पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २२७ नाहीं. कॉंग्रेसमध्ये व कॉन्फरन्समध्यें हिंदुस्थान व इग्लंड देशांत समकालीन परिक्षा व्हाव्या म्हणून आम्ही ओरड चालविली आहे खरी, पण ही ओरड करण्यापूर्वी इल्लीं जीं द्वारे खुली आहेत त्यांचा तरी आम्ही पूर्ण उपयोग करून घेतला आहे काय ? मेडिकल, इंजिनियरिंग, पोलीस, जंगल, तार आणि मुलकी (सिव्हिल सर्विहस) खात्यातील. हुद्दयाच्या जागाकरिता विलायतेंत ज्या परीक्षा हेोतात तेथे सर्वास जाण्याची मोकळीक आहे; पण आपले लोक तेिकडे कितीसे जात आहेत ? परराज्यामुळे येथे द्यावयाची परीक्षा विलायतस द्यावी लागते हैं एक संकट तरी खरेंच; पण जेंौंपर्यंत परराज्य आहे तोंपर्यंत असलीं सकटे सोसूनच त्यांतलैत्यांत मार्ग काढिला पाहिजे. आमच्याकडील सरदार घराण्यांतील मडळी कीं, ज्यांनी मराठी राज्यांत महत्त्वाचीं राजकार्ये केलीं होती त्यांनी हे स्थित्यंतर लक्षांत आणून हल्लींच्या काळास योग्य अशा दिशेकडे आपला मोची फिरविला पाहिजे. या मंडळीपैकीं बरेच लोक संपन्न बुद्धिमान् असतात; तरी त्यांनीं विलायतेस जाऊन राज्यातील मोठमेाठीं कामे आमच्या लोकास मिळण्याचा जो एकच राजमार्ग हल्ली खुला आहे तेथे का गर्दी करूं नये हे आम्हांस समजत नाहीं. इंग्रज लोकानीं आम्हांस अधिकारीमडळात न घेण्याच्या तजविजी करीत असार्वे;व आम्ही अधिकारी मंडळांत जेणेकरून प्रवेश होईल असा उद्योग करावा अशी दोघामध्यें झटापट सुरूं झाली पाहिजे. येथे लष्करी शिक्षणाची शाळा नसून आमच्या मराठे सरदारांच्या वंशजांस आपला पूर्वीचा धेदा चालविण्यास सवड नाहींशी झाली आहे, तरी ही दुःस्थिति दूर करण्याचा आम्हीं प्रयत्न केला पाहिजे. परंतु तसा प्रयत्न न होतां आमचे पुढारी राज्यकत्याप्रमाणे आमच्या मराठे मंडळीस असा उपदेश करूं लागले आहेत कीं, तुम्ही डि ओ डू शिकून कलमबहाद्दर व्हा. असो; साराश येवढाच कीं, आपल्या अंगी आपणास जर राजगुण यावयास पाहिजे असतील तर राजाधिकारी मंडळात आपला प्रवेश करून घेतला पाहिजे. या कामीं काडीइतकी देखील कसूर उपयोगी नाही. परीक्षा विलायतेंत होवी किंवा पाताळात होवेो; तेथें आम्ही सर्व अडचणी सोसून हजर असले पाहिजे. परकीय राज्याखाली आम्हास जे हक्क प्राप्त व्हावयाचे ते काहीं अंशी आमच्या उद्योगार्ने व काही अंशीं राज्यकत्यांच्या सदिच्छेनेंच होणार आहेत; पण आम्ही आपण होऊनच जर अडून बसू लागली तर ही गोष्ट होणे शक्य नाही. तुम्हाला जास्त हृक्क इवे असल्यास पुढे मिळतील; पण मिळाले आहेत तेवढ्याचा तरी तुम्ह नीट उपयोग करून घेत आहां काय ? इंग्रजी शाळेत जाऊन शिकणा-या मुलाची संख्या इतकी वाढत चालली आहे कीं, त्यापैकी पाच पन्नास विलायतेस पाठवून तीं तेथे मेलीं तरीही देशांत कांहीं कमती पडावयाचे नाहीं; व हाच न्याय भाटे, गुजराथी, मारवाडी वगैरे व्यापार करणाच्या ज्ञातीसही लागू आहे. हिंदुस्थानांत धंद्याची वाटणी जातवार झालेली आहे. विलायतेतल्या लोकाप्रमाणे वाटेल त्यास वाटेल तो धंदा येथे कोणी करीत नसे. ही स्थिति बरी किंवा वाईट हा प्रश्न निराळा; पण