पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ लो० टिळकांचे केसरीतील लेख उत्साहहीनता दिसून येते तिकडे त्यांचे लक्ष गेलेलें नाहीं. कॉलेजांतून निघालेला एखादा कोरा तरतरीत ग्रॅज्युएट नोकरीत पहिल्यानें मोठ्या आवेशाने शिरत असतो; परंतु त्यास लौकरच असे आढळून येतें कीं, आपली नौकरी सबॉर्डिनेट आहे, करितां आपणास वरिष्ठ साहेबाच्या तंत्रानेंच चालावयास पाहिजे. यास कांही युक्ति सुचली तर ती साहेबांस कळवावी, व तिचे श्रेय साहेबांनीं घ्यावें. असा क्रम अंगीकारावा लागतो; नाहीपेक्षा फस्र्टक्लास सबॉर्डिनेट होण्याची आशा सोडून द्यावी लागते. साराश, वीस रुपयाच्या कारकुनीच्या जाग्यापासून चढत चढत आमचे ग्रॅज्वेट जोपर्यंत फस्र्टक्लास सबॉर्डिनेटच्या योग्यतेला येतात तोंपर्यंत त्याचे अंगचे ओज (पूर्वीचे थेोडेबहुत असल्यास) ते अगदी नाहीसें होऊन जातें; व या च स्थितीत प्रायः पेन्शन घेण्या ची पाळी येत असल्यामुळे अमिच्यातील पेन्शनर मंडळी म्हणजे ज्या वृद्ध मडळींनीं समाजास वळण लावावयाच तीही उत्साह शून्य झालेली असते. एका युरोपियनानें असे उद्गार काढलेले आमच्या ऐकण्यात आहेत कीं, नेटिव अंमलदार कितीही मेोठे असले तरी त्याजवर युरोपियनाची देखरेख असल्याखेरीज त्यास मीठमेोठीं कामे करिता यावयाची नाहीत. खरेंच आहे; कशाला करितां येईल ? युरोपियन कामगार हिदुस्थानात आला म्हणजे तो मुंबई, मद्रास, पंजाब, कलकत्ता वगैर निरनिराळ्या ठिकाणीं जबाबदारीची कामे करून अनुभवानें हुशार होतो; परंतु आमची मंडळी कितीही शहाणी असली तरी त्यांचा जन्म प्रातातल्या प्रातात सबॉर्डिनेट सार्वहंसमध्ये गेल्यामुळे त्याची दृष्टि संकुचित होऊन अनुभव कोता असतो, इतर्केच नव्हे तर त्यांच्या वृद्धापकाळीही त्यास ह्यम साहेबाप्रमाणें देशसेवेची स्वतंत्न कामे करण्याचीही हैंॉस राहत नाही. परराज्यीचे नष्टचर्य जे चेोहीकडून पाठोस लागत म्हणतात तें असें होय. मोठमोठ्या जागा नेटिवास न मिळाल्यामुळे पैशाच्यापरी पैसे विलायतेस जातात ते जातातच; पण त्याखेरीस आमच्या देशातील होतकरू लोकास उत्साहप्रियतेचे शिक्षण मिळावयाचे ते मिळत नाही, आणि अखेरीस ज्या युरोपियन लोकास तेो अनुभव मिळतो ते पेन्शन घेतल्यावर इंग्लंडात जाऊन रहात असल्यामुळे त्याच्या अनुभवाचा आम्हांस फायदा मिळावयाचा तोही मिळत नाहीं. साराश, चोद्देोकडून आमची नागवणूक चाललेली आहे. मोठया जागा कोणी देत नाही, आपल्या प्रांताबाहेरच्या अनुभवाच्या नावानें शून्य, इर्षेचीं व मर्दुमकीचीं कार्मे युरोपियनांनीं पटकावलेलीं, लष्करांतल्या हुद्याच्या जागा मिळत नाहीत त्या नाहीतच, पण परवानगीखेरीज शस्त्रदेखील बाळगण्याची पंचाईत, अशा स्थितींत कोणत्या देशांतील लोक शंभर वर्षीत नामर्द होणार नाहीत ? हुरूप आणि उत्साह राष्ट्रांतील प्रत्येक व्यक्तींत भरलेला असतो असें नाहीं. सर्व राज्यात राज्याच्या विस्ताराच्या मानानें जे थोडेबहुत पुढारी असतात त्याच्यातच काय तो विशेष हुरुप व उत्साह नजरस येत असतो; व त्याच्या कमजास्त संख्येवरच राष्ट्राचे वैभव व शक्ति अवलंबून असते. व्यवस्थेच्या मानानें पेशव्यांची राज्यपद्धति कितीही