पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ लो० टिळकांचे केसरींतील लेख असे काढले आहे. आतां डॅॉ. भांडारकर असे म्हणतात कीं, रा ० ब० रानडे यांनीं १८९३ पर्यंत ग्रॅज्युएट घेऊन सरासरीनें त्यांच्यातील अकाल मृत्यूचे प्रमाण काढण्यांत जितका दोष आहे त्यापेक्षां डॉ० भांडारकर यांच्या पद्धतींत अधिक दोष आहेत असें कोणासही दिसून येईल. (१) पहिल्यानें ग्रॅज्युएट झाल्याबरोबरच केोणी मरत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. टिछू, पट वर्धन, जोशी, दिवेकर, मराठे, वैद्य, तिघे, गोखले, आगाशे, मिरजकर, बि. सि. भांडारकर, अत्रे, डॉ० आठल्ये वगैरे बरेच लोक डिग्री घेतल्याबरोबर किंवा पुढे एक दोन वर्षातच परलोकवासी झालेले आहेत. तेव्हां सामान्यतः आजपर्यंत झालेल्या ग्रंज्युएटांची संख्या घेऊन अकालमृत्यूचे जें प्रमाण निघेल तेंच डॉ० भांडारकर यांनी काढलेल्या अनुमानापेक्षां अधिक ग्राह्य मानले पाहिजे. डॅ० भांडारकर यांच्या पद्धतीवर (२) दुसरा असा आक्षेप आहे कीं, पहिल्या अठरा वर्षात म्हणजे युनिव्हर्सिटी स्थापन झाली तेव्हां पहिल्यापहिल्यानें दक्षिणी लोकांचाच कॉलेजातून फार भरणा असे. यामुळे पार्शी, गुजराथी, आणि दक्षिणी या तिन्ही जातीतील अकालमृत्यूचे बिनचूक प्रमाण काढण्यासही अठराच वर्षे घेऊन चांगलासा उपयोग व्हावयाचा नाहीं. (३) डॅॉ० भाडारकर याच्या रितींत तिसरा दोष असा आहे कीं, जे ग्रॅज्युएट चाळिशी उलटून जाऊन पुढे मरण पावले त्यांची अकालमृत्यूमध्यें निरर्थक गणना करण्यांत येतें. शिवाय स्वल्प संख्या घेऊन सरासरीचे प्रमाण बसविण्यापेक्षां मोठी संख्या घेऊन असलीं प्रमाणे काढल्यानें तीं अधिक यथार्थ व बिनचूक निघण्याचा संभव असतो. या सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजे वर सागितलेल्या त्रिदोषांनी ग्रस्त झालेल्या डॅॉ० भांडारकर यांच्या पद्धतीपेक्षां एक दोषाची रावबहादूर रानडे यांची पद्धत अधिक ग्राह्य आहे असे मानणें भाग पडतें. रा ० ब० रानडे यांची रीत स्वीकारली म्हणजे अकाल मृत्यूचीं प्रमाणे ४, ५, १० हाच घ्यावी लागतात, व ही प्रमाणे घेतलीं म्हणजे डॉ० भांडारकर याचे सिद्धान्त ज्या पायावर रचले आहेत तो पायाच अजीबात अशुद्ध व चुकीचा आहे असें सिद्ध होतें. वीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंतचे पाशीं आणि ब्राह्मण याच्यामधील सामान्य मृत्यूचे मान जवळ जवळ सारखेच आहे ही गोष्ट डॉ. भांडारकर हें नाकबूल करीत नाहीत; पण त्याचे असे म्हणणे आहे की, हें अगर दुसरे सामान्य मृत्यूचे मान मॅज्युएट लोकांस लावण्यांत रा. ब. रानडे यांनीं चूक केली आहे. कारण हीं सामान्य प्रमाणें वीस वर्षाचे जे लोक एकाकालीं हयात असतात त्यांपैकींच चाळीस वर्षापर्यंत किती जगतात हें पाहून काढली आहेत. आतां ज्याअर्थी सर्वत्र ग्रॅज्युएट एकसमयावच्छेदेंकरून वीस वर्षाचे असू शकत नाहींत त्या अर्थी त्यांच्यामधील मृत्यूच्या मानाची वरील सामान्य लोकांच्या प्रमाणांशीं तुलना करितां येणार नाहीं, डॉक्टरसाहेबांचा हा आक्षेप आम्हांस नीट कळत नाहीं हे आम्ही मोठ्या प्रांजलपणें कबूल करतो. प्रत्येक ग्रंज्युएट केव्हांना केव्हां तरी