पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rくマ लो० टिळकांचे केसरीतील लेख पाहिले नसतें; व तसे केलें असतें तर ह्यरोजसारख्या माणसानें तिचे कल्याण केलें असतें असें आम्हांस वाटतें. पण राणीनें इंग्रज आल्याबरोबर एकदम किल्लयांत तटबंदी करून लढाईस सुरुवात केली. कदाचित् भोवतालच्या लोकानीं तिला तसें करणें भाग पाडलें असेल; पण स्त्रीस्वभावाच्या साहजिक कोतेपणानें ती कोणाच्या तरी नादीं लागून पुढे बंडवाल्यात अग्रगण्य झाली हें आपणास कबूल केले पाहिजे. चरित्रनायिकेवर शत्रंनीं आणलेल्या आरेोपाचे खंडण करून तिची कीर्ति उज्ज्वल करण्याचा ग्रंथकारानीं प्रयत्न केला आहे तो स्तुत्य आहे. तथापि तसे करतांना दुसच्या टोकाला जाऊन फाजील तरफदारी केल्याचा जेो ह्या पुस्तकात क्वचित्। भास होतेो तसेंही करण्याची जरूर नव्हती. लक्ष्मीबाई किती झाली तरी माणूस, त्यांतून स्रोजाति, व त्यात मानी स्वभावाची असून डलहैोसीसारख्या आधाशी गव्हर्नराच्या जुलमानें गाजलेली, तेव्हां तिच्या हातून एखादी राजकारणी चूक झाली असली तरी त्याबद्दल काणी सुज्ञ मनुष्य तिला फारसा दोष देणार नाहीं. * एको हि दोषो गुणसन्निपाते ? या न्यायानें तिच्या विमल कीर्तीस तेणेंकरून बिलकूल डाग लागत नाहीं; व इंग्रज ग्रंथकार काहीं भकले तरी महाराष्ट्रलोकांस असलें अद्वितीय स्त्रीरत्न आपल्यात निर्माण झाल्याबद्दल जो अभिमान वाटतो तो यत्किचितही कमी होणार नाहीं. लक्ष्मीबाई रावसाहेब पेशव्याला जाऊन मिळल्यानंतरची हकीकत जशी द्यावयाला पाहिजे होती तशी दिलेली नाहीं. बहुशः ग्रंथकारास तेव्हाची माहिती मिळाली नसावी. ग्वाल्हेरवर चाल करून जाण्याची मसलत लक्ष्मीबाईची, ती रावसाहेबांनीं ताबडतोब उचलली. पण पुढे तिचा सल्ला घेण्यात येईनासा झाला किंबहुना यापुढे तिची स्वतंत्र कर्तृत्वशक्ति बहुतक नाहीशी होऊन ती केवळ हुकुमाची चाकर होऊन राहिल्यासारखी दिसते, हे मोठे गूढ आहे, व त्याचा उलगडा प्रस्तुत ग्रंथकारानी नीट रीतीने केला नाही असे म्हणावे लागते. काल्पीच्या पराभवानंतर बंडवाल्याच्या कटात अधिकाधिक फाटीफूट आणि अव्यवस्था होऊँ लागलेली दिसते. एरव्ही ग्वाल्हेर घेतल्यानेतर जो पाजीपणा झाला ती संभवत नाही. वस्तुत: हा भाग फार महत्त्वाचा असून चरित्रकारानी अगदीं त्रेोटक माहिती दिली आहे; त्यामुळे एकप्रकारची निराशा होते. शेवटीं पुरवणीदाखल श्रीमंत दामेदररावाचा पुढील वृत्तात व झाशीच्या तहाची कलमें, वंशवृक्ष, व मधून मधून काही चित्रेही घातली आहेत. पुस्तकात नमूद केलेल्या स्थलांचा नकाशा जोडला असता तर निरनिराळ्या प्रसंगाचे वर्णन समजण्यास फार मदत झाली असती. असो; सदहूँ उणिवा पुढील आवृत्तींत भरून येतील अशी आम्हांस उमेद आहे. वर जी थेोडींबहुत व्यंगें दाखविली त्यांनी पुस्तकाची उत्कृष्टता चांगली व्यक्त होते, कारण प्रस्तुत चरित्रवाचनानें वाचकाची जिज्ञासा कशी दुणावते याचे द्योतक ती आहेत. गोडगेोड पक्वान्ने पाहिल्याबरोबर भूक वाढते असाच काहीं अंशीं ह्या पुस्तकाचा प्रकार झाला आहे.