पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ ली० टिळकांचे केसरीतील लेख आता सरतेशेवटीं आरंभी सागितलेल्या अप्रस्तुत प्रश्नासंबधानें दोन शब्द लिहून हा लेख आटोपतीं. डॉ. भाडारकर व रा. ब. रानडे दोघेही विद्वान् आहेत, तेव्हा त्यापैकी एकानें दुस-यास नैराश्यवादी अथवा आत्मनिदक म्हणावें याचा अर्थ काय असा आमचे कित्येक वाचक प्रश्न करतील, करितां हा स्वभावदोष आह, इतकं पहिल्यानें सांगितले पाहिजे. युरोपांतून परत आल्या दिवसापासून डॉ. भांडारकर यांच्या मनाची स्थिति बरीच पालटली आहे असें त्याच्या भाषणावरून दिसून येते. आम्ही हतवीर्य आहों, कुचकामाचे आहो, आमच्या हातून काहीं पराक्रम व्हावयाचा नाही, आमचे खाणे, पिणें, हिंडणे, फिरणे लग्न करणे आदिकरून सर्व कांहीं गोष्टी इतक्या काहीं बिघडल्या आहेत कीं या सर्व बाबतति सुधारणा झाल्याखेरीज आम्हास स्वतंत्रता मिळण्याची आशा नाहीं, इतकेंच नव्हे, तर प्रजेचे सामान्य हक्क मिळण्याबद्दल खटपट अगर श्रम करणे हेही डॅक्टिरसाहेबाच्या दृष्टीनें एक मोठे पातकच आहे. * वडिलाची कीर्ति गाई ती एक मूखै ’ या तत्त्वाचा डॉक्टरसाहेबांनी अलीकडे पूर्ण अंगीकार केला आहे. आमच्या समाजांतील खरीखोटीं चित्रे लवकरच डोक्यांत भरतात व ती वारंवार समाजापुढे माडून लोकास सामाजिक सुधारणा करावयास लावणे हें आपले आदिकर्तव्य आहे अशी डॅॉक्टरसाहेबाची पूर्ण समजूत झाली आहे. आमच्या समाजात जे दोष आहेत त्याच्याच तोडीचे इंग्रज लोकात दोष आहेत, सर्वाशीं निर्दोष अशी कोणतीही समाजस्थिति नाहीं व त्यामुळे आपलें लंगडेपागळे लोक घेऊनच जी काय आपणास उद्योग करावयाचा तो केला पाहिजे, असे जर कोणी प्रतिपादन करूं लागला तर ते डॉक्टर साहेबास बिलकूल खपत नाही. व असला मनुष्य मूर्ख किंवा लुच्चा यापैकी केोणी तरी एक असावा असा त्याच्या बुद्धीचा ग्रह झाला आहे डॉ० भाडारकर हे ज्या अर्थी वर दिलेल्या गोष्टी सत्य मानतात त्या अर्थी सत्यवक्तेपणाबद्दल आपणास लोक आत्मनिंदक म्हणतात असे त्याचे मत होणें अगदी स्वाभाविक आहे; आणि त्याजबरोबर आमच्या लोकांची स्तुति करणारे गृहस्थ लबाड आहेत असाही त्याचे बोलण्याचा गर्भितार्थ आहे. डॉ. भाडारकर याचे हे मत आणि त्यातील गर्मित अर्थ ही दोन्हीही चुकीची होत असा रा. ब रानडे व मि. सयानी याचा आशय आहे आमच्यापेक्षा सामाजिक सुधारणेंत एक पाऊल मार्गे असणारीं राष्ट्र स्वतत्र आहेत व इंग्रजांच्या बरोबरीनें समाजसुधारणा ज्याच्यात आहे असे ऐरिश लोक परर्तत्र आहेत. ही गोष्ट डॉक्टरसाहेबाच्या सिद्धातास प्रतिकूल आहे. डॉक्टरसाहेब आपणांस सत्यवक्त्याच्या पंक्तीत घालून आपल्यावरचा दोषैकदृक्पणाचा आरेप ओढवू पाहतात. पण या असल्या सामाजिक आणि राजकीय विषयात सत्य म्हणजे काय आणि ते एकट्या डॅक्टिरसाहेबाच्या हातातच कसें सांपडले हें दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. व त्याचा निकाल झाल्याखेरीज सत्य कोणत्या पक्षास आहे हें सागतां येणार नाहीं. जो तो आपल्या समाजाप्रमाणें खरें