नव्हते.