पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rく9 लो० टिळकांचे केसरींतील लेख असें वाटत असल्यास दुसरीच दिशा पसंत पडते. माधवरावजींच्या आंगचा पहिला गुण हा होय कीं, सर्व बाजूनीं राष्ट्राची उन्नति झाली पाहिजे असे त्यांस वाटत होतें. व या सर्व दिशांचे व बाजूंचे सांगोपांग परीक्षण करून त्यांच्या योग्यायोग्यतबद्दल निर्णय करण्याइतकी परमेश्वरानें त्यांस प्रगल्भ व व्यापक बुद्धि दिली होती. धर्मव्यवस्था, समाजसुधारणा, उद्योगधंदे, शिक्षण, राजकीय व्यवस्था वगैरे सर्व बाबतीत आम्ही मार्गे आहों व या सर्व गोष्टींत सुधारणा झाल्याखेरीज इतर सुधारलेल्या राष्ट्राची आपणांस बरोबरी करतां यावयाची नाहीं असा त्यांचा पक्का ग्रह झालेला होता. यांपैकी कांहीं बाबतीत त्यांची मर्ते पुढे ज्या नवीन चळवळी निघाल्या त्यामुळे सर्व लोकांस पसंत पडेनाशीं झालीं होतीं. पण तेवढ्याने त्याची योग्यता कमी होते असें नाहीं. घाटांतून एकदां एक कुशल इंजिनीयरानें आगगाडीची लाइन मारल्यानेतर त्यांत सुधारणा करणारे जरी पुष्कळ लोक निघाले तरी ज्याप्रमाणें मूळ इंजिनीयरच्या कल्पकपणास कमीपणा येत नाही, तद्वतच रावसाहेब रानडे यांची स्थिति होय. वर सांगितल्याप्रमाणें सर्व प्रकारें थंड झालेल्या देशाच्या प्रत्येक गात्रास कसें सजीव करतां येईल याचा रात्रंदिवस विचार करणारा तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत एकच पुरुष झाला. सन १८०० सालीं निवर्तलेल्या नाना फडणिसास मोडकळीस आलेली पेशवाई कशी सुरक्षित ठेवावी याची ज्याप्रमाणें रात्रंदिवस काळजी वाटत असे, तद्वतच एकोणिसाव्या शतकाच्या शेवटलीं पंचवीस तीस वर्षे माधवरावजींनीं राज्यक्रांतीनें कांहीं वेळ स्तब्ध झालेल्या महाराष्ट्रास कसें सजीव करतां येईल या काळजींत घालविली. आणि केवळ महाराष्ट्राकरितांच नव्हे तर सर्व हिंदुस्थानाबद्दल अशाच त-हेचे विचार त्यांच्या मनामध्ये सदैव घोळत असत. पाश्चिमात्य शिक्षणाबरोबरच एक प्रकारची सार्वजनिक जबाबदारी आपणावर येऊन पडते ही गोष्ट माधवरावजींनी पुरी ओळखली होती व आपल्या पंचवीस तीस वर्षीच्या वर्तनक्रमार्ने लोकांस ती जबाबदारी कशी बजवावी याचे उत्कृष्ट उदाहरण घालून देऊन त्यानीं महाराष्ट्राचाच नव्हे तर हिंदुस्थान देशाचा लौकिक राखला असें म्हणणें भाग आहे. हिंदुस्थानची किंवा महाराष्ट्रदेशाची जागृति अमुक उपायानें होईल आणि अमुक उपायाने होणार नाहीं, हें ठरविण्यास असामान्य व व्यापक बुद्धि लागते हें वर सांगितलेंच आहे. पण अशा प्रकारची अलौकिक बुद्धि असूनही जर दुसरे गुण पुढाच्यांच्या अंगीं नसतील, तर त्यांच्या हातून मोठीशी कामगिरी कधीही व्हावयाची नाहीं, राष्ट्राची उन्नति होण्यास ज्या हजारों गोष्टी कराव्या लागतात, त्या एकट्याच्या हातून होत नाहीत. त्यास योग्य माणसांची निवड करून त्यांचे साह्य घ्यावें लागतें; किंबहुना अशा प्रकारचीं माणसें तयार करावीं लागतात असें म्हटले तरी चालेल. माणसें तयार करण्याचे हें काम किती कठीण आहे हें अनुभवावांचून समजणे अशक्य आहे. मनुष्याची पारख, त्यांच्या हातून चुक्या