पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणेचे मार्ग १८३ असो; आमच्या चरित्रकार मित्नाची रजा घेण्यापूर्वी आम्हांला पुन: मूळपदावर आले पाहिजे. सत्तावनच्या धामधुमति नाणावलेल्या माणसांपैकीं एकाचे हुबेहूब चित्र रा० पारसनीस यानीं आपणापुढे मांडिलें आहे. इतरांसंबंधार्नेही अशीच कोणी कामगिरी बजावल काय ? प्रधाननायक नानासाहेब ह्याचे चरित्र फारच मनोरंजक होईल असें वाटतें व तत्संबंधीं माहिती देणारे लोकही अजून कोठे कोठे सापडतील. येणेप्रमाणें एकेका अंगाचे सविस्तर निरूपण झाल्यावर समग्र इतिहास लिहिण्यास सुकर जाईल व आम्ही आरंभीं जी मोठी उणीव दाखविली आहे ती सहज भरून येईल. यासंबंधानें आणखी

  • ہx_ ہ<

कांहीं मजकूर लिहावयाचा आहे तो सवडीप्रमाणे पुढे एखादे खेपेस लिहूं.

  • सामाजिक सुधारणेचे मार्ग.

महाराष्ट्रात गेल पाच सहा महिने जेों तंटा चालू होता; व ज्यामुळे अखेरीस सामाजिक परिपदेस राष्ट्रीय सभेच्या मंडपांतून बाहेर पडावें लागले त्यासंबंधाने अखेरचे दोन शब्द लिहिण्याचे आमच्या मनात आले होतें; पण आतापर्यंत कांही कारणामुळे तस करिता आले नाही. डॉ. भाडारकर व न्या. रानडे याचीं सामाजिक परिषदेसंबंधाची जीं भापणे झाली त्यातही या प्रश्नाचा बराच विचार कलेला आहे; व आमच्या सुघारकवर्गाचे असे म्हणणें आहे की, महाराष्ट्रातील वादानें सामाजिक परिषदेस एक प्रकारचे व्यवस्थित स्वरूप मिळून तिचा फायदाच झाला आहे. खरोखरच अशी गोष्ट झाली असल्यास लाख रुपयाची गोष्ट झाली असे आम्ही म्हणतों. आम्हास तरी सुधारणा कोठे नको आहे ? पण ती ज्या ज्या ठिकाणी * इसमे मेरा चादभाई ' या न्यायानें मात्र नको. रा. ब. रानडे म्हणतात त्याप्रमाणे हा प्रश्न व्यक्तिविषयक नाहीं. सुधारणा दोघासही हवी असली तरी तिचे स्वरूप आणि मागैही दोघाच्या मर्त निरनिराळे आहेत. केसरीकारांस रावबहादुरांचा मत्सर झाला आहे इत्यादि काहीं कुत्सित कल्पना रा. ब. च्या कल्याणशिष्यांनी काढिल्या आहेत. जणी काय केसरीकारास न्या. रानडे याची हायकोर्ट जज्जाची जागाच पटकावयाची आहे. ह्या सर्व मूर्ख कल्पना रा. ब. रानडे ह्यांनीं झुगारून देऊन वादाचे खरें स्वरूप ब-याच अंशानें लोकांपुढे मांडिलें याबद्दल आम्ही त्याचे आभार मानितों. आमची अशी समजूत झालेली आहे कीं, इंग्रजी विद्येच्या अव्वल कैफात आमच्या काहीं विद्वाननीं सुधारणेच्या ज्या दिशु अथवू मार्ग शोधून काढले ह्यापैकीं पहुतेक पुचबूस तीस वर्षाच्या अनुभवानें आणि सदरील मुदतीत झालेल्या ज्ञानप्रसारार्ने निरुपयोगी अथवा अप्रयोजक ठरले आहेत अथवा ठरत चालले आहेत. खुद्द रा. ब. रानडे

  • ता. २१ जानेवारी १८९६.