पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २२५ ब्रह्मदेश काबीज केला नसता असें नाहीं, अगर राजपुतान्यांतील अथवा पंजाबांतील एखाद्या सरदारानेंही अफगाणिस्थानावर हल्ला करूव जय मिळविला नसता असेंही नाहीं, पण हीं कामें आम्हांस सांगतो कोण ? जनरल पेंडरघास्र्ट अगर लेॉर्ड रॉबर्टस यांच्याच वाट्यास तीं जावींत अशीच हल्लींची राज्यव्यवस्था आहे. जमिनी ची मेोजणी करण्याचे किंवा हिशेब राखण्याचे काम तर मेोठ्या शौर्याचे नाहींना ? मुसलमानी राज्यातही तोडरमल्लासारख्या कामगारास हीं कामै मिळत असत; पण हल्लींच्या इंग्रजी राज्यांत फिन्यान्स मिनिस्टरची जागा नेटिवांस मिळण्याचा कधीं तरी संभव आहे काय ? लष्करांतील, मुलकींतील, जंगलखात्यातील अथवा तार, पोस्ट, पब्लिकवक्सै वगैरे झाडून सर्व खात्यातील जबाबदारीच्या जागा युरोपियनासच मिळतात. हे युरोपियन जन्मत:च हीं खातीं चालविण्याची बुद्धी ईश्वरापासून घेऊन आलेले असतात असें नाहीं. विलायतहून लालबुद तरणा बाड जेव्हां इकडे येतो तेव्हां तो आडमुठयाच असतो. कोणास लेव्हल लावितां येत नाहीं, तर कोणास हिशेब कळत नाहीत अशी स्थिति असते. पण लौकरच ही गैर बालकें स्वजातीय वरिष्ठ अधिकाच्याच्या कृपादृष्टीनें खालील अधिकाच्यापासून काम शिकून घेऊन ज्ञानाने व वयानें आपले बाप शोभतील अशा सबॅर्डिनेट नेटिव्ह ऑफिसरावर अंमल करण्यास तयार होतात. नेटिव लोकांस वरिष्ठ जागा न मिळाल्यामुळे सर्व राष्ट्राचे जें खरोखर नुकसान होत आहे तें यांतच आहे. युरोपियन लोकांइतका नेटिव लोकास पगार दिला नाही तरी हरकत नाहीं; पण युरोपियन अधिकाच्यास कामे करण्यास जी संधी मिळते ती आम्हांस द्या, असें जें मि. दादाभाई नौरोजी याचे म्हणणे आहे त्यातील ईगितही हेंच होय. हिंदुस्थानच्या फडणिसाचे काम करणाच्या गृहस्थास हल्ली सालिना साठ हजार रुपये द्यावे लागतात. हेच काम पेशवाईत मोरोबादादा फडणीस सालिना दोन तीन हजार रुपये घेऊन करीत असत, व तें आजमितीसही आमच्यापैकी कोणीही साठ हजाराच्या निम्म पैसे घेऊन हल्लींच्या फिन्यान्स मिनिस्टराइतकें चांगलें काम करण्यास तयार होईल. पण ते मिळावें कसें हाच मोठा प्रश्न आहे. पेशवाईत इतकी धामधूम असताही राज्याचे हिशोब आम्ही कसे चोख राखले होते, किंबहुना त्या वेळी कारकुनानीं कहीं काम केले असले तर हेंच होय; पण आता तेंच काम करण्यास आम्ही नालायक ठरली आहोत. याचा परिणाम असा होणार आहे कीं, काहीं दिवसांनीं आम्हास हिशोब करितां येत होते कीं नाहीं याची देखील लोकांस शंका वाटणार. शास्त्रीय शोध करणें,परदेशात अगर परमुलखांत जाऊन तेथील लोकांवर हुकमत चालविणे, मुलुखगिरी करून नवीन प्रदेश इस्तगत करणें अथवा पोस्टासारख्या एखाद्या मोठया अवाढव्य खात्याची उभारणी करून व्यवस्था लाविणे हीं कामे आता आम्हास अपरिचित होऊं लागली आहेत. लिवार्नर, पील, प्रीचर्ड यांच्याइतक आम्ही बुद्धिवान