पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीमहाराजची जन्मतिथि. २६५ आहे. त्याचप्रमाणे तिसच्या लोकांत * नागाब्धि ’ म्हणजे ४९ आणि * शशिबाण ? म्हणजे १५ अर्थात् १५४९ शक असेंच आहे. तात्पर्य तिन्ही लोकांत १५४९ शक एकसारखाच आहे. प्रभवसंवत्सर, वैशाखमास, शुक्लपक्ष, आणि गुरुवार हेही तिन्ही लोकांत एकच आहेत. म्हणजे ** शके १५४९, प्रभवनाम संवत्सर, वैशाखमास, शुक्लपक्ष गुरुवार ” येथपर्यंत तिन्ही लोकांची एकवाक्यता आहे. आतां तिथी आणि नक्षत्र यांचा विचार करावयाचा. नक्षत्र या तीन लोकांखेरीज अन्यत्र कोठेही लोकांत किंवा बखरीत दिलेलें नाहीं, हें वर लिहिलेल्या आधारावरून वाचकांच्या लक्षांत आलेंच असेल. तेव्हां भक्षत्रावरून तिथीचा विचार कर्तव्य असल्यास या तीन लोकाखेरीज दुसरा कोणताही जुना आधार नाहीं, हें सिद्ध आहे. पहिल्या लोकांत * नक्षत्रे च तिथौ विधौ ? अशाप्रकारें तीथ व नक्षत्र सांगितले आहे. आणि दुस-या व तिसञ्ज्या लोकांत नक्षत्र रोहिणी आणि तीथ द्वितीया असें स्पष्ट आहे. म्हणजे * नक्षत्रच तिथौ विधौ या पदांचा अर्थ ** रोहिणी नक्षत्र आणि द्वितीया तीथ ?? असा पुढील दोन लोक करणारांनी केला आहे. * विधौ ? या पदाचे संस्कृतात दोन अर्थ होतात. ‘विधी' म्हणजे ब्रह्मदेव या शब्दाची ससमी ‘विधैौ' अशी होते; आणि * विधु' म्हणजे चंद्र या शब्दाची सप्तमीही विधौ अशीच होते. काव्यप्रकाशांतील * यानि विधा वभ्युदिते ? हा इकारांत व उकारांत (विधी व विधु) शब्दाचा लेष सर्वप्रसिद्ध आहे. या छेषाप्रमाणे पाहिले तर पहिल्या लोकांतील * विधौ ’ या पदाचे दोन अर्थ संभवतात. एक * विधि ’ म्हणजे * प्रजापति; ’ आणि त्याची तीथ व नक्षत्र म्हणजे द्वितीया व रेहेिणी. कारण द्वितीयेची देवता प्रजापति आणि रोहिणीची देवता प्रजापति आहे. * नक्षत्रे च तिथैौ विधौ ’ या लोकाचा याप्रमाणें अर्थ केल्यास (२ व्या व तिसच्या लोकांत असाच केला आहे.) शिवाजीराजे यांची जन्मतीथ** शके १५४९, प्रभव संवत्सर, वैशाख शुद्ध २, गुरुवार, रेहिणी ?? अशी निघते. चिटणीसांनीं नक्षत्राखेरीज हीच तिथी दिली आहे. पण गणितानें शुद्ध द्वितीयेस शनवार येतो व शुद्ध नक्षत्रही भरणी येते तेव्हां गणितदृष्टया हा अर्थ बरोबर दिसत नाही. त्यामुळे दुसरा कोणता तरी अर्थ लावणें भाग आहे. * विधौ ? या शब्दाचे दोन अर्थ होऊं शकतात हें वर सागितलेंच आहे. * विधौ ? ही * विधु ? याची सप्तमी मानल्यास * नक्षत्रे च तिथौ विधौ' याचा अर्थ नक्षत्र आणि तीथ विधु=१ ’ असा होतो; म्हणजे नक्षत्र आणि पहिली तीथ अथवा प्रतिपदा व अश्विनी नक्षत्र असा अर्थ निघतो. विधु, इंदु, सोम, चेद्र हीं पदें एक (१) या संख्येबद्दल घालण्याची नेहमींचीच वहिवाट आहे. वरील तीन लोकांत इंदु, सोम आणि शशि हे १ या अर्थी वापरलेले आहेत. तेव्हां * विधौ ? हा शब्द विधु शब्दाची सप्तमी म्हणूनच वापरला असावा हें अनुमान अधिक दृढ होतें. असा अर्थ केला म्हणजे शिवाजीराजे यांची जन्मतीथ ** शके ३३