पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीमहाराजांची जन्मतिथेि. २६३ ४. शके १५४८ क्षय, वैशाख शुद्ध ५ स गुरुवार येतो. सकाळीं आर्द्रचा प्रथम चरण आहे. इंग्रजी तारीख २० एप्रिल १६२६ अशी येते, गणितानें ही स्थिति येते. इचा व बखरीतील तिथीचा मेळ कसा घालावा हाच मुख्य प्रश्न आहे प्रथमत: सालाचा निकाल केला पाहिजे. म्हणजे शके १५४८ किंवा शके १५४९ याचा निर्णय झाला पाहिजे. तो करण्यास ‘ बहुमता' खेरीज अन्यप्रमाण म्हटलें म्हणजे शिवाजीची मृत्युतीथ शके १६०२ चैत्र शुद्ध १५ रविवार व तेव्हां त्याचे ५३ वर्षांचे वय होतें हे लेख होत. मृत्युतिथीबद्दल मतभेद नाही. त्याचप्रमाणे शिवाजीच्या आयुष्यक्रमांत १२ वर्षे निमूटपणें गृहवास, ३६ वर्षे पुंडाई आणि ५ वर्षे राज्यभोग असेही अनेक उल्लेख आहेत, बेंगळुरास शहाजी गेला तेव्हां तो १२ वर्षांचा होता असा सभासदांनीं जो उल्लेख केला आहे आहे त्यावरूनही शके १५४९ च निघतात. शके १५४९ घालून पुढे संवत्सराचे नांव क्षय असें जे कांहीं बखरीत दिले आहे तें चूक आहे. सारांश, मृत्युातैथांच्या वेळीं बखरींतील शिवाजीच्या वयासंबंधानें आलेले उल्लेख पाहतां शिवाजीमहाराज यांचा जन्म शके १५४९ तच धरावा लागतो. वैशाख महिना सर्वासच मान्य आहे. तेव्हां शके १५४९, प्रभव, वैशाखमास, येथपर्यंत जन्मतिथीचा पुष्कळ अंशीं निर्णय झाल्यासारखाच आहे. आतां शुद्ध २ किंवा ५ एवढ्याचाच निर्णय कर्तव्य आहे. ह्यात शैंकास्थान असे आहे कीं शुद्ध द्वितीया (२) ही तीथ कायम केल्यास चिटणीसाच्या बखरीप्रमाणें गुरुवार येत नाहीं; आणि वैशाख शुद्ध ५ [ १५४९ ] कायम केल्यास सोमवारीं रात्रौ पंचमी पडते खरी, पण सूर्योदयाची पंचमी मंगळवारी येते. तथापि रात्रीं जन्म झाला असें धरल्यास शके १५४९, वैशाख शुद्ध ५, सोमवार येथपर्यंत जुळतें, व एवढ्यावरून रा. रा. राजवाडे यांनी ही तिथी विश्वसनीय धरली आहे. पण रा. रा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणें “सोमवार सरतां सरतां रोहिणी नक्षत्न येत नाहीं, मृग नक्षत्र येतें. किंबहुना वैशाख शुद्ध ५ स (मग ती १५४९ ची धरा अगर १५४८ ची धरा) रोहिणी नक्षत्र येण्याचा संभवच नाहीं असे म्टहले तरी चालेल. आतां शके १५४८ हा शक खरा मानला तर शुद्ध द्वितीयेस सोमवार येऊन मध्यरात्रीस रोहिणी नक्षत्न येतें. पण रोहिनी नक्षत्र ज्यानीं दिले आहे त्यांनीं सोमवार न सांगतां गुरुवार सांगितला असल्यामुळे हीं तीथ खरी धरतां येत नाहीं. शके १५४८,वैशाख शुद्ध पंचमी रोजीं गुरुवार येतो,पण रोहिणी नक्षत्र येत नाहीं. शिवाय ज्यांनीं रोहिणी नक्षत्र दिले आहे त्यांनीं प्रभव संवत्सर दिला आहे. तो संवत्सर १५४९ सालीं पडत नाहीं. सारांश, कोणतीही तीथ घेतली तरी तति गणितदृष्टया कांहींना कांहीं तरी दोष येतोच. तेव्हां ह्या कोड्याचा उलगडा