पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ लो० टिळकांचे केसरींतील लेख १५४९ प्रभव संवत्सर, वैशाख मास शुद्ध १, गुरुवार, अश्विनी नक्षत्र ” अशी निघते. आतां गणिताप्रमाणें पाहिले तर प्रतिपदेस आश्विनी नक्षत्र व शुक्रवार येतो. पण प्रतिपदा शुक्रवारीं सूर्योदय होण्यापूर्वीच सुमारें ५ तास १२ घटका लुङ्मती आमच्याकड वार सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत मोजतात. त्या मानानें पाहिलें म्हणजे गुरुवारीं उत्तररात्रीं प्रतिपदाच तीथ येते. तात्पर्य शके १५४९ वैशाखांत गुरुवारी उत्तररात्रीं अथवा उजाडत्या शुक्रवारी पहाटेस शिवाजीराजे यांचा जन्म झाला असे मानले तर जन्मतीथ “ वैशाख शुभ १ गुरुवार आश्विनी नक्षत्न” अशी येते. * नक्षत्रे च तिथौ विधौ ’ यांत “ विधौ ” ही विधु शब्दाची सप्तमी मानल्यास हाच अर्थ निघतो व गणितानें तो बरोबर ठरतो; करितां हाच अर्थ ग्राह्य आहे असे मानार्वे लागतें. सारांश, “ नक्षत्रे च तिथौ विधी ” या पैहिल्या लोकांतील पदांचे दोन अर्थ होऊं शकतात-[१] वैशाख शु॥ २ गुरुवार, रोहिणी; आणि [२] वैशाख शुद्ध १, गुरुवार अश्विनी पैकीं पहिला अर्थ स्वीकारल्यास गणित बरोबर जुळत नाही. दुसरा घेतल्यास बरोबर जुळतें म्हणून दुसराच अर्थ ध्यावा लागतो. यावर कोणी अशी शंका घेतील कीं, “ तुम्ही पहिल्या ठोकाचा अर्थ केला, पण दुस-या आणि तिसच्या लोकांत जर वरील दोन अर्थापैकीं पहिला अर्थ स्वीकारला आहे तर पहिल्या लोकाचाच याहून निराळा असा दुसरा अर्थ कां करावा ? ?? शंका बरोबर आहे. परंतु त्यास उत्तर एवढेच आहे की, * विधौ ? याचे जर दोन अर्थ संभवतात तर त्यांतला गणितसिद्ध अर्थ घेणेच जरूर आहे. शिवाय वर शिवदिग्विजयांतून घेतलेले हे तिन्ही लोक एकदम केलेले असतील असें मुळीच संभवत नाहीं. कारण एकच अर्थ व्यक्त करण्याकरतां एकच मनुष्य एका कालीं तीन छोक तयार करील हे संभवत नाहीं. तेव्हां या तिहीपैकी कोणता तरी एक लोक जुना व दोन लोक मागाहून कोणी तरी केलेले असावेत असें मानार्वे लागतें. शिवदिग्विजयात ** नक्षले च तिथौ विधौ ? हीं पर्दे असलेला लोक ज्याअर्थी पहिल्यानें दिला आहे त्याअर्थी तोच जुना असावा असें अनुमान करण्यास जागा आहे. शिवाय तिसया लोकांत * विधिभान्वित ' म्हणजे * विधी ? किंवा प्रजापतीचे भा म्हणजे नक्षत्र असा जो उल्लेख आहे तो पहिल्या ठोकांतील * विधौ ? हें पद * विधि ’ या शब्दाची सप्तमी मानून तदनुसार केला आहे असें सहज दिसतें. तेव्हां यावरूनही पहिला ठीक मूळचा, व दुसरे दोन त्याचा एक प्रकारचा अर्थ मनांत आणून मागाहून केलेले असें अनुमान होतें. शिवाजीचे जन्मनक्षत्र दुस-या कोणीही दिलेले नाहीं तेव्हां नक्षत्राहून जन्मतीथ कायम करण्यास दुसरें कोणतेंच साधन नाहीं हें वर सांगितलेंच आहे. उपसंह्रार, वरील सर्व विवेचनावरून असा निर्णय निघतो कीं, शिवाजी महाराजांच्या पश्चात् कांहीं दिवसपर्यंत म्हणजे सभासदी बखरीपर्यंत त्यांची नक्की जन्मतीथ कोणी