पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ लो० टिळकांचे केसरींतील लेख ( २ ) शके १५४८ क्षयनाम संवत्सरे, वैशाख शुद्ध २ अगर वैशाख शुद्ध ५ चंद्रवार. या चार तिथीपैकी कोणती तरी तीथ वरील चौदा आधारांवरून निष्पन्न होते. यापैकी कोणती खरी हें पाहण्यापूर्वी गणित करून कोणत्या तिथीस केोणते वार व नक्षत्र पडतें हें पाहिले पाहिजे. कारण बहुमतानें निर्णय करण्यापेक्षां रा. रा. राजवाडे यांनी लिहिल्याप्रमाणें कालनिर्णय करण्याच्या कामीं शक, सन, महिना, तीथ, वार, नक्षत्र, करण इत्यादि जास्त तपशीलवार माहिती जर कोणी दिली असेल व ती गणितार्ने खरी ठरत असेल तर तीच तिथी खरी व विश्वासनीय मानणें अधिक न्याय व समंजस आहे. हा तोडगा करण्यापूर्वी ज्योतिर्गणिताप्रमाणें तीथवार कोणते येतात हें पाहिले पाहिजे. तें पाहण्यास मुख्य साधन म्हटले म्हणजे कै० रा. रा. शंकर बाळकृष्ण दिक्षित आणि मि. राबर्ट सिवेल या दोघानीं सन १८९६ सालीं प्रसिद्ध केलेलें “हिंदुपंचांग' हें पुस्तक होय. या पुस्तकांत इसवी सन ३०० पासून इसवी सन १९०० पर्यंत केोणत्या तारखेस केोणता वार, तीथ अगर नक्षत्र होतें हें काढण्याकरितां कोष्टकें दिलेली आहेत. याप्रमाणें गणित केले तर खाली लिहिल्याप्रमाणें तीथ, वार, शक, सन, नक्षत्न वगैरे गणितरीत्या निष्पन्न होतात. यांत शक धरला आहे तो गत आहे. वर्तमान नव्हे. जसें, शके १५४९ याचा अर्थ आम्हीं शालिवाहन शकाचीं १५४९ गतवर्षे असा करितीं; पण दीक्षित याचे पुस्तकांत यासच १५५० वर्तमान शक असे म्हटले आहे. यंदांच्या पंचागांतून शक १८२२ दिला आहे, पण दिक्षित याचे पुस्तकांत त्याचे गणित १८२३ शकापुढे सांपडेल, हें पुस्तक पाहणारानीं ध्यानांत ठेवले पाहिजे. असो, या पुस्तकावरून तिथ, वार वगैरे निघतात ते येणेंप्रमाणे: १. शके १५४९, प्रभव, वैशाख शुद्ध २ रोजीं वार शनवार येतो व सूर्योदयीं भरणी नक्षत्राचा चतुर्थचरण येतो. इंग्रजी तारीख ७ एप्रिल १६२७ अशी आहे. २. शके १५४९, प्रभव, वैशाख शु॥ ५ रोजी मंगळवार येऊन उजाडत्या मंगळवारीं आद्र नक्षत्राचा पहिला चरण येतो. परंतु पंचमीस सोमवारीं रात्रींच सुरवात झालेली आहे. इंग्रजी तारीख १० एप्रिल १६२७ अशी येते. ३. शके १५४८, क्षय संवत्सरे, वैशाख शुद्ध २ स सोमवार येतो. सोमवारीं सूर्योदयीं किंवा किंचित् नंतर द्वितीया लागते. नक्षत्र कृतिका आहे. पण सोमवारीं मध्यरात्रीच्या सुमारास रोहिणी लागतें. इंग्रजी तारीख २७ एप्रिल १६२६ अशी येते.