पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ लो० टिळकांचे केसरींतील लेख महाराष्ट्रांतील तरुण मंडळीनें एकदां सर्व हिंदुस्थानभर आपले घोडे फिरावले होते, त्यांस कालमानाप्रमाणें नव्या उद्देशार्ने व नव्या कारणाकरितां पुन्हां हिंदुस्थानभर नव्हे तर सर्व पृथ्वीभर पसरणे म्हणजे कांहीं दुरापास्त नाहीं. मात्र स्वदेशाकरितां एकनिष्ठपणानें आपले सर्व आयुष्य व बुद्धि खर्च करण्याचा त्यांनीं रामबाण निश्चय केला पाहिजे. आम्हीं ही जी सूचना करितेंौ ती सर्वोसच अनुलक्षून करीत आहेत; पण त्यांतूनही ब्राह्मणावर आमचा विशेष कटाक्ष आहे. इंग्रजी विद्येनें ब्राह्मणाच्या अंगीं जो विनाकारण अहंपणा उत्पन्न झाला आहे ती त्यांनीं सोडला पाहिजे. सर्व प्रकारच्या, सर्व दर्जांच्या व सर्व जातींच्या लोकात मिसळून किबहुना त्याच्यांत व त्यांच्याप्रमाणे राहूनही त्यांनी आपली स्थिति कशी सुधारावी हे त्यास आम्हीं समजावून दिले पाहिजे. हे लोक पशु आहेत म्हणून त्यांचा तिरस्कार करणे काहीं पुरुषार्थ नाही. त्यांचा व आमचा गळा एकेठिकाणीं बांधलेला आहे; व अखेरीस आम्हास जर कोणी तारणार किंवा मारणार असला तर हेच तारतील किंवा मारतील. क्षणभर युरोपियन लेोकात मिसळून वाहवा मिळविल्यानें आमचा काहीं निभाव लागणार नाहीं. अगर युरोपियन राजकर्ते आमची विद्वत्ता पाहून आम्हास कोणत्याही प्रकारचे हक्क देणार नाहीत. उलट राघू विशेष बोलावयास लागला तर त्यास पिंजयात घालून त्या पिजन्याचा ते जास्त बंदोबस्त ठेवितील. सार्वजनिक हित साधण्याची दिशा याहून भिन्न आहे. त्याकरितां खरोखरीच सर्व प्रकारच्या व सर्व जातींच्या लोकांत आम्हीं मिळूनमिसळून वागले पाहिजे; व आमच्या स्वत:च सर्व हित सोडून केवळ निष्काम बुद्धीनें रामदाशाप्रमाणें अथवा साल्व्हेशानस्टाप्रमाणे या बाबतींत उपदशकाचा व मार्गदर्शकाचा धंदा स्वीकारला पाहिजे. खिस्ती धर्मोपदेशकाची धाव किती अनिवार व अमर्यादित आहे ती पाहा. सर्व हिंदुस्थान किंबहुना सर्व जग खिस्ती करण्याच्या ते उद्योगास लागले आहेत; व एकदां आपणही (बौद्धधर्माच्या प्रसाराच्या वेळीं) अशाच हेतूनें त्या वेळीं माहित असलेल्या जगाच्या सर्व प्रदेशावर पसरली होती. ज्याला ज्याला म्हणून आपल्या देशाकरितां काहीं कर्तव्य करावयाचे आहे, अथवा ज्याचे अंत:करण आपल्या देशाकरितां तुटत आहे त्याला हल्लीच्या काळाही याच मार्गाचे अवलंबन केले पाहिजे. महाराष्ट्रांतचसें काय, पण झाडून सर्व हिंदुस्थानभर पसरून लोकांस आपल्या कर्तव्याची आम्ही ओखळ करून दिली पाहिजे, व जरूर लागल्यास देशांतरही करण्यास आम्हीं तयार असले पाहिजे. इंग्रजी शिक्षणपद्धति आमच्यामध्यें शिरून आज पाऊणशें अगर कांहीं ठिकाणीं शंभर वर्षे झालीं, इतक्या कालांत आमच्यामध्यें बूथ, ब्राडला अगर ह्यूम ह्यांच्यासारखीं माणसें निघू नयेत ही मोठया दुःखाची व शरमेची गोष्ट नव्हे काय ? सरकारची आम्हांस मदत नाहीं खरीच; पण आपणच जर उद्योग केला नाही तर लोक तरी आपणास मदत करण्यास कसे प्रवृत्त होतील ? बरें, सरकारनें मदत केली नाहीं तरी तेवढयानें आम्ही आपलें कर्तव्य करूं नये