पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या वेळची स्थिति. २८९ हरएक समाजांत समाजाचे आधारस्तंभ म्हणजे त्यातील विद्वान्, विचारी आणि संभावित गृहस्थ होत. कोणत्याही समाजांत पुढारीपणा प्राप्त होण्यास विद्वतेची नेहमीच अपेक्षा असते असें नाहीं. मानमान्यता, संपति, चांगलें कुलवर्तन, आणि साधारण समजूतदारपणा व व्यवहारचातुर्य इतके गुण कोणाच्या अंगी असले म्हणजे तो आगीं हिंमत असल्यास आपापल्या वर्गात पुढारीपणा घेऊं शकते. पुणे शहरात ब्राह्मणी राज्य असल्यामुळे अशा प्रकारचे पुरुष पेशवाई अखेर प्राय: जुन्या सरदारमंडळींतच दृष्टीस पडत असत, व काही वर्षपर्यंत नव्या सरकारनेंही त्यांचा तशा प्रकारें बोज ठेविला होता. पण पुढ लवकरच या पुढायांचीं नखं व दात काढून घेतल्याने * पिंजयामध्यें वाघ सापडे, बायकामुले मारिती खड ’ अशी त्याची स्थिति झाली. नवीन राज्यपद्धतींत या जुन्या सरदारमंडळीस देण्यासारखे काही काम नव्हतें अस नाही; पण ** यथा राजा तथा प्रजा' या न्यायानें नवीन तच्हेच्या इंग्रजी शिक्षणार्ने तयार झालेली मंडळीच हातीं धरणें राज्यकत्यास अधिक सोईस्कर वाटून ती तयार करण्याचे कारखाने ऊर्फ शाळा काढण्यास त्यानी सुरवात केली. इग्रजी राज्यापासून आम्हास जे पुष्कळ लाभ झाले आहेत त्यांतच शिक्षणाची गणना प्रमुखत्वाने करण्याचा प्रघात आहे. पण जरा विचार केला असता आपणास असे आढळून येईल की, हें पाश्चिमात्य शिक्षण अगदी एक आगी असून त्या शिक्षणाचा परिणामही तसाच झाला. धर्म व नीति याच्याबद्दल इग्रजी धर्तीवर काढलेल्या शाळातून चकार शब्दही काढावयाचा नाहीं अशी धर्मेदासोन्याची आमच्या सरकारने शपथ घेतल्यामुळे पहिल्यासूनच रीत पडली होती. यामुळे इंग्रजी शाळातून पहिल्यापहिल्यानें जी मंडळी बाहेर पडली त्याच्या मनाची स्थिति एक प्रकारै फारच भयंकर किंवा शोचनीय झालेली होती. स्वधर्माचे किंवा त्यांतील नीतितत्त्वांचे शिक्षण बिलकूल नाहीं आणि परधर्मीचेही नाहीं; समाजाच्या परंपरागत बंधनाबद्दल आदर असावयाचा तोही नाहींसा झालेला, आणि दोन चार बुकं झाल्याबरोबर बच्याच मोठ्या पगाराची जागा त्यावेळीं मिळत असल्यानें अधि कारमदाचाही बराच अमल याच्या मनावर बसलेला होता. युरोपातीलकिंवा विलायतेंतील शाळातून अशाच त-हेचे शिक्षण मिळतें; पण स्वदेशप्रीति, स्वधर्मनिष्ठा, समाजाबद्दल आदर व प्रेम, सदाचरणाची गोडी वगैरे चांचल्य दोष घालविणाया अनेक गुणाच्या साहाय्यानें ते शिक्षण मनुष्यास बेहोष करीत नाहीं. आमच्याकडे या सर्व बंधनाचा अभाव असल्यामुळे त्याच शिक्षणापासून स्वल्पज्ञानानें संतुष्ट, बेपवी, स्वहितापलीकडे लक्ष न देणारे आणि स्वतःसच विद्वान् मानून इतर सर्व प्राचीन मताचा उपहास करणारे असे नवे म्हेरपे या कारखान्यातून प्रथमत: तयार झाले. परंतु याहीपेक्षां विशेष दुर्दैवाची गोष्ट म्हटली म्हणजे या लोकाचा सरकारातून ३६