पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

के. न्या. महादेव गोविंद रानडे スくい घडल्या असतां त्यांस शांतपणें संभाळून घेऊन पुन्हां उत्तजन देण्यास अवश्य लागणारे उत्साह, शांति वगैरे गुण पुढाच्यांचे अांगीं जरूर असावे लागतात. माधवरावजींच्या आंगीं हे गुण पूर्णपणें वसत होते व म्हणूनच त्यांच्या हातून इतकीं कामे येथे सिद्धीस गेलीं. सार्वजनिक सभा, वक्तृत्वसभा,लवादकोर्ट,प्रार्थनासमाज, फीमेलहायस्कूल, औद्योगिक चळवळ वगर ज्या अनेक संस्था पुणें शहरांत झाल्या किंवा आहेत त्या सर्वोशीं माधवरावजचिा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें संबंध होता असें आढळून येईल. या सर्व चळवळी सुरू ठेवण्थाबद्दल लोकमत जागृत करून कायम ठेवणें, निरनिराळ्या संस्थाकरितां निरानराळीं मनुष्ये पाहून त्यांच्या हातून तीं तीं कार्मे करून घेणें, स्वदशांतल्या किंवा परदेशातल्या सर्व प्रकारच्या हालचालीवर नजर ठेवून त्याचा देशाच्या उत्कर्षाशीं कसा संबंध पोहचतो याचे अहोरात्र मनन करणे हें माधवरावजीचे व्यसनच होऊन राहिले होतें. त्याच्या घरीं केव्हांही जा, तेथें कांहीं नाही काहीं तरी सार्वजनिक विषयाची चर्चा चालू असावयाचीच. बारा आणि बारा चोवीस तास अशा रीतीनें सार्वजनिक कामांत एकसारखें मन घालून तीं सुयत्रितरीतीनें चालविण्याइतकें बुद्धिसामथ्र्यच आधीं फार थोड्या लोकांत असतें.आणि ज्या थोड्या लोकांच्या आंगीं अशा प्रकारचे सामथ्र्य असते त्यांस आलस्याने, स्वहितपरतेनें किंवा उत्साहभंगानें पछाडले असल्यामुळे युनिव्हर्सिटींतून दरसाल शंकडे ग्रॅज्युएट बाहेर पडताहेत, तरी रात्रंदिवस देशहृितार्थ तनमनधन अर्पणारा ‘ यततामपि सिद्धाना कश्चिन्मां वेति तत्त्वत:’ या न्यायाने एखादाच माधवरावजींसारखा पुरुष निर्माण होतो. असा पुरुष आपल्यामधून गेला असतां एकाएकीं सूर्यास्त झाल्याप्रमाणे सर्व लोक दिङ्मूढ झाले यांत काहीं आश्वर्य नाहीं. माधवरावजनिीं जीं ही सर्व कामें केली तीं त्यास सुखानें करतां आलीं अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. मुंबईपेक्षा पुणे किंवा महाराष्ट्रदेश यांतील अधिक एकरूप असल्यामुळे सार्वजनिक चळवळीचे माधवरावजनिीं मुंबईहून आणलेलें बी येथे लवकरच उदयास आले हे गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासावरून कोणासही सहज समजण्यासारखे आहे. हें बी रुजत घालून त्यास पाणी घालणे व पुढे तज्जन्य वृक्षाचे पालनपोषण करणे हें सर्व काम माधवरावजीच करीत होते. त्यांच्या हाताखालीं कै. सार्वजनिक काका, कै. सीतारामपंत चिपळोणकर, रा. रा शिवराम हरि साठे वगैरे बरीच मंडळी असून पुढे पुढे कै. रा. ब. नूलकर, कै. कुंटे यांच्यासारख्याचेही साहाय्य त्यास मिळाले होतें. पण या सर्व गृहस्थांची व त्यांनीं चालविलेल्या कामाची मदार काय ती माधवरावजविरच असे. ही गोष्ट लवकरच सरकारच्या नजरेस आली. मल्हारराव गायकवाड यांस पदच्युत केल्यानंतर त्यांची कमिशनमार्फत जी चौकशी झाली तेव्हां पुणे शहरांत झालेली चळवळ आणि सन १८७९ सालों बुधवारचा वाडा जळाला असतां गांवांत झालेली धामधूम ज्यांस आठवत