पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्य वैद्यकांचे पुनरुज्जीवन. २०१ * आर्य वैद्यकाचे पुनरुजीवन. आपल्याला ज्या दहापाच जुन्या विद्याचे व कलांचे पुनरुजीवन करणें जरूर झाले आहे त्यांपैकींच आपलें प्राचीन वैद्यक हें एक होय. ह्या वैद्यकाच्या गुणावगुणाबद्दल पूर्वी केसरींत बरेच लेख आले आहेत; परंतु त्या लेखांप्रमाणे कोणींही वर्तन केल्याचे आढळून न आल्यामुळे त्यासंबंधानें केोणाचेही आजच्याप्रमाणें अभिनंदन करण्याचा प्रसंग आला नव्हता. एकदां ज्याप्रमाणे पुण्यास कांहीं खाजगी लोकानीं आर्टस कॉलेज स्थापन केले आहे त्याचप्रमाणें डॉ. देशमुखासारख्या गृहस्थानीं वैद्यकीचे कॉलेज स्थापून त्यांत प्राच्य व पाश्चात्य वैद्यकाचा विद्याथ्यांकडून अभ्यास करवून तें अभ्युदयास आणावें अशीही आम्हीं सूचना केली होती; परंतु तिचाही त्यावेळीं तादृश उपयेोग झाला नाहीं. आमचे जुनें वैद्यक नव्या वैद्यकापेक्षां काहीं बाबतीत पुष्कळ मार्गे आहे, ही गोष्ट आम्हास मान्य आाहे. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, इद्रियविज्ञानशास्त्र, शारीरशास्त्र वरैरेि वैद्यकीस उपयुक्त व आवश्यक शास्रांचा पश्चिमेकडील लोकानीं गेल्या एकदोन शतकांत चागला अभ्यास करून ती शास्ने पुष्कळ पूर्णतेस आणिली आहेत; व त्यामुळे साहजिकच ते शस्त्रविद्येत कुशल झाले असून कित्येक नव्या वनस्पति व तत्त्वें यांचीही त्यांस जुन्या वैद्यापेक्षा अधिक माहिती झाली आहे. त्याचप्रमाणे अलीकडील रोगनिदानाची पद्धतही वरील शास्त्राच्या मदतीने काहीं काहीं बाबतींत अधिक सुधारली आहे. परंतु एवढयानें आमचे जुनें वैद्यशास्र अगदीं टाकाऊ झाले असें मात्र होत नाहीं. खिस्ती शतकाच्यापूर्वी हजारों वर्षीपासून आर्य ऋषीचे या शास्त्राकडे लक्ष लागलेले आहे; व त्या वेळीं जीं साधने उपलब्ध होती. त्या सर्वाच्या साहाय्यानें त्यांनी हें शास्र आपल्या बुद्धीने होईल तितके परिपूर्णतेस आणिले आहे. हिंदुस्थान देशांत स्वभावतःच वनस्पतीचा मोठा भरणा आहे, व त्या सर्वोच्या गुणदोषाचे अनुभव घेऊन परीक्षण केलेले आहे. अनुभव घेऊन असे म्हणावयाचे कारण असें कीं, नुसत्या वनस्पतीशास्राने किंवा रसायनशास्रानें एखाद्या वनस्पतीचा शरीरावर अमुक परिणाम होईल असें सागतां येत नाहीं. ही गोष्ट अनुभवानेंच कळते व तशा प्रकारचा अनुभव येण्यास बरीच वर्षे लागतात, व पुष्कळ ठिकाणीं घेतलेला अनुभव एकत्र करून त्यावरून अनुमान बाधावें लागतें. हे सर्व परिश्रम आर्य वैद्यानीं पूर्वी घेतले असून त्यास ज्या ज्या गोष्टी समजल्या त्या त्यांनी आपल्या ग्रंथांतून दाखल केल्या आहेत. अमुक रेगावर अमुक औषध चालतै ही गोष्ट अनुभवाने समजतें; व रोग बरे करणे हा वैद्य शास्राचा मुख्य उद्देश असल्यामुळे तसा अनुभव ज्या ज्या मानानें अधिक त्या त्या मानानें

  • केसरी-ता. ५ मे १८९६.

२५