पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांचा विद्या. ૨ o A परीक्षा पास झालेल्या लोकांस थोडया वेळाचा अभ्यासक्रम ठेवून वैद्य पदवी मिळविण्याची सवड ठेविली पाहिजे. किंबहुना आमच्यामते ज्याप्रमाणें ग्रांट मेडिकल कॉलेज आहे त्याप्रमाणें हें एक प्राच्य वैद्यकाच्या पायावर आग्ल व प्राच्य वैद्यक शिकविण्याचे एक भव्य कॉलेज झालें पाहिजे. ही कल्पना मार्गे आम्ही एकदां प्रसिद्ध केलीच होती; परंतु पुन्हा प्रसंग आला म्हणून केली आहे. हल्लींचा उपक्रम इतक्या योग्यतेचा नाहीं. तथापि ** अल्पारंभाः क्षेमकराः ’ या न्यायानें आम्ही त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतों. हाच प्रयत्न जर पुढे अशाच रीतीनें चालू राहिला तर त्यापासून लवकरच आपणास इष्ट ती फळे प्राप्त होतील अशी आम्हास आशा आहे. आर्य वैद्यकाचे पुनरुजीवन करण्यास आर्य वैद्यकाचा अभ्यास तर पाहिजेच; परंतु त्याजबरोबर वर निर्दिष्ट केलेल्या आधुनिक शास्राचे अध्ययन, परीक्षण आणि शेोध हीही कायम राहिलीं पाहिजेत. यासंबंधाने दुसरी उपयुक्त संस्था म्हटली म्हणजे म्युनिसिपालिटया व लोकलबोर्ड यांनी काढिलेले देशी धर्मार्थ दवाखाने हे होत. पुण्यास अशा त-हेचा म्युनिसिपालिटीनें काढलेला एक दवाखाना आहे; व त्याच नमुन्यावर इतर ठिकाणीं असेच दवाखाने निघतील तर त्यापासून देशी वैद्यकास बरेंच उत्तजन मिळेल. कसेंही झालें तरी आमचेकडील सुशिक्षित, विद्वान् डॉक्टरानीं या कामी मन घालून केवळ परोपकारबुद्धीने व जुन्या आर्य वैद्यकांचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूनें या कामीं आपलें सर्वस्व खर्च केल्याखेरीज आमचा हेतु कधीही पूर्णपणें तडीस जावयाचा नाहीं. करितां पुनः एकवार हे काम हातीं घेण्याबद्दल त्यास व अशा कृत्यास पूर्ण मदत करण्याबद्दल मुंबईच्या व बाहेरच्या धनिक लोकास विनंती करून हा लेख संपवितो. ब्राह्मण आणि त्यांची विद्या. प्रि. महादेव शिवराम गोळे एम्. ए. यानीं ब्राह्मण आणि त्याची विद्या या नांवार्ने प्रसिद्ध केलेला ग्रंथ आमचेकडे अभिप्रायास येऊन बरेच दिवस झाले; परंतु कांहीं कारणामुळे त्यांवर आम्हांस आपला अभिप्राय आजपर्यंत देता आला नाहीं. प्रि. गोळे यांनीं प्रस्तावनेंत लिहिल्याप्रमाणें त्यांच्यामतें पथ्य परंतु आप्रेय अशा काहीं गोष्टी ग्रंथाच्याद्वारें सांगण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे; व तें काम कोणत्याही प्रकारचा पडदा न ठेविता प्रेि. गोळे यांनी बजाविलें याबद्दल त्याचे आमच्या लोकांनीं आभार मानेिले पाहिजेत. एका मोठया खाजगी विद्यालयाचे प्रधानाध्यापक या नात्याने, प्रि. गोळे याचा पुढील पिढीच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा अनुभव बराच मोठा आहे, व त्यांनी हातीं घेतलेल्या कामासंबंधीं त्यांच्या सूचना पुष्कळ विचारार्ह आहेत, हें वाचकांस कळविण्यास