पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ ली० टिळकांचे केसरींतील लेख आमच्या शिफारशीची जरूर नाहीं. इल्लींचा शिक्षणक्रम बेलगामी, बयाच ठिकाणीं निरुपयोगी, अव्यवस्थित आणि अविचाराचा आहे ही गोष्ट आम्हांसही मान्य आहे. आमच्या देशांतील शिक्षणक्रम प्रथमत: ठरवितांना पाश्चात्य ज्ञान पाश्वात्य भाषेच्याद्वारें इकडील लोकांस शिकवावयाचे आहे ही गोष्ट ज्या अधिकायांनी हा शिक्षणक्रम ठरविला त्यांच्या पुरी लक्षांत आली नव्हती; त्यामुळे आणि पंचवीस तीस वर्षापूर्वी निरनिराळ्या प्रतीच्या शाळांतील शिक्षणक्रमाकडे विचारी विद्वान् पुरुषांचे जितकें लक्ष जावे तितके गेलेले नसल्यामुळे, इंग्रजी राज्याच्या स्थापनेनेतर लवकरच जो आमच्या शाळांतून शिक्षणक्रम ठरविण्यांत आला तो असावा तितका सयुक्तिक, मनोरंजक अगर इष्ट हेतू साध्य होण्यास अनुकूल नाहीं यांत कांहीं नवल नाहीं. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका वगैरे देशातून हल्लीं ज्या नव्या नव्या शिक्षणपद्धति निघत आहेत त्यांचे कांहीं अंशीं तरी आम्ही अनुकरण केल्यानें आमचा शिक्षणक्रम सुगम होईल इतकेंच नव्हे, तर त्यापासून लहान मुलांच्या मनावर जे अनिष्ट परिणाम घडतात तेही घडून येणार नाहीत हें निर्विवाद आहे. प्रि. गोळे यांच्या पुस्तकांत जर कांहीं ग्राह्यांश असला तर तो येवढाच होय; व त्याचा प्रथम उल्लेख करण्याचे कारण असें कीं, या पुस्तकापासून जेो कांहीं फायदा होण्याचा संभव आहे त्याची वाचकांस पहिल्यानेंच ओळख व्हावी. प्रि. गोळे यांच्या लेखणीची दृष्टि ग्रथकर्तृत्वाच्या भरांत बयाच दुस-या विषयांकडे वळलेली आहे. विद्याथ्र्याच्या छातीची रुंदी, “ डू” या क्रियापदाचे उपयोग कसे शिकवावें, प्रमदावन व त्यात देवालय असण्याची आवश्यकता, आकाशांतील तारे, काग्रेस आणि कान्फरन्स, सुधारक व गैर सुधारक इत्यादि सर्व लहानमोठ्या गोष्टींवर साधेल तेव्हां व वाटेल तशी टीका करण्यास प्रि, गोळे यांनीं यकिंचितही कसूर केलला नाहीं. त्यामुळे कधीं एका पक्षास तर कधी दुस-यास, व कधी कधीं दोहॉसही नांवें ठेवण्यास त्यांस चांगली सवड सांपडली आहे. केव्हां केव्हां तर आपण मार्गे काय लिहिलें याचाही त्यास विसर पडला आहे. ब्राह्मणाखेरीज इतर जातींचीं मुलें अगर ब्राह्मणांतील इंग्रजी न शिकणायांचीं मुलें इंग्रजी शाळेत शिकणाया मुलांइतकींच दुर्बल व निरुत्साह असतात असें एके ठिकाणीं म्हटलेले आहे; व दुस-या ठिकाणीं त्याच्या उलट सर्व दुर्बलता अगर निरुत्साह इंग्रजी शिकलेल्या ब्राह्मण मुलांच्याच कपाळीं मारलेला आहे. राजकीय चळवळींत पडण्यापासून कांहीं एक फायदा नाहीं, फार झालें तर ही एक गंमत आहे असा एके ठिकाणीं अभिप्राय आहे; व दुसरीकडे परवशतेमुळे कुटुंब भरणापलीकडे पुष्कळ नोकरांस आपलें कर्तव्य कांहीं आहेसें वाटत नाहीं असें म्हटले आहे. हे व अशाच तन्हेचे दुसरे विरोध हा ग्रंथ जे जरा लक्षपूर्वक वाचतील त्यांच्या नजरेस येतील; किंबहुना ग्रंथाचीं पार्ने जसजशी जास्त वाचीत जावीं तसतसा ग्रंथकार विषयांतर करीत आहे असा जास्त जास्त ग्रह होत जातो; व सर्व ग्रंथ वाचून खालीं ठेविल्यावर