पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर यांच्या वेळची स्थिति. २९१ पुढायांच्या मनाची अव्यवस्थित वृति आणि सदर वृत्तीच्यायोगें बिघडलेली गृहव्यवस्था हा होय. पहिल्था पिढींतील लोकांस लहानपणीं तरी एकप्रकारचे जुन्या तन्हेचे गृहशिक्षण मिळालेले होतें. पण दुस-या व तिसच्या पिढींत त्याचाही लोप झालेला होता. या दुस-या पिढीतील एका गृहस्थाचे व माझे काही वर्षीपूर्वी भीषण झाले होतें, तेव्हा त्यानें मला असा प्रश्न विचारला होता कीं, “ कां हो, आम्ही आतां खानसंध्या करीत नाहीं खरे, पण आमच्या लहानपणीं आम्हांस काँहीं एक प्रकारचा जुना आळा असल्यामुळे आम्ही त्यावेळीं मेहनत करून आज कांहीं तरी उदयास आले. पण आमच्या मुलानीं एव्हांपासून सर्व निबंध सोडून दिले तर त्यांची पुढ वाट काय होणार ?’ हा प्रश्न मोठा मार्मिक होता. परंतु गृहशिक्षणाचे व गृह्व्यवस्थेचे नुसतें महत्त्व कळून उपयेोग काय ? ज्या वेळीं ही गोष्ट त्या गृहस्थास कळली तेव्हां तो बहुतेक उतारवयांत आला होता व पुढे लवकरच त्याचा अंत झाला. कै. कृष्णशास्री चिपळूणकर यांनी मृत्युसमयी काढलेले उद्गार विष्णुशास्री याच्या चरित्रांत दिलेलेच आहेत. या बृहस्पतितुल्य विद्वानाच्या बुद्धिमतबद्दल कोणाचाही पूज्यभाव असणें स्वाभाविक आहे; पण खाजगी वर्तनाच्या दृष्टीनें पाहतां यांजबद्दल तीच बुद्धि कोणाही नि:पक्षपाती मनुष्याच्या अंत:करणांत उद्भवल असें मला वाटत नाही. इतर विद्वानाची स्थिति बहुतेक अशाच प्रकारची होती. मद्यपान, वेश्यागमन, वगैरे दुर्गुण बहुतेक संभावित गणले जात असत व मला तर असे आठवतें आहे की, त्या वेळच्या खाजगी शाळेच्या एक मास्तरास सकाळची शाळा असतां शाळेतील विद्यार्थी त्याच्या आगवस्राच्या घरातून कित्येकदां बोलावून आणत असत ! अशा प्रकारच्या बिघडलेल्या वातावरणात धर्मनिष्ठा, नीतिधैर्य किंवा सदाचरण याचे बीजारोपण नवीन पिढीच्या मनात कितपत होणें शक्य आहे याचा विचार करण्याचे काम मी आपणाकडेसच सॉपवितेा. मुंबईत एका प्रसिद्ध पुढायाचे व माझें सुमारें वीस वर्षापूर्वी या विषयावर बोलणें झाले होतें तेव्हां त्यानीं जे शब्द उच्चारले त्याची अद्याप मला आठवण आहे. ते #Tsá ái, “They have made vice fashionable in Poona ’’ assus खरोखरच त्या वेळची पुण्याची स्थिति तशी होती. विद्या, नीतिमत्ता, धर्मनिष्ठा, व्यवस्थित आचरण आणि गृहस्थिती यांचा एकमेकांशीं जो नित्य सबध असावा लागतो, व जो असल्याखेरीज राष्ट्रातील विद्वान् लोक पुढारीपणा घेऊन जेोरानें राष्ट्राचा उत्कर्ष करण्यास पात्र होत नाहीत, तो संबंधच इंग्रजी शिक्षणार्ने पहिल्यानें तोडून टाकला, ही मोठ्या दु:खाची गोष्ट होय. नीतिदृष्टया याचा काय परिणाम झाला हें वर सांगितलेंच आहे, पण त्याखेरीज इतर बाबतीतही अशा प्रकारच्या एकपक्षी शिक्षणापासून दुसरे अनेक वाईट पारणाम झाले. पाश्वमात्य इंग्रजी विद्येने दिपून जाऊन पहिल्या पिढीचे डोळे फिरले आणि आपल्या देशांतील सर्व कांहीं गोष्टी त्यास वाईट दिसू लागल्या