पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डेॉ. भांडारकर आणि आनरेबल रावबहादुर रानडे १७१ वीस वर्षीतल्या आहत, हें रा. ब. रानडे यास माहित होतें. तेव्हा त्यांचा सन १८८० सालच्या पूर्वीच्या ग्रॅज्युएटाशीं सबध जेोडण्यास डॉक्टरसाहेबाची काहीं तरी चूक झालली असावी असे त्याच्या मनात आले. परंतु केवळ असल्या माहितीवर व मतावर अवलबून न राहता त्यानीं चारशे पत्रे लिहून ठिकठिकाणाहून माहिती आणविली, व सन १८६२ पासून १८९३पर्यंत आर्टस् , ली, मेडिसिन, आणि इंजिनियरिंग या चारी शाखात झालेल्या ग्रॅज्युएटापैकी अकालीं किती लोक मेले, कां मेले याची हकीगत गोळा केली. या हकीकतीवरून असे दिसून येते की, अकालीं मरण पावलेल्या ग्रॅज्युएटाचे डॉक्टरसाहेबानीं दिलेले प्रमाण चुकीचे असून सर्व शाखातील ग्रॅज्युएट घेतले तर पाशींपैकी शेकडा चार, गुजराथ्यापैकीं शैकडा ५ व दक्षिणीपैकी शेकडा १० मरण पावतात, म्हणजे गुजराथी लोकांत व पार्शी लोकात मरणाचे प्रमाण सरासरीने सारखे च पडतें, व दक्षिणी लोकात मात्र तें पाशींगुजराथ्यापेक्षा जवळ जवळ दुपटॉन जास्त आहे. रा. ब, रानडे याचे हे आकडे खरे धरले तर डॉ. भाडारकर याचा सिद्धान्त व त्यावर रचलली समाजसुधारणेची इमारत आणि उपदेश ही दोन्ही ढासळून जातात; व दक्षिणी लोकामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक का असावे यास दुसरें काहीं तरी कारण लावावे लागतें. हे कारण दारिद्रय होय असे रा. ब. रानडे यानीं प्रतिपादन केले होते व त्यानी अकाली मेलेल्या सुमारे पन्नास साठ ग्रॅज्युएटाची जी माहिती मिळवली आहे त्यावरून हेंच अनुमान कायम होते. पार्शी आणि ब्राह्मण या दोन्ही जातीतील सामान्य लोकांच्या मृत्यूचे जे मान खानसुमारीच्या रिपोर्टौत दिले आहे तेही समसमान असल्यामुळे रा. ब. रानडे याच्या सिद्धान्तास विशेष पुष्टीकरण येतें. साराश, डॉ. भाडारकर हे पाशीं एकीकडे व हिंदु एकीकडे असे दोन वर्ग करून एका वर्गातील लोक आहार-विहार-विवाहादि भदामुळे अकालीं जास्त मरतात असें म्हणत होतें; व रा. ब. रानडे याचे असे मत होतें कीं, हा भेद निर्मूल असून पाशी आणि गुजराथी याच्यामध्ये ज्याअर्थों मृत्यूचें मान एकसारखेच आहे त्याअर्थी दक्षिणी लोकातील अकालीं होणाच्या जास्त मृत्यूचे दुसरे काहीं तरी कारण असले पाहिजे, व ते दारिद्रयाखेरीज दुसरे कोणतेही दिसत नाहीं. आता यावर डॉ. भाडारकर यानी जे प्रत्युत्तर दिले आहे त्याचा विचार करूं. पार्शी लोकात व्यायाम आणि विवाह या संबधाच्या चालीरीती गेल्या दहापंधरा वर्षातील आहेत या रा. ब. रानडे याच्या आक्षपास डॉ. भांडारकर यांनी काही उत्तर दिलेले नाहीं. डॉ. भांडारकर यानी सन १८६२ पासून सन १८८० पर्यंत अठरा वर्षातील ग्रॅज्युएटांची“आणि तीही फक्त बी. ए. चीच - सख्या घेतली होती, व त्यामुळे त्यानीं काढलले मृत्यूचे प्रमाण १९॥२० आणि २२ असे निघालें होते. रा. ब. रानडे यांनी १८६२ पासून १८९३ पर्यंत बी. ए., एम. ए , एल. सी. ई. एल्. एम्. एस. एलू. एलू, बी आदिकरून सर्व ग्रॅज्युएट घेऊन त्यांच्यतील अकाल मृत्यूचे प्रमाण पाशी ४, गुजराथी ५, आणि दक्षिणी १०