पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ लो० टिळकांचे केसरीतील लेख असला तरी त्यांचा अनुभव मिळण्याचे साधन आम्हास नाहीं, नेटिव संस्थानांतून काही थोडा मिळावयाचा; पण तेथेही आमच्या दुर्दैवानें चांगली व्यवस्था आढळत नाही. साराश, चोहोकडून कोडले गेल्यामुळे आमची बुद्धि व साहस सबार्डिनेट सर्विहस किंवा प्रेव्हिन्शियल सर्विहंसमध्येच कुजत आहे. ही स्थिति आजच्यापेक्षा अधिक उत्साहाचे व साहसाचे लोक या देशांत येऊन त्यांनीं राज्य कमविल्यामुळे झाली आहे हे खरें आहे; पण तेवढ्यानं हताश होण्यांत काहीं अर्थ नाही. आमच्या राज्यकत्यांच्या अंगीं जसे काहीं गुण आहेत तशा त्यास काहीं अडचणीही आहेत. करिता त्यांच्याकडून सर्वोशी आमचा हास होणें शक्य नाही, मात्र आम्ही आपली स्थिति कशी सुधारावी याचा नीट विचार करून त्याप्रमाणे होईल तितक्या लौकर उद्योगास लागले पाहिजे. अशा दृष्टीनें विचार करू गेले म्हणजे आपल्या अंगचे साहस, शौर्य, मर्दुमकी वगैरे गुण ज्यात व्यक्त होतील अशी सर्व कामे आम्हास न मिळण्यासारखीं झाली आहेत काय असा प्रश्न सहजच उत्पन्न होतो. लष्करीखातें अर्थात् सदर खात्यातील अधिकाच्याचा जागा आम्हास दुष्प्राप्य किंवा अप्राप्य झालेल्या आहेत खया; पण इतर खात्याची सर्वाशी तशी स्थिति नाहीं. तेथे हीही गोष्ट सागितली पाहिजे की, इंग्रजी राज्य जरी राणीसरकारच्या नांवानें चालत आहे तरी इंग्रजी राज्यव्यवस्थेप्रमाणे खरी राजसत्ता महाराणीसरकारचे हातात नाही. महाराणीसाहेब म्हणजे इंग्रजी राज्यव्यवस्थेचा एक मुगुटमणी आहे. हिंदुस्थानचे राज्य कंपनीनें मिळविले आणि सिव्हिल सर्विहस चालवीत आहे असा खरा प्रकार आहे. या अधिकारमडळात जितका आमचा जास्ती प्रवेश होईल तितके साहसादि गुण दाखविण्याचा आम्हास जास्त प्रसंग येईल हें उघड आहे; इतकंच नव्हे, तर सदर गुण दाखविण्याचा वारंवार प्रसंग आल्यानें अभ्यासानें त्यांचा विकास होऊन ते देशातील लोकाच्या अंगी उत्तरोत्तर विशेष जागृत होत जातील. करितीं सदर अधिकारीमंडळात आमचा प्रवेश कसा व्हावा याचा विचार आम्हास केला पाहिजे. इंग्रजी राज्यव्यवस्थेत या अधिकारीमंडळात नेटिवाचा प्रवेश होण्याचीं द्वारे मुद्दाम होतील तितकीं दुर्गम व संकुचित करून ठेविलीं आहेत. मीठ, जंगल, पोलीस, कस्टम, तार पोस्ट वगैरे खात्यांचा बंदोबस्त आम्हांस ठेविता येणार नाहीं काय ? पण सिव्हिल सर्विहस परीक्षेप्रमाणें या खात्यापैकीं ब-याच खात्याच्या अधिका-याची परीक्षा विलायतॆतच होत असते. सिव्हिल सर्विहसची व ह्या दुस-या परीक्षा हिंदुस्थानात होऊन सर्व दिवाणी व मुलकी खात्यात नेटिवाचा जेव्हा प्रवेश होईल, व लष्करी खात्यांतही हुद्दयांच्या जागा आम्हास मिळू लागतील तेव्हाच धैर्योत्साहादि राजगुण आमच्या अंगीं दिसूं. लागतील. हा सुदिन प्राप्त होणें अवधीचे काम आहे खरे; पण . तो प्राप्त होणार नाही असें मात्र आम्हांस वाटत नाहीं. आमची अशी समजूत आहे कीं, या कार्मी व्हावा तितका प्रयत्नच आमचे हातून झाला