पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ लो० टिळकांचे केसरीतील लेख कसा करावा हा एक मोठाच प्रश्न आहे. तीथ, वार, नक्षत्र या तिहींवरून जंर कोणती वेळ कायम होईल तर तीच ग्राह्य मानली पाहिजे. पण तीथ आहे तर वार नाहीं आणि वार आहे तर नक्षत्र नाहीं, आणि तीथवार जुळलीं तर साल जुळत नाहीं अशी स्थिति हल्ली उपलब्ध असलेल्या लेखांवरून निष्पन्न होते. तेव्हां याचा निर्णय करण्यास बखरीतील जन्मतिथीस मूल आधारभूत म्हणून जे दाखले दिले आहेत त्यांचा आमच्यामतें प्रथमतः सूक्ष्म विचार केला पाहिजे. शकानुक्रमानें पाहिले म्हणजे जन्मतिथीबद्दल तपशीलवार माहिती चिटणीसांच्या बखरतिच प्रथमत: मिळते. परंतु श्रीशिवदिग्विजय या बखरीत दिलेले जन्मतिथींचे तीन लोक त्याहूनही जुने असावेंत असे वाटतें. निदान मल्हारराव चिटणीस यांनीं दिलेलीं आणि या ठीकांत सांगितलेली तीथ व वार एकच आहेत. तेव्हां चिटणीसांच्या गद्यापेक्षां शिवदिग्विजयांतील पद्ये पुराव्यास अधिक मातबरीची धरलीं पाहिजेत. कारण गद्यांत जितका लवकर फेरफार करता येतो तितका करतां येत नाहीं. हे ठीक येणेंप्रमाणें: अब्दे वै प्रभवामिधे नरपते शालिप्रवाहात्परम् । शाके वेदनवाधिकंदुशरेक मासे च सन्माधवे ॥ नक्षत्रे च तिथौ विधौ गुरु दिने पक्षे सिते शाह्रजेः। जातो नाम शिवाजिकेो नरवरो यो वै हुतांशेो हिते ॥ प्रभवाब्दीं गुरुवासरींच जहला वैशाख शुक्लीं बिंजीो । शल्की (शाकीं ?) सोम-पतत्रि-वेद-निधिच्या नक्ष ते रोहिणी ॥ ज्याच्या (तीव्र ?) प्रताप सूर्य किरणें शत्रूतमा नासुनी । शिव्नेरीस (सु) भूपसूर्य उदये उद्युक्त सद्रक्षणीं ॥ शिवाजीवर्मा नृपातेर्बभूव । विशाखमासे सितपक्षमध्ये ॥ गुरौ द्वितीया विधि भान्वितेहि नागाद्ब (ब्धि ) नूनं शशिबाणवर्षे ॥ हे लोक अशुद्ध आहेत; पण त्यांतील कालवाचक पर्दे संदिग्ध नाहींत हे एक सुदैवच समजलें पाहिजे. या तीन लोकांत पहिला ठीक मूळ असून दुसरे दोन त्याच्याच आधारें दिलेले दिसतात. तिहींमध्यें शालिवाहन वर्ष एकच म्हणजे १५४९ आहे, व संवत्सर प्रभव आणि मास वैशाख आहे. वारही गुरुवारच आहे. पहिल्या लोकांत * वेदनवाधिकेंदुशरके ? याचा अर्थ वेद = ४, नव = ९, अधिक इंदु = १ आणि शर = ५, म्हणजे १५ वर ४९ = १५४९ असा आहे “ अंकानां वामतो गतिः ” हा नियम या किंवा पुढील दोन्ही लोकांत स्वीकारलेला नाहीं. दुस-या लोकांत ** सोम-पतत्रि-वेद-निधी ” याचा अर्थ सोम = १, पतत्रि म्हणजे बाण ५, वेद = ४ निधी = ९, म्हणजे १५४९ असाच