पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झांशीची राणी १८१ चरित्रकारांनीं चागले दाखविले आहे. ज्या दत्तकाचे हक्काबद्दल लक्ष्मीबाई दोन वर्ष इंग्रजसरकाराशीं भांडत होती व जी काढून घेण्याकरितां डलहौसासाहेब इतके घडपडत होते, तो हृक्क अठ्ठावनच्या जाहीरनाम्यानें बिनबोभाट आणि बिनतक्रार हिंदुस्थानातील सर्व राजेरजवाड्यास आणि संस्थानिकास देण्यात आला, तेव्हा लक्ष्मीबाईने अखेरीस दिलेली मात्रा लागू पडली नाहीं असें कोण म्हणल? फ्रान्सातील जेोन ऑफ आर्कप्रमाणें ह्या झांशीच्या प्रतापशालिनी राणीनें धारातीथी स्वदेहाचा बळी देऊन पुढील पिढीची संतति व संपत्ति सुराक्षत केली असें म्हणण्यास मुळींच प्रत्यवाय दिसत नाही. प्रस्तुत चरित्र लिहिण्यास आपणास कशी स्फूर्ति झाली याची ग्रंथकारानीं प्रस्थावनेंत मोठी मनोवेधक हकीकत दिली आहे. पाच वर्षापूर्वी पंडीत वसंतराव यांनी हिराबागेत एक व्याख्यान दिलें. त्याचे सार प्रसिद्ध करण्याची आम्हांस त्या वेळी बुद्धि झाली, व तेणेंकरून झाशीच्या राणीचे दतकपुत्र श्रीमंत दामेादरराव झाशीवाले याचे अस्तित्व रा. पारसनिसांस कळून प्रस्तुत चरित्र लिहिणें सुकर झालें. येणेंप्रमाणें प्रस्तुत पुस्तक लिहिले जाण्यास काकतालीय न्यायानें आम्ही कारण झाले याबद्दल आम्हास अभिमान तर वाटतोच, पण त्याचे मुख्य श्रय रा० पारसनीस व त्याना खरी माहिती पुरविणारे श्रीमंत दामोदरराव यांसच दिले पाहिजे हें उघड आहे. प्रस्तुत चरित्राची आम्ही मागे एकदा ओळख करून दिलीच आहे, तथापि येथेही त्यासंबंधानें दोन शब्द लिहिणे जरूर आहे. पुस्तकाची छपाई वगैरे बाह्याग फार सुबक वठलें असून भापा तर इतकी चटकदार साधली आहे की तें एकदा हाती घेतल्यावर संपविल्याशिवाय खाली ठेववत नाही. मधूनमधून कादंबरीच्या धर्तीवर रसभरित वर्णने घालण्याचा ग्रंथकाराने प्रयत्न केलेला दिसतो, व तीं कितपत साधार आहेत हे कळत नसल्यामुळे केवळ ऐतिहासिक चरित्र या न्यायार्ने पुस्तकाची किंमत कमी वाटण्याचा सभव आहे; पण एकतर अशीं स्थळे थोडीं असून सहज उमगण्यासारखीं आहेत, व दुसरें त्याच्या योगार्ने पुस्तकास नि:संशय मनेवेधकता आली आहे. लक्ष्मीबाईची देवदर्शनास स्वारी, किल्लयावरील लढाई, नंतर गावात झालेली कत्तल वगैरे प्रसंगाची वर्णने आमच्या म्हणण्याची साक्ष देतील. त्याचप्रमाणे काही कांहीं मुद्दयांच्या गोष्टीसंबधानें हवी तितकी माहिती दिलेली नाहा, ता, ४ जूनच्या कत्तलीत राणीचे बिलकुल अंग नव्हतें हें चरित्रकारानीं सप्रमाण सिद्ध केलें आहे. पण पुढे बंडखोराच्या मेळात ती कशी सामील झाली हें आमच्यामतें जितक्या विस्तृत रीतीनें सागावयाला पाहिजे होते तितके सागितलेले नाहीं. तसेच राणीनें इंग्रज सरकारास पाठविलेली पत्रे भौवतालच्या लबाड लोकानी गहाळ केली असें चरित्रकाराचे म्हणणे आहे त्यालाही बळकटसा पुरावा नाहीं. राणी पूर्वीपासून इंग्रजाना अनुकूल होती तर सर ह्यू रोज आल्याबरोबर त्यास समक्ष भटून सर्व संशयाचा निरास करण्यास तिनें मार्गेपुढे