पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९४ लो ० टिळकांचे केसरींतील लेख

  • कै० विष्णुशास्री चिपळूणकर.

कै. विष्णुशास्री चिपळूणकर यांच्या श्राद्धतिथीच्या दिवशीं रा. रा. टिळक यानीं लिहून वाचलेल्या निबधाचा उत्तरार्ध येणेंप्रमाणें: कै. विष्णुशास्री यांचा विद्याभ्यास संपून लेखक या नात्यानें त्यांच्या कारकीर्दीस सुरवात होण्याचे वेळीं मार्गे सागितल्याप्रमाणें महाराष्ट्रातील इंग्रजी शिकलेले विद्वान् व समाज यांची स्थिति होती. विष्णुशास्री यास सर्वच जुनीं मतें ग्राह्य नव्हतीं, किंवा जुनी समाजव्यवस्था नवीन परिस्थितींत तशीच कायम ठेवितां येईल असे वाटत नव्हतें हें खरें आहे, पण त्याबरोबरच त्यांच्या पूर्वीच्या इंग्रजी शिकलेल्या दोन तीन पिढ्यानीं सुधारणेच्या नांवावर जो हुतुतूचा खेळ सुरू केला होता तो अगदीं अप्रयोजक असून, इंग्रजी शिकलेल्या पुढारी म्हणविणारांच्या अगीं खरोखर पुढाच्यांत जे गुण असावयास पाहिजेत ते नाहीत, हेही त्याच्या लक्षांत येऊन चुकलें होतें. राजकत्यांच्या गुणापैकीं पुष्कळ गुण आम्ही घेण्यासारखे आहेत ही गोष्ट त्यांनी अनेक ठिकाणीं प्रांजलपणें कबूल केलेली आहे; पण पश्चिमात्य समाजरचना यूरोपांतील राष्ट्रांत चांगली चालत असली तरी ती आम्हांस तशीच श्रेयस्कर होईल असें पूर्वीच्या पिढीचे जें निःशंक मत होतें तें शास्रीबुवांस मान्य नव्हते. शिवाय कोणत्याही समाजास किंवा राष्ट्रास जें एकप्रकारचे वैशिष्टय येतें तें काहीं विशिष्ट समाजरचना, धर्मबंधनें वगैरे कारणांनीच आलेले असतें. तशा प्रकारचे राष्ट्राचे वैशिष्टय होता होईल तितके कायम ठेवणे हें पुढा-याचे कर्तव्य होय. पण तिकडे शास्रीबुवाच्या पूर्वीच्या पिढीतील पुढाच्यानीं कधींच लक्ष पुरावलें नव्हतें. फार लाब कशाला ? हिंदुधर्माचीं खरीं तत्त्वें काय आहेत, त्यांतील ग्रंथसमूह कोणत्या प्रकारचा आहे, त्यात धमीच्या उदात्त तत्त्वाचा विचार केलेला आहे कीं नाही वगैरे गोष्टीचाही पुरा शोध एकेश्वरीवाल्यानीं केलला नव्हता. सारांश, शास्रीबुवाच्या पूर्वीच्या पिढीतील लोकानीं ज्या ज्या चळवळी सुरू केल्या होत्या त्या सर्व केवळ नवीन पाश्चिमात्य शिक्षणास हुरळून जाऊन केलेल्या होत्या. पोक्तविचार, दृढ व सतत अभ्यास, सदाचरण, नीतिधैर्य, किंवा स्वार्थत्याग हे गुण या चळवळींच्या पुरस्कत्यांच्या आंगीं नजरेस येत नव्हते; उलट याचे वर्तन व आचार यात एक प्रकारची शिथिलता व आचरटपणा आढळून येत होता. जुनें नेवढे वाईट असा आपल्या पुढील पिढीचा समज करण्याचा प्रयत्न चालविला होता. आणि स्वत:च्या आचरणानें तरुण मंडळीस अव्यवास्थतपणाचा व नीतिदौर्बल्याचा हे कित्ता घालून देत होते. वृद्ध लोकाबद्दल अपूज्यभाव, अंगीकृत कार्य निश्चयार्ने पार पाडण्याविषयीं अनास्था, नीतिधैर्याचा किंवा आजन्म सतत व्यासंग करून कोणतीही गोष्ट स्वार्थाकडे लक्ष न

  • [केसरी-तारीख २ एप्रिल १९०१ ].