पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० लो० टिळकांचे केसरींतील लेख त्या वेळीं जो मान होत असे तो होय. राज्यकारभाराच्या नवीन पद्धतीस इंग्रजी जाणणाच्या माणसांची त्यावेळीं जरूर होती. यामुळे या अध्यकच्या विद्वानांस मोठ्या नोकच्या मिळून अधिकारामुळे त्यास समाजांत एक प्रकारचा मोठेपणा प्राप्त झाला. तात्पर्य, अव्वल पेशवाईत कुलशील, पराक्रम, सदाचरण, संपत्ति वगैरे गुणानीं ज्यांच्या पूर्वजानीं लेोकनायकत्व सपादन केले होतें त्याचे वंशज लवकरच भिकेस लागून त्याचे स्थान समाजाच्या खालच्या वर्गातील अर्धवट इंग्रजी शिकलेल्या या मंडळीस प्राप्त झाले. राज्यक्रातीमुळे समाजाच्या पुढायांत ही जी क्राती झाली ती सामाजिकदृष्टया फार महत्त्वाची आहे. सन १८३७पासून सन १८७४ पर्यंत म्हणजे सुमारें ३७ वर्षात या नवीन पुढाच्याच्या दोन किंवा तीन पिढ्या महाराष्ट्रात झाल्या असे दिसून येते. अगदी पहिली पिढी म्हणजे कै. गोपाळराव देशमुख याच्या समकालीन किंवा पूर्वीच्या मंडळीची होय. त्यानंतरची पिढी म्हणजे कै. कृष्णशास्री चिपळूणकर व केरूंनाना छत्रे याच्या वेळच्या मंडळीची. आणि तिसरी पिढी कै. कुंटे व रानडे याच्या वेळची होय. कुंटे व रानडे या दोघाचाही अभ्यास पुण्यास झाला नव्हता; तथापि त्यानी आपल्या आयुष्याची बरीच वर्षे येथे घालविलीं असल्यामुळे तत्कालीन पिढीचा उल्लेख त्याच्याच नावानें केला आहे. या तिन्ही पिढ्यापूर्वी विश्रामबाग पाठशाळेतील कै. मोरशास्री साठे, त्र्यंबकशास्री शाळिग्राम वगैरे मंडळीकडे पुण्यांतील समाजाचे कांहीं वर्षे पुढारीपण होतें. पण ही मंडळी इंग्रजी शिकली नसल्यामुळे त्यांच्या कालाचा सध्या विचार करण्याची जरूरी नाहीं. बर ज्या तीन पिढया सागितल्या आहेत त्याच्याचसबंधाचा विचार कर्तव्य आहे. पण तत्पूर्वी एवढे सांगितले पाहिजे कीं, त्यासंबंधानें मी जें काहीं सागणार आहे तें कोणाही विशेष व्यक्तीसबंधानें नसून त्या त्या पिढीचे सामान्य वर्णन आहे. वर सागितलेल्या तीन पिढयापैकीं पहिल्या पिढीतील लोकांस शाळेमध्ये जीं दहा पाच इंग्रजी पुस्तकें शिकवीत असत त्यापलीकडे विद्येचा विशेषसा संस्कार झाल्याचे आढळून येत नाही. त्याच्यापैकीं कै. गोपाळराव हरी यांनींच काय तो थेोडाबहुत विद्याव्यासंग शेवटपर्यंत कायम ठेविला होता. पण बाकी बहुतेक चुटपुटत्या ज्ञानाचेच अधिकारी होते. इंग्रजी राज्यांत या मंडळीस नवीन मिळालेल्या आधिकारानें हे बेपवी झालेले होते हें वर सागितलेंच आहे. पण याखेरीज यांच्या अद्वातद्वा विचार-आचाराचा समाजावर व विशेषेकरून पुढारी कुटुंबांच्या गृहस्थितीवर फारच वाईट परिणाम झालेला होता. सौम्य पण शिस्तवार,गृहशिक्षणाचा व गृहस्थितीचा लहानपणी मुलांच्या मनावर किती परिणाम होत असतो हें मी येथे सांगावयास पाहिजे असें नाहीं. किबहुना ज्या देशांतील पुढारी कुटुंबांची गृहव्यवस्था बिघडलेली असते त्यात चांगले पुरुष निपजणें कठीण आहे असें म्हटले तरी चालेल. अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे इंग्रजीशिक्षणपद्धतीचा आमच्या समाजावर पहिला वाईट परिणाम म्हटला म्हणजे त्यामुळे झालेली आमच्या