पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीमहाराजाची जन्मतिथि. २६१ रवी आणि चेद्र इतके येतात; व शुक्र स्वगृहांचा येतो. पण ही कुंडली गणितार्ने विश्वसनीय मानतां येत नाहीं, कुंडलीमध्यें रविमर्षाचा व चंद्र वृषभींचा आहे. तेव्हां महिना वैशाख होऊं शकतो. गुरु ककींचा म्हणजे चेोहोच्या अॉकडयांवर आहे. गणितानें पाहतां वैशाखमासीं कर्कराशींत गुरु शके १५४५ सालीं होता. तेव्हां या कुंडलीवरून शके १५४५ वैशाख शु॥ २ अगर ३ रोजीं १० वाजल्यापुढे म्हणजे मिथुन लग्नावर शिवाजी जन्मला असें रवि, चंद्र आणि गुरु याच्या स्थितीवरून होते. या सालीं वैशाख शु॥ २ स सोमवार येतो व सूर्योदयानंतर ९॥ १० घटकांनीं रेहिणी नक्षत्रही लागतें. संवत्सराचे नाव रुधिरोद्गारीं येतें. म्हणजे रवि, चंद्र आणि गुरु यांची स्थिति खरी मानली तर शिवाजीराजे यांची जन्मतीथ * शके १५४५ ' रुधिरोद्गारी संवत्सरे, वैशाख शु॥ २ व सोमवार सूर्यो दयात् गतघटी सुमॉर १०॥११ नक्षत्र रोहिणी अशी येते. परंतु १५४५ हा शक कोणत्याही बखरीत दिलेला नाहीं. तेव्हां पत्रिकॅतील गुरु चुकला असावा असें मानणे भाग येतें. या कुंडलीवर दुसरा आक्षेप असा आहे की, शके १५४५ सालीं गणितानें शनि वृश्चिकेचा न येतां कर्कीचाच येतो आणि राहू सिंहीचा न येतां तूलेचा येतो. तात्पर्य, गुरूवरून शके १५४५ हें साल कायम केले तर पत्रिकॅतील शनि व राहू जमत नाहीत; आणि पत्रिकंतील राहू किंवा शनि कायम धरला तर गुरु जमत नाहीं. अर्थात् ही कुंडली विश्वसनीय नाहीं. मागाहून कोणी तरी गणित ज्योतिष न जाणणारार्ने रचली असावी असे दिसतें. गोषवारा वर जे १४ निरनिराळे आधार दिले आहेत ते सर्व एकवट करून परीक्षण केल्यास असें आढळून येईल कीं, भूषणकवी, सभासद आणि चित्रगुप्त याच्या जुन्या ग्रंथांतून शिवाजीराजे यांची जन्मतिथी दिलेली नाहीं शिवाजीराजे यांचे समकालीन किंवा ते वारल्यानंतर १०॥२० वर्षाचे अांत लिहिलेल्या बखरीतून अगर ग्रंथांतून त्यांची जन्मतिथ नसावी हें जरा चमत्कारिक दिसते. जन्मतिथीचा पहिला उल्लेख रायरीची बखर व चिटणीसाची बखर यांत आढळतो. शिवदिग्विजयांत त्याचे स्पष्टीकरण आहे व नक्षत्रही दिले आहे. जन्मकुंडली विश्वसनीय धरतां येत नाहीं हें वर सांगितलेंच आहे. शिवाय ती कोणत्याही बखरीत दिलेली नाहीं, हेंही ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. वैशाख मास सर्वत्र दिलेला आहे, त्या बद्दल मतभेद नाही. शक कोणी १५४८ देतात व कोणी १५४९ देतात. तीथ (२) द्वितीया आणि (५) पंचमी अशी देन प्रकारें दिलेली आढळते. वारही दोन आहेत, गुरुवार आणि चेद्रवार. नक्षत्र एकच ग्रंथांत म्हणजे श्रीशवादोविजयांत दिलेले आहे आणि तें रोहिणी आहे. सारांशः-- ( १ ) शके १५४९ प्रभावनाम संवत्सरे, वैशाख शु. २ गुरुवार; अगर शुद्ध ५ चंद्रवार,