पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ० ४ लो० टिळकांचे केसरीतील लेख औषधे देऊन द्रव्यसंचय करण्यापलीकडे आपलें कांहीं कर्तव्य आहे असें अद्याप पुरतेपणीं वाटू लागलें नाहीं. या समजुतींत थोडथोडा फेरफार होत चालला आहे हें आम्हांस माहित आहे; पण त्याची मजल जावी तितकी अद्याप गेलेली नाही. परंतु पदवीधर देशी डॉक्टरच्या हातून ज्या गोष्टीस प्रारंभ व्हावयास पाहिजे होता ती गोष्ट करण्याची सुरवात नेटिव विद्याथ्यांनीं प्रथमतः केली इं त्यास भूषणास्पद आहे. पनवेलीसवे. शा. कृष्णशास्री पुराणिक ह्यांनी आपल्या आर्य औषधालय या नांवाच्या एका मोठया कारखान्याचा नुकताच उत्सर्ग करून त्याला सार्वजनिक स्वरूप दिलैं; व तो निरंतर चालून त्यापासून होणारा नफा आर्यवैद्यकाचे पुनरुज्जीवन होण्याच्या कामी लागेल अशी योजना केली आहे. कृष्णशास्री पुराणिक हे काहीं मोठे धनाढ्य नाहीत, तथापि त्यांनीं धैर्य करून जो हा कित्ता घालून दिला तो चांगल्या वैद्यांनी व डॅॉक्टरांनीं गिरविण्यासारखा आहे. आपल्या कारखान्यापासून जें उत्पन्न होईल त्यांपैकी आपल्या निर्वाहास लागेल तेवढेच घेऊन बाकी सर्व सार्वजनिक कामाकडेच द्यावयाचे यापेक्षां जास्त स्वार्थत्याग कोणता ? आमचे कित्येक हुषार डॉक्टर व वैद्य यांनीं जर या मार्गाचा स्वीकार केला असता तर आज जी काही इस्टेट कित्येक २ांडापेोरांस खावयास मिळत आहे ती मिळाली नसती. गेल्या पंधरवडयात मुंबईसही दुसरी अशाच त-हेची गोष्ट घडून आली. वैद्य प्रभुराज जीवनराम व त्यांचे एल्. एम्. अॅन्ड एस. पास झालेले चिरंजीव डॉ. पोपटराम प्रभुराम यांच्या परिश्रमानें मुंबईस आर्य वैद्यकाच्या पुनरुज्जीवनाथै एक विद्यालय काढण्याचे ठरलें असून त्या कामाकरता काहीं थोर डॉक्टर, वैद्य व इतर गृहस्थ यांची एक कमिटी नेमण्यांत आली आहे. सर दिनशा पेटीट यांनीं या कामाप्रीत्यर्थ दहा हजार व शेट चतुर्भुज मुरारजी यानीं सात हजार रुपये तूर्त दिले आहेत. विद्यालयाचा अभ्यासक्रम ठरलेला असून पहिलीं तीन वर्षे वनस्पतीशास्र, रसायनशास्र, वाग्भट वगैरे शिकून जेो परीक्षा पास होईल त्यास वैद्य ही पदवी देण्यांत येईल. दुस-या परीक्षेस शुश्रुत आहे व ही परीक्षा जो पास होईल त्यास वैद्यराज ही पदवी मिळावयाची; व पुढे चरक व शुश्रुत यात परीक्षा देऊन आर्य वैद्यकावर स्वतंत्र ग्रंथ लिहिल्यास त्यास धन्वंतरी हें पद मिळेल. डॅॉक्टर भालचंद्र, देशमुख, काणे वगैरे डॉक्टरानीं या शाळेस मदत देण्याचे कबूल केले आहे; व शंभर, पांचशें अगर हजार याप्रमाणें जे पैसे देतील ते या शाळेचे आश्रयदाते मानले जातील. विद्याथ्यास अनुभविक ज्ञान मिळावें म्हणून शाळेस एक धर्मार्थ दवाखाना जोडणार आहेत. येथपर्यंत योजना ठीक आहे. पण आमच्या मतें त्यांत आणखी एक दोन गोष्टींची भर पाहिजे आहे. पहिली गोष्ट अशी कीं, डॉ. भालचंद्र, देशमुख यांच्यासारख्या गृहस्थांनी ही संस्था अंगावर घेऊन चालविली पाहिजे; आणि दुसरी ही कीं, यांत एल्. एम्. अँड एस्.