पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची वेिंद्या. २१७ गचाळ असेो, त्या पद्धतीत आपल्यापैकीं कर्ते पुरुष निघण्यास सवड होती. परंतु इंग्रजांच्या राज्यपद्धतींत तशी सवड नाहीं; इतकेंच नव्हे, पण तशी सवड ठेवण्याचा इरादाही नाहीं. यामुळे कै. रा. सा. मंडलीक याच्यासारख्या पुरुषासही गव्हर्नमेंट प्लीडरच्या पायरीपलीकडे जास्त कर्तबगारीची जागा मिळाली नाहीं. आम्हीं मार्गे सांगितलेंच आहे कीं, श्रीशिवाजीमहाराज हे जर या कालांत जन्मास आले असते तर त्यांसही सुभेदार मेजरच्या पलीकडे जागा मिळाली नसती. हा प्रकार राजकीय, लष्करी अगर कारकुनी पेशाच्या नोकरीतच घडून आला आहे असें नाहीं, व्यापारधंदे व शेतकी याची स्थितिही बहुतेक अंशी अशीच आहे. परदेशाशीं हिंदुस्थानचा जो व्यापार आहे तो बहुतेक युरोपियन व्यापाच्यांच्या हातांत आहे, आणि देशात जे पूर्वी निरनिराळे धंदे चालत होते ते नाहीसे होऊन सर्व लोकास शेतकी अगर नोकरी याखेरीज उपजीविकचे दुसरें चांगले साधन या राज्यांत राहिलें नाहीं. बंगाल्यांतील बाबू सिव्हिल सर्विहसची परीक्षा देऊन राज्यकर्ते होणार; पण स्वभावत:च ते त्या कामास नालायक आहेत व त्यांच्यार्ने रजपूत, मराठ, मुसलमान, शीख वगैरे शिपाई बाण्याच्या ज्ञातींवर अमल करितां यावयाचा नाहीं असें युरोपियन लोकाचे म्हणणे आहे. परंतु हें त्यांचे म्हणणे केवळ मानभावीपणाचे आहे, यास लष्करात रजपूत अगर शीख लोकासही मोठमेोठया जागा देत नाहींत येवढा पुरावा बस्स आहे. इग्रज लोकास आम्हा हिंदु लोकांचे शौर्य, साहस, हुरूप, कर्तृत्व अथवा व्यापारी थाडस यांपैकी कांहींएक नकेा आहे. हिंदुस्थानच्या लोकानीं जमिनीं नागरून अगर खालच्या प्रतीच्या नोकया करून प्राप्त होण्याजोगें असेल तेवढे धन अगर लौकिक मिळवावा, व बाकीच्या सर्व गोष्टींचा मक्ता राज्यकत्र्याकडे सोपवावा असें हल्लींच्या राज्यपद्धतीचे धोरण आहे. त्याचा परिणाम लोकावरे कसा झाला आहे ती पहा. इंग्रजी राज्य होण्यापूर्वी ज्या काहीं ज्ञाती आपल्या कर्तबगारीवर पुढ सरसावल्या होत्या त्यास पिछेहाट करावी लागत आहे, व ज्या काहीं मार्गे पडल्या होत्या त्यांस नियमित मर्यादेपर्यंत पुढे आणण्याचे प्रयत्न चालले आहेत. उदाहरणार्थ, आमच्याकडील ब्राह्मण व मराठे या जाती घेऊं. वर सागितलेंच आहे कीं, नोकरी व शेतकी याखेरीज आतां दुसरा चांगला घंदा राहिला नाही. मराठे लोकांचा खरा धंदा शिपाईगिरीचा; पण तो आतां त्यांस बहुतेक अजिबात बंद झाला आहे व सरकारचे त्यास असें सागणें आहे कीं, ब्राह्मण लोक तुम्हास फसवीत आहेत, करितां तुम्ही शाळेत जाऊन त्यांच्याप्रमाणें जागा मिळविण्याचा प्रयत्न करा. लष्करांत शिरून नाव मिळविण्याचा धदा बंद झाल्यामुळे काही तरतरीत मराठे लोकांच्या मनांत हा उपदश ठसून ते ब्राह्मणाप्रमाणे विद्यार्जनाच्या नादीं लागत चालले आहेत व असले लोक जोपर्यंत पुष्कळ झालेले नाहींत तोपर्यंत सरकारही त्यांचा गौरव करीत आहे. तथापि येवढ्यावरून असें मात्र कोणी समजूं नये की, २७