पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केौ, न्या. महादेव गोविंद रानडे Rくき जांची दोन पिढ्यांत अशी स्थिति होऊन जावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. पण माधवरावर्जीनी पुण्यांत जेव्हां पाऊल ठेवले तेव्हां या महाराष्ट्राच्या जुन्या राजधानीची स्थिति बरच्याप्रमाणें झाली होती, यांत बिलकुल संदेह नाहीं. कोणत्याही प्रकारची चळवळ करण्याविषयीं पराङ्मुखता आणि केवळ स्वहितपरायणतेमुळे अथवा पूर्वीच्या अमदानींत ज्या गुणाची चहा होत होती तेच गुण नेटिवांच्या अंगीं तरी असण्याची आवश्यकता न राहिल्यामुळे एक प्रकारचे लोकांच्या पुढाज्यांच्या आंगीं आलेलें शैथिल्य हेंच काय तें सर्व देशभर नजरेस येत होतें. लोकांच्या आंगचे तेज अगदींच नाहीसे झालेलें होतें असें नाहीं, पण वर लिहिलेल्या कारणांमुळे महाराष्ट्रदेश म्हणजे त्या वेळीं एक थंड गोळा होऊन पडला होता. या थड्या गेोळ्यास कोणत्या तन्हेनें ऊब दिली असता तो पुनः सजीव होईल व हातपाय हालवू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनीं, अनेक उपायांनीं, अनेक रीतींनीं त्यास पुनः सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरितां जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमत: माधवरावजींनीच केली असे म्हटले पाहिजे; व आमच्यामतें हेंच त्यांच्या थेोरवैचेि किंवा असामान्य मोठेपणाचे मुख्य चिन्ह होय. मुंबईच्या कॉलेजांत विद्याभ्यास करीत असतां इंग्रजी विद्यर्ने माधवरावजींच्या मनावर जे पारणाम झाले असतील अथवा त्यांच्या अत:करणांत जेो प्रकाश पडला असेल त्याखेरीज त्यांच्या मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्ति होण्यास डॉ. भाऊ दार्जी, दादाभाई नैोरेजी वगैरे थोर गृहस्थांचीं प्रत्यक्ष उदाहरणें बरीच कारणीभूत झाली असावीं. एवढी गोष्ट निर्विवाद आहे कों, माधवराव मुंबई सोडून कायमचे पुण्याच्या प्रिन्सिपॅल सदरआमैनच्या जागेवर आल, तेव्हां दादाभाई नौरोजीसारख्या पुढारी गृहस्थाच्या उदाहरणानें व कृतीनें त्यांच्या मनावर बराच परिणाम झालेला होता. माधवरावजी मुंबईसच राहाते, तर आपल्या असाधारण बुद्धिसामथ्र्यानें त्यानी तेथही उत्तम लौकिक संपादन केला असता, यात बिलकुल शंका नाहीं. तथापि महाराष्ट्राची राजधानी जें पुणे शहर तेथे येऊन त्यांस जी कामगिरी करावयास सांपडली, त्यामुळे माधवरावर्जीच्या आंगचे अलैकिक गुण लोकांच्या पूर्णपणें नजरेस आल असे म्हणण्यास कांहीं हरकत नाही. सरकारी नोकरीचे काम चांगल्या रीतीनें संभाळून देशाच्या उत्कर्षाकरितां कोणकोणत्या दिशेनें काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे ठरविणे व ते अमलांत आणण्याकरितां सतत परिश्रम करून जागरूकता ठेवणें हें कांहीं सामान्य बुद्धिमान् पुरुषाचे काम नव्हे. कित्येकांस नित्य व्यवसायापुढे सार्वजानेक कामें सुचत नाहींत; सुचलीं तर करण्याची उमेद नसते; आणि यदाकदाचित् करण्यास प्रवृत्त झाले तर त्यास मनुष्यबळ किंवा इतर जी सामुग्री लागते ती ज्या उपायांनीं प्राप्त करून घ्यावयाची ते उपाय योजण्यास ते असमर्थ असतात. कित्येक विद्वानांची तर या व्यापक प्रश्नार्ने बुद्धिच गुंग होऊन जाते, व कित्येक एकदेशीय असून कोणास अमुक एक दिशेने राष्ट्राची उन्नति होईल