पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ o लो० टिळकांचे केसरींतील लेख णारांस येवढेच सांगणे आहे कीं, इतक्या घाईवर येण्याचे आज काहीं कारण नाहीं, राजकर्ते या नात्याने इंग्रज लोकाची बुद्धि आम्हांस होईल तितकें निर्बल " व सत्त्वहीन करावें अशी जरी असली, तथापि त्यांस एकोणिसाव्या शतकांतील सुधारलेल्या राज्यपद्धतीस अनुसरून काहीं गोष्टींत सर्वच झोटिंगपाच्छाई करता येत नाहीं; व जेथे अशी अरेरावी ते करीत नाहीत तेथे आपण आपला प्रवेश पहिल्याने करून घेतला पाहिजे. व्यापारधंद्यात त्यानीं सध्या तरी आपणांस मोकळीक ठेविलेली आहे. लोकांत मिसळून वागण्यात व त्यांस हल्लींच्या राज्यपद्धतीच्या दुष्परिणामाचे ज्ञान करून देण्यास इंग्रजी कायद्याप्रमाणे आम्हांस पूर्ण सवड आहे. देशोदेशीं जाऊन स्वामी विवेकानंदाप्रमाणें आमच्या धर्माचा व ब्रह्मविद्येचा परकीयास उपदश करण्याची मोकळीक आहे; आणि कसहीं झाले तरी अम्ही इंग्लंडास जाऊन राहण्यास तयार असली तर राज्यकारभारातील जबाबदारीच्या जागा मिळण्यासाठीं तेथे परीक्षा देण्याची आम्हास कोणी मनाई केलली नाही. तात्पर्ये, परकीय अमलाचा वरवंटा जरी आमच्यावर फिरत आहे तरी या वरवंट्यास कोठे कोठे बरेच मोठे खळगे आहेत, तें कोणते त्याचे नीट अवलोकन करून तेवढ्यापुरती तरी आपली वाढ होण्याचा प्रयत्न करा,म्हणजे कालेकरून याहीपेक्षा जास्त उद्योग करण्याची शाक्त तुमचे अंगात येईल. यापेक्षा सध्याच्या पिढयाच्या हातून जास्त काहीं होणे अशक्य आहे. परंतु जास्त जरी झाले नाहीं तरी आम्ही वर सागितले तेवढेच आमच्या पिढीच्या हातून होत नाही अशी सध्याची स्थिति आहे; व ती कशी सुधारेल याचा प्रत्येकानें विचार केला पाहिजे. प्रि. गोळे यांच या बाबतींतील उत्तर जरी अाम्हास मान्य नसले तरी हा प्रश्न त्यानीं उपस्थित केल्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. आमच्या एशियाखंडातीलच जपान देश ध्या. गेल्या तीस वर्षात त्या देशातील लोकानी आपल्या उद्येगानें व साहसान आपली स्थिती इतकी सुधारली आहे कीं जगातील सर्व लोकास त्याचे आश्चर्य वाटत आहे. जपानी लोकापेक्षां आम्ही बुद्धीने अगर शक्तीनें खचित कमी नाहीं. मग आम्हास त्यांच्या निम्म्याने नाही तर चतुर्थाशाने तरी उद्योग करण्याची बृद्धि का होऊं नये ? साइंसाचीं व उद्योगाचीं सर्वद्वारें आपणास बंद झाली आहेत असे नाहीं. तर जीं द्वारै उवडी आहेत तेथें भिक्षुकाप्रमाणे आपण गर्दी कां करूं नये, हे आम्हास समजत नाहीं. जपानी लोकास राजाश्रय होता व आम्हास ती नाहीं हा त्याच्यात व आमच्यात मोठा भेद आहे खरा; पण या भदामुळे आम्ही उद्येोग केल्यास त्याचे फळ केवळ शून्यलब्धीनेंच मोजावें लागेल असें नाहीं. वास्तविक पाहिले म्हणजे या कामीं आमच्या पुढा-यानी आम्हांस किता घालून दिला पाहिजे; परंतु मागील लेखात सागितल्याप्रमाणे ह्या पुढारी मंडळीने फस्र्टक्लास सबॉर्डिनेट होण्यापलीकडे अद्याप फारसें लक्ष घातलेले नाहीं. कॉंग्रेस, कॉन्फरन्स वगैरे संस्थामुळे देशहिंताच्या कांहीं काहीं मागींचे ज्ञान आपणास होऊं लागले आहे; पण काग्रेस