पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ليبييلا डेॉ. भांडारकर आणि ऑनरबल रावबहादुर . १७२ वीस वर्षांचा असतोच व त्या प्रत्येकाचा चाळीस वर्षेपर्यंत जगण्याचा संभव सामान्य मृत्यूच्या प्रमाणावरून काढावा लागतो. व प्रत्येक ग्रंज्युएटास हे प्रमाण लावून सदर प्रमाणाची जर बेरीज घेतली तर सरासरीच्या हिशोबात काही चूक यावयाची नाहीं. करिता ग्रॅज्युएट लोकामधील मृत्यूचें मान आणि वीसपासून चाळीस वर्षापर्यंतच्या सामान्य लोकामधील मृत्यूचे मान याची तुलना करण्यात रा. ब. रानडे याची चूक झाली आहे असे आम्हास वाटत नाही. सरासरीचे हिशोब असेच करावे लागतात. युनिव्हार्सटीतील परीक्षेच्या अभ्यासक्रमामुळे विद्याथ्यावर फाजील ओझे पडतें ही गोष्ट डॅक्टर साहेबास कबूल आहे; परंतु डॅक्टर साहेबानी असा शेरा दिला आहे कीं, रा. ब. रानडे यानीं ती सिद्ध केली नाहीं दोधासही कबूल असलेला गोष्ट सिद्ध करावयास कशास पाहिजे हेंच आधी आम्हास समजत नाही व त्यातूनही सामान्य मृत्यूच्या प्रमाणापेक्षा ज्या अर्थी ग्रॅज्युएट लेोकामधील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे व तेही वरच्या वरच्या परीक्षा झालेल्या लोकात जास्त जास्तच वाढत जात आहे असें रा. ब. रानडे यानीं आपल्या व्याख्यानात दाखविले आहे त्या अर्थी ही गोष्ट सिद्ध केली नाही असा जो डाक्टरसाहेबाची रा. ब. रानडे याजवर आक्षेप आहे ती काही तरी दोष काढण्याकरताच घेतलेला असावा असें अनुमान होतें. परीक्षेचा अभ्यासक्रम फार्जाल अवघड आहे असे म्हणार्वे तर अकाली मेलेले लोक परीक्षेत फारसे नापास झालेले नव्हते, असेंही डॅॉ. भांडारकर यानीं एके ठिकाणी म्हटले आहे; पण ह्याचा अर्थ काय हें डॉक्टरसाहेबानीं लक्षात घेतले नसावें. जे ग्रंज्युएट अकाली मेले ते जर परीक्षेत एकेक दोनदोनदां हुकलेले नसले तर ( १ ) परीक्षा तरी सोप्या होत्या, अथवा (२) परीक्षा कठीण असून त्या उतरण्याकरिता फाजील अभ्यास करून हे लोक मेले, या दोहोपैकीं कोणतें तरी अनुमान खरें असले पाहिजे. परीक्षेचे ओझे फाजील आहे हो गेष्ट डॉक्टरसाहेबानीन कबूल केली आहे तेव्हां दुसर अनुमान खरें मानावे लागत, आणि तेच जर रा ब. रानडे यानीं दिले आहे तर त्याच्या लेखावर हो टीका डॉक्टरसाहेबांनीं का केली याचे कारण आम्हास समजत नाहीं. असो, एकंदरीत पाहता डॉक्टरसाहेबानी ज रा. ब. रानड यास प्रत्युत्तर दिले आहे तें इतके निर्बल आहे की, रा. ब, रानडे याची मुख्य विषयासबंधाची अनुमानें जास्त सयुक्तिक दिसतात असें म्हणावे लागतें. डॉ. भाडारकर याच्या विद्वतेकडे लक्ष दिले असतां रा, ब, रानडे यांच्या सिद्धातावर जितके आक्षेप काढणें शक्य असतील तितके सर्व त्याच्या लेखात येतील असे मानणें अगदी स्वाभाविक आहे; व वर सागितलेल्यापेक्षा ज्याअर्थी काहीं जास्त बलवत्तर आक्षेप त्यांनी आपल्या प्रत्युत्तरात दाखल केले नाहीत, त्याअर्थी रा ब. रानड याच्या अनुमानावर यापेक्षा विशेष महत्त्वाच्या शंका निघावयाच्या राहिल्या असतील असें आम्हांस वाटत नाही.