पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २३१ अगर कान्फरन्स या केवळ वादविवाद व विचार करण्याच्या संस्था असल्यामुळे निरनिराळ्या दिशेने आम्हीं जे उद्येोग आरंभिले पाहिजेत ते सदर संस्थाचे हातून तडीस जाण्याची मुळींच आशा नाही. याकरितां दुस-या निराळ्या संस्था उभारल्या पाहिजेत; व त्या जर लौकर उभारल्या जाणार नाहीत तर आपली धडगत लागावयाची नाहीं. काग्रेसकरिता ज्याप्रमाणे दरसाल पन्नास साठ हजार खर्च करण्यास आपण तयार झाली आहोत, त्याप्रमाणे आपण देशात राहून अगर परदेशात जाऊन उद्योगधंद्याचे ज्ञान संपादणे अगर राजकीय चळवळ करणे या कामाकरिता यावजीव रवटपट करणाच्या लोकाच्या संस्था उत्पन्न करून चालविण्यास पैशाची आपण मदत केली पाहिजे. आमन्या देशास हल्लीं जी मेोठी उणीव आहे ती खरोखर कळकळीनें सार्वजनिक काम करणाच्या माणसांची होय. वकिलीच्या अगर बॅरिस्टरीच्या धंद्यात पैसे मिळवीत असता अगर सरकारी नोकरीत राहून फावल्या वेळात सार्वजनिक कामे करणारे आमच्यामध्ये काहीं गृहस्थ निघू लागले आहेत; पण एवढ्याने आमचे काम भागत नाही व भागणारही नाही. अाज आम्हास जें ओझे उचलावयाचे आहे ते इतके जबरदस्त आहे कीं, असल्या फावल्या वेळी सार्वजनिक काम करणाच्यांच्या हातून ते थेोर्ड दखील उचलले जाणे अशक्य आहे. करिता आमच् ३ी तरुण पिढीस आमची अशी विनती आहे की, त्यानी हाच कित घेऊन पुढे चालू नये. स्वामी विवेकानंद अगर मि, वीरचंद गाधी याच्यासारखे गृहस्थ अमेरिकेत जाऊन जर तेथील लोकांस हिंदुधर्माची दीक्षा देत आहेत तर इतर सुशिक्षित लोकास हें काम फारसे कठिण जाईल असें नाही. आपापल्या प्रातात, किंबहुना अपल्या गावात राहून आम्ही कुजत चालले आहोत; व जबाबदारीचीं कामें करण्याचा बरेच दिवस सहवास नसल्यामुळे आमच्या अगी कांही तेज आहे किंवा नाहीं याचा आमचा आम्हांसच संशय येऊं लागला आहे; व आम्हास असे वाटू लागले आहे की, आता आमच्या बायका शिकल्या म्हणजे मात्र अामचीं पेरेि चागली निपजतील. परंतु हा निव्वळ भ्रम आहे. बुडत्याचा पाय खोलांत अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे हे सर्व विचार सत्त्वहीनपणाचे द्योतक आहेत. स्रीशिक्षण नको असे नाहीं; पण जीपर्यंत देशांतील सुशिक्षित पुरुषांनी आपला हुरूप कायम राखिला नाहीं, अगर वाढविण्याची तजवीज केली नाहीं तोंपर्यंत आमच्या बायका आम्हास साहसाच्या कामीं मदत करतील अशी आशा करणे व्यर्थ आहे. परकीय राज्याखाली आम्हीं बलहीन व सत्त्वहीन होत चाललों आहोत; व आम्हीं आहाँ तसेंच राहिली तर आणखीही होत जाऊं; ते इतके कीं कधीं काळीं इंग्रजी राज्य नाहीसें होण्याचा प्रसंग आला तर आम्ही आपले मेंढराप्रमाणे दुस-याच्या ताब्यांत जाण्यास तयार होऊं. ही स्थिति सुधारण्याचा कांहीं मार्ग आहे काय ? हा प्रश्न प्रत्येक विचारी मनुष्याने आपल्यापुढे ठेविला पाहिजे. याचे उत्तर देणें जरी सेोपें नाहीं तरी तें अशक्य आहे असे नाहीं. ज्या