पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २१५ झाला आहे व होत आहे; व ज्या कोणास आपल्या निकृष्ट स्थितीचा विचार करावयाचा असेल व ती नाहींशी होण्याचा उपाय शोधून काढावयाचे असतील त्यानें या सर्व गोष्टींचे लक्षपूर्वक अवलोकन करून विचार केला पाहिजे. ( नंबर ३. ) परवशतेच्या वरवंटयाखालीं सबंध राष्ट्रातील लोक मग ते शिकलेल असोत वा नसोत एकसारखे कसे चेचले जातात ह्याचे थोडेसें दिग्दर्शन गेल्या खेपेस केले होते. आज फिरून त्याच विषयाचा जास्त उहापोह करावयाचा आहे. परराज्य पुष्कळ प्रकारचे असतें, व अमुक एक परराज्य दुस-या परराज्यापक्षा बरें किंवा वाईट असें म्हणण्यासही अनेक कारणे असतात; इतर्केच नव्हे तर परराज्य म्हणजे सवींशीं वाईट असलेच पाहिजे असे नाही. कित्येक देशात त्या देशाच्या बाहेरील लोक येऊन त्यानीं तेथे राज्य करणें हेंच एकंदर देशास परिणामीं अधिक सुखकर असते. परराज्यापेक्षां स्वराज्य बरे, ही गोष्ट तर निर्विवादच आहे; पण प्रसंगविशेषीं कोणत्याही देशास इतर देशाची मदत लागत नाहीसे नाहीं. आम्ही हिंदुस्थानच्या सद्यःस्थितीचा जेो विचार करणार आहोंत तो याच दृष्टीने करणार आहाँत. राणीसरकारचे राज्य आमच्या देशावर चिरकाल राहिले तरी त्याबद्दल वाईट वाटण्याचे काहीं कारण नाहीं. हिंदुस्थानच्या सर्वभौम तक्तावर युधिष्ठरासारखे पुरुष असले काय आणि अकबरासारखे पुरुष असले काय, ते आम्हांस सारखेच. राजापेक्षा राज्यपद्धतीचा विचार अधिक सूक्ष्म रीतीनें करावा लागतो. त्यातूनही सर्व राजसत्ता ज्या वेळी कान्स्टिटयूशनमध्ये किंवा राज्यपद्धतीत आलेली असते, त्यावेळी तर राज्यपद्धतीचा विचार विशेष दक्षतेनें व बारकाईनें करावा लागतो. राणीसरकारचे राज्य यावचंद्र दिवाकरौ राहिलें तरी आम्हास पाहिजेच आहे. आम ची तक्रार काय ती राज्यपद्धतीबद्दल आहे. ती पद्धत सुधारली तर इंग्रजी राज्याबद्दल कोणासही कधीं वाईट वाटण्याचा संभव नाही. असो, हल्लींची राज्यपद्धति कशा त-हेची आहे हे मार्गे सागितलेंच आहे. पेशवाईत किंवा मराठेशाईत ज्याप्रमाणे हल्लींच्या महाराष्ट्र ब्राह्मणांचे पूर्वज मर्दुकीची कामें करीत सर्व महाराष्ट्रभर हिडत, तसा अनुभव किंवा सवड आतां इंग्रजांखेरीज कोणासही राहिली नाहीं. व काय मीठी उडी ती डेप्युटी कलेक्टरच्या अगर फस्र्टक्लास सबॉर्डिनेटच्या जागेपर्यंतच. इंग्रजी राज्यात वरच्या प्रतीच्या, अर्थात् मर्दुमकीच्या अथवा जबाबदारीच्या सर्व जागा युरोपियनाच्या, आणि सबॉर्डिनेट म्हणजे खालच्या प्रतीच्या अर्थात् खडेंघाशीच्या तेवढ्या नेटिवांच्या. या खालच्या प्रतीच्या जागांपैकीं मोठ्यांत मोठी म्हणजे फस्र्टक्लास सबॉर्डिनेट; म्हणजे पहिल्या प्रतीच्या खडेंघाशाची जागा आम्हास मिळावयाची. प्रेि. गोळे यानीं शाळेतील मुलांची उत्साहहीनता वर्णन केली आहे, पण याहीपेक्षा सरकारी नेटिव नोकरांत जी विशेष