पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ लो० टिळकांचे केसरींतील लेख असें म्हणण्याचा परिपाठ आहे. पण यांतील खरें बीज काय हें पाहिले असतां मी सांगितलेल्या गोष्टींकडेच वळवै लागेल. आपण अशी कल्पना करूं कीं, कोणत्या एखाद्या नवीन राष्ट्रातील लोकांस आमच्या संस्कृतांतील न्याय, गणित आणि काव्यें एवढ्याचेच शिक्षण दिले व वेदात किंवा धर्मशास्त्र वगैरे विषयांवरील ग्रथ त्यांच्या नजरसही पडू दिले नाहीत, तर अशा प्रकारच्या शाळेत तयार झालेल्या विद्याथ्यांच्या मनाची स्थिति काय होईल ? इंग्रजी शिक्षणाची गोष्ट अशाच प्रकारची आहे. त्यातून पेशवाईच्या अखेर आमच्या समाजास एकप्रकारची शिथिलता येऊन त्यांच दुर्गुणाचा बराच प्रसार झालेला होता. ही स्थिति आणि त्यांवर दृष्टोत्पत्तीस येणारी नवीन राज्यकत्यांची व्यवस्था व टापटीप यानीं चांगले लोकही दिपावून जाण्याचा संभव होता. मग ज्याचे शिक्षण वर सागितल्याप्रमाणें अगदीं एक अंगी होते. त्याची गोष्ट तर बोलावयास नकोच. आमच्या समाजात अमुक उणे आहे, तमुक उणें आहे हेच काय ते रात्रंदिवस त्याचे विचार चालावयाचे. त्यांतून मिशनरी लोकांनीही हिंदुधर्म व समाजव्यवस्था यांजवर हल्ला करण्यास सुरवात केलेली होती. पहिल्या पहिल्या काही विद्वानानीं या मिशनरी लोकांस उत्तरें देण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे, पण नुसत्या तार्किकवादाने मिशनरी लोकांशीं भांडून आमच्या समाजाचे व्हावे तसें रक्षण होत नाही ही गोष्ट त्या वेळच्या पुढायास अगदींच कळली नव्हती असे नाही. परंतु त्यांनी त्यासाठी जे उपाय योजले ते मात्र उपहासास्पद होते. खिस्तीधमीचा प्रतिकार करावयाचा असल्यास तो त्याच धर्मातील बाह्योपांगे घेऊन त्यास एकेश्वरी किवा प्रार्थनासमाज असे नाव देऊन नवीन पंथ काढल्यानें होईल हीच कायती त्या वेळच्या पुढाच्याची प्रमुख कल्पना होती, व ही कल्पना तडीस नेण्यास आपण योग्य व लायख आहाँ असेही त्यांस वाटत असे. परंतु लौकिक दृष्टया आणि तात्त्विक दृष्टयाही हा समज चुकीचा होता. नवीन धर्मपंथ स्थापणाराच्या अंगी कोणत्या प्रकारचे गुण असावे लागतात याची इंग्रजी शिकलेल्या पहिल्या दोन पिढीच्या लोकांस बिलकुल कल्पना नव्हती. इंग्रजी दहापाच बुकीचे अध्ययन झालें, मोठी नोकरी मिळाली किंवा अधिकार प्राप्त झाला म्हणजे तो मनुष्य सामाजिक किंवा धार्मिक बाबतीत पुढाकार घेण्यास नेहमीच योग्य असतो असें नाहीं; हें तत्त्व आमच्या मडळीस पहिल्या कित्येक वर्षे बिलकूल समजलें नव्हते. त्यामुळे असा परिणाम झाला की इंग्रजी शिकलेल्या पहिल्या दोन पिढींतील मडळी समाजास ज्या दिशेन ओढण्याचा प्रयत्न करूं लागली त्याच्या उलट समाजाची प्रतिक्रियाच सुरू होऊन दोघाचा बेबनाव सुरू झाला. कोणत्याही समाजाचा ज्यास पुढाकार घ्यावयाचा असेल, त्यानें आपल्या एकनिष्ठपणाने, नितिमतेनें, स्वार्थत्यागानें व समाजाबद्दलच्या खया कळकळीनें समाजाचा विश्वास पहिल्यानें संपादन केला पाहिजे. पण हे गुण वर सागितलेल्या इंग्रजी शिकलेल्या नव्या पिढीतील लोकांचे अॉगांत दिसून येत नव्हते. यांच्यापैकी काहीं मंडळी विद्वान् होती खरी, पण समाजाचे