पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ लो० टिळकांचे केसरींतील लेख आयुष्याची दोरी बरीच ढिली व्हावी; व कोणत्याही कारणानें विषमज्वरासारखें दुखणें आल्यास त्यांतच त्यांचा अंत व्हावा यांत कांहीं नवल नाहीं. आमच्यामतें भगवानदास-पुरुषोत्तमदास-स्कॉलरशिप मिळविलल्या १५ एम्. ए. गृहस्थांपैकीं आजपर्यंत दहा गृहस्थ मेले ह्याचेही हेंच कारण होय. संस्कृतची स्कॉलरशिप बहुतकरून दक्षिणी लोकानींच मिळविली आहे; व त्यापैकीं बहुतेकास जगन्नाथ-शंकरशेटची स्कॉलरशिप मिळालेली होती या स्कॉलरशिपा मिळविण्याकरितां गरीब विद्यार्थी जितकी मेहनत करतात तितकी सुखवस्तु गृहस्थांची मुले करीत नाहींत तेव्हा संस्कृताची स्कॉलरशिप पहिल्यापासून मिळवून जे गरीब विद्यार्थी एम् ए पर्यंत गेले व ज्यांनीं भगवानदास-पुरुषोत्तमदास स्कॉलरशिप मिळविली त्यास अकालीं मृत्यु यावा ह्यांत कांही विशेष आश्वर्य नाहीं. आता दरिद्री लोकानीं अशा रीतीनें वरिष्ठ शिक्षणाची हाव का धरावी असा केोणी प्रश्न करतील, तर त्यास उत्तर इतकेंच आहे कीं, दक्षिणेतील ब्राह्मणांस शिक्षणाखेरीज इतर धेदे फारसे अद्याप प्रिय वाटू लागले नाहीत व एका अर्थी इतर धंद्यास अवश्य लागणारे गुणही यांच्यामध्यें अद्याप कमी आहेत. दारिद्य आणि विद्याव्यासंग यांचे ब्राह्मणाशी आज हजारों वर्षाचे साहचर्य आहे, आणि हुशारी व मेहनत गरीब विद्याथ्यांच्या अंगीं जितकी दिसून येते तितकी सुखवस्तु विद्याथ्योत दिसून येत नाही. असा अनुभव आहे करितां या वर्गातील विद्याध्याँस विशिष्ट शिक्षणापासून पराङ्मुख न करिता त्याच्या मार्गात असलेल्या अडचणी काढून टाकून त्यास परंपरागत आलेला धेदा करण्यासच उत्तेजन द्यावे ह्यात एकदर राष्ट्राचे हित आहे. विद्याव्यासंग कायम ठेवून नवीन शोध अगर ग्रंथ करण्याचे कामही याच वर्गातील विद्याथ्यांकडून आज शकडी वर्षे होत आले आहे व पुढे होण्याचा संभव आहे. यासाठी यांच्या अकाली घडणाच्या मृत्यूची जी कारणे असतील तीं जेणेकरून कमी होतील असे उपाय केले पाहिजेत. यापैकीं (१) पहिला उपाय सरकारच्या हातांत आहे. म्हणजे त्यानी गरीब ब्राह्मण विद्याथ्याँस पगारी व नादारी विद्याथ्यांच्या जागा होईल तितक्या कमी देण्या ा जी ठराव केला आहे तो बदलला पाहिजे (२) दुसरा उपाय युनिव्हर्सिटीचा शिक्षणक्रम हल्लींच्या पेक्षा अधिक सोपा करणे हा होय. सर्व विषय परीक्षा पास होते वेळीच विद्याथ्यांस अवगत असले पाहिजेत अशा समजुतीनें एकंदर परीक्षा कठिण करण्यात काहीं हृशील नाहीं. परीक्षेस १० विषय असले; व त्यापैकी विद्याथ्यास ५ चांगले, ४ मध्यम आणि एक सुमाराचाच येत असला, तर त्या एका विषयाकरिता त्यास वारकरी बनविणें अगदी अप्रशस्त आहे. बी. ए.ची परीक्षाही कांहीं विद्वतेची सीमा नव्हे. साधारण रीत्या सुशिक्षित मनुष्यास जें ज्ञान असणें अवश्य आहे तितकें ज्यास मिळालें आहे त्यास बी.ए. होता यावे. कोणत्याही एका विशिष्ट विषयाचा व्यासंग करून