पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्य वैद्यकाचे पुनरुज्जीवन. २ ०३ शियाच्या बद्दल सोनामुखी ध्या असें सुद्धा रोग्यास सांगता येत नाही, ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. कोणत्याही स्वतंत्र राष्ट्रांत केोणत्याही शास्राचा अशा अर्धवट रीतीनें अभ्यास होत नसेल. औषधे सर्व विलायतेहून तयार होऊन यावीं, नवीन शोध सर्व विलायतेस व्हावे आणि आमच्या पदवीधर डॉक्टरानीं कागदावर दोन ओळी खरडून देऊन रोग्यास ट्रेचरकडे जाण्यास सांगावें हा सर्व परवशतेचा परिणाम आहे; व ज्याला ज्याला म्हणून राष्ट्रीय वैद्यशास्र हवें असेल त्यानें हा मार्ग सोडून देऊन जुन्या आर्य वैद्यकाच्या पायावर हल्लींच्या वैद्यकाची इमारत उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या युनिव्हर्सिटींची हल्लीं जी स्थिति आहे त्या स्थितीत युनिव्हर्सिटीकडून अगर सरकाराकडून असल्या कामास फारसें उत्तेजन मिळेल असे वाटत नाहीं. एकाददुस-या डॉक्टराखेरीज करून बहुतेक इंग्रज डॉक्टरांच्या मतें त्याचे वैद्यशास्र पूर्णतेस आले आहे; व कोठे सुधारणा करणें असल्यास प्रथमत: त्या ठिकाणीं इंग्रजी पद्धतीप्रमाणे दवाखाना काढला म्हणजे आपलें काम झालें असें ते समजतात. हिंदुलोकाचे वैद्यशास्त्र कितपत उपयोगाचे आहे इकडे त्यांपैकी कोणीही लक्ष देत नाहीं. या असल्या दवाखान्यांनीं आमच्या देशाचा कितपत निभाव लागणार आहे याचा विचार आमच्या लोकांनीच केला पाहिजे. सरकारची मदत आज मिळणार नाही खरी; पण वैद्यशास्राचीं जीं मोठमेोठीं विद्यालयें आज मुंबईत चालली आहेत तीं केवळ सरकारच्याच मदतीनें चाललीं आहेत असें नाहीं. सर जमशेटजी जिजिभाइ, गोकुळदास तेजपाल, वगैरे गृहस्थांनीं लाखो रुपये देऊन मोठमेोठ्या दवाखान्याचे खर्च कायमचे चालविले आहेत; व मुंबईतील काहीं मेडिकल ग्रॅज्युएटांनीं स्वार्थाचा त्याग करून प्राच्य व पाश्चात्य वैद्यक एकत्र करून नर्वे हिंदुवैद्यक करण्याच्या उद्देशाने जर एक नर्वे व खाजगी कॉलेज काढिलें तर मुंबईतील हल्लीच्या श्रीमंत गृहस्थांकडून देशी दवाखाने काढण्यास पुनः मोठमोठ्या देणग्या मिळणार नाहीत असें नाहीं. आतां एम्. डी. पास झालेल्या महावैद्यास असलीं कार्मे करण्यास एखाद्या सामान्य बी. ए.पेक्षां पुष्कळ स्वार्थत्याग करावा लागेल हें खरें आहे, पण कामही त्याचप्रमाणे होणार आहे हें लक्षांत आणून आपले नुकसान केिती होतें इकडे नजर पुरवितां कामा नये. डॉ. कुंटे, डॉ. देशमुख, डॉ. बहादुजी, डॉ. भालचंद्र यांनीं सगळा जन्म पैसे मिळविण्यातच घालवावा; व दहा हजार झाले कीं पंचवीस हजार, व पंचवीस हजार झाले कीं एक लक्ष मिळविण्याची हांव धरावी असा इश्वरी संकल्प खचित नसावा अशी आमची समजूत आहे; व आमच्या वैद्यकाचे कधीं पुनरुज्जीवन होणें असेल तर ते यांच्यासारखी मंडळी स्वार्थत्याग करील तेव्हाच होईल. बुद्धीनें अगर माहितीनें आमचे नवीन शिकलेले डॉक्टर युरोपियन डॉक्टरांपेक्षां कमी आहेत असें नाहीं. मग आम्ही अजून वैद्यः शास्त्रासंबंधानें इतकें परावलंबी कां आह याचा विचार केला तर त्याचे एकच उत्तर देतां येईल. तें हें कीं, आमच्या सर्व विद्वान् डॉक्टरास अहोरात्र रोग्यास