पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ लो० टिळकांचे केसरींतील लेख तें तें वैद्यशास्र आधिकाधिक योग्यतेचे समजतात. अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे आमचे जुनें वैद्यक अद्यापही अत्यंत उपयुक्त आहे; व आपल्या देशास व राहणीस सेोईचे असल्यामुळे आम्हीं आपलें जुनं वैद्यक बुडूं न देण्याबद्दल हेोईल तितकी खटपट करणें हें आमचे कर्तव्य होय. चांगल्या विचारी इंग्रज डॅॉक्टरांचेही असेंच मत आहे; व अलीकडे हिंदू डॉक्टरासही असेच वाटू लागले आहे. शास्त्रीय विषयांचे अध्ययन करतेवेळीं प्राच्य व पाश्चात्य हा भद न मानितां सत्याचेच मधुकरवृत्तीने ग्रहण केले पाहिजे हे तत्त्व आम्हास मान्य आहे. “ म्लेच्छाहि यवनास्तेषु सम्यक् शास्रमिदं स्थितं । ऋषेिवते हि पूज्यते किं पुनदैवविद्विजा: i। ” असें जें गीताचायोनीं ज्योतिषाबद्दल म्हटले आहे तोच न्याय वैद्यकासही लागूं आहे. वर सागितलेलीं वैद्यकीस उपयुक्त असलेलीं शास्ने अथवा कोयनेल, सैंटोनाईन, पोट्याश आयोडाईड वगैरे विशिष्ट रोगांवर हटकून लागू पडणारी औषधैही आमचे वैद्यशास्र सुधारणे असल्यास त्यांत अवश्य सामील केलीं पाहिजेत. त्याचप्रमाणें होमिओप्याथिसारख्या ज्या औषध वापरण्याच्या व देण्याच्या काहीं पद्धति अलीकडे निघाल्या आहेत त्यांचाही शोध व विचार करून त्यांचा समावेश आपल्या शास्रात केला पाहिजे. ग्रीन इलेक्टूिसिटी गुढग्यावर किंवा कपाळावर लावल्यानें तेथील दु:ख राहतें आणि एखादा वनस्पती कपाळावर बांधली असतां तिच्या योगानै ताप जाती असें जुन्या वैद्यकांत सांगितले असले तर तेवढे मात्र अविश्वसनीय अशाप्रकारचीं मनाची वृत्ती ठेवून उपयेोगी नाहीं. आग्रहास शास्त्रीय शोधात जागा नाहीं. अनुभवाच्या व परीक्षणाच्या कसोटीस उतरेल तीच गोष्ट असल्या प्रकरणीं खरी मानावी लागतें. आमच्या जुन्या वैद्यकास ही गोष्ट पूर्णपणे संमत होती. व औषधींच्या गुणदोषाचे हेतूंनीं परीक्षण करूं नये असे त्यानीं स्पष्ट म्हटले आहे. औषध सूक्ष्म प्रमाणार्ने द्यार्वे किंवा तोळ्या माशानै द्यावे याबद्दलही त्यांचा कांहीं आग्रह नव्हता. सहस्रपुटी अभ्रकास जी हजार पुटे बसतात त्यामुळे जर त्याचा गुण वाढत असेल तर प्रत्येक पुटाच्या नुसत्या वासानेंच कार्य करून घेण्याची युक्ति जेथे अनुभवानें सिद्ध झाली तेथे ती ग्रहण करण्यास आमच्या जुन्या वैद्यांनीं मार्गेपुढे पाहिलें नाहीं असेच म्हणावे लागते. साराश, कोणत्याही मताचा आग्रह न धरितां अनुभवानें आणि परिक्षेनें जें जें उत्तम ठरेल त्याचे ग्रहण करून आपलें शास्त्र परिपूर्णतेस आणणें हें तत्त्व आमच्या पूर्वजांस पूर्णपणें माहित होते; व या तत्त्वास धरूनच हजारों वर्षेपर्यंत एकसारखे परिश्रम करून ज्या वेळी इतर राष्ट्रे अज्ञानदशेंत होतीं अशा वेळींही आपल्या शास्रांचे त्यांनीं महत्त्व राखिलें होतें; परंतु इंग्रजी राज्यास सुरवात झाल्याबरोबर जो अभ्यासक्रम सुरू झाला त्यामुळे आमच्या जुन्या लोकानीं मिळविलेल्या सर्व ज्ञानाचे मातेरें होण्याचा प्रसंग आला आहे. मेडिकल कॉलेजांतून जे डॉक्टर बाहेर पडतात त्यांस टिंक्चर जिंजर ऐवजीं सुंठीचा काढा ध्या, अगर जालप अगर मॅग्ने