पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमचे आधुनिक विद्वान् अकालीं कां मरतात ? १६५ सयुक्तिक व यथार्थ आहे असें आम्हांस वाटतें. ग्रॅज्युएट लोकांच्या वयाचे मान सरासरीं २० पासून ४० सापर्यंत धरितां येईल, या वयाच्या मुदतीत एकंदर समाजांत मृत्यूचे मान हजारी ३० आहे असें सन १८९२ सालच्या खानेसुमारीच्या रिपोर्टावरून आढळून येतें. या मानानें पाहतां पार्शी व गुजराथी ग्रॅज्युएटाच्या मृत्यूचे मान सामान्य मानापेक्षां दुप्पट, आणि दक्षिणी ग्रॅज्युएट लोकाः च्या तिपटीहून अधिक आहे असें दिसून येतें. सामान्य लोकाप्रमाणें खाण्यापिण्याची विशेष भ्रात नसतां एकंदर ग्रंज्युएट लोकांतच मृत्यूचे जर अधिक मान आहे तर हा परिणाम शिक्षणाच्या फाजील ओझ्यानें आणि दहशतीनें होतो असें म्हणावें लागतें. मृत्यूच्या सामान्य मानासंबंधानें हा विचार झाला. आतां मराठी किंवा दक्षिणी लोकात सामान्य ग्रॅज्युएट लोकांपेक्षांही जें अधिक मृत्यूचे मान आढळतें त्याचे कारण काय आहे ते पाहूं. एकंदर लोकांपेक्षां ग्रॅज्युएट अधिक मरतात व ग्रॅज्युएटांतही दक्षिणी अधिक लवकर मरतात हें आकडयांनाँच सिद्ध झाले आहे. दक्षिणी ग्रॅज्युएट मंडळींत विशेष भरणा ब्राह्मण लोकांचाच आहे, आणि ब्राह्मण म्हणजे दरिद्री हें सर्वश्रुतच आहे. करितां दरिद्रावस्थेत विद्याभ्यास करणाच्या लोकांस युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम अकालमृत्युप्रद होतो असें सकृद्दर्शनी दिसून येतें, व थोड्या विचारांतीं दक्षिणी ग्रॅज्युएटांत मृत्यूचे मान अधिक असण्याचे हेंच मुख्य कारण आहे अशी बहुतकाची खात्री होईल. ब्राह्मणांतही सुखवस्तु गृहस्थाच्या मुलापेक्षा गरीबांची मुलें अधिक हुषार व मेहनती असतात ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. कोकणातील किती गरीब मुलें वाराने किंवा कोणी तरी आप्त अगर स्नेही यांच्या मदतीनें उदरनिर्वाह करून बी, ए, एम, ए, पर्यंत मजल मारतात हें येथे नवीन सांगावयास पाहिजे असें नाही. डॉ; भाडारकर यांसही ही स्थिति अवगत आहे; परंतु तिकडे थोडेंसें दुर्लक्ष करून ** लग्नात पैसे खर्च करावयास सांपडतात तर विद्याभ्यासासाठीं का खर्च करूं नये ” अशा रीतीनें सदर वर्गातील लोकाचा त्यांनीं थेोडासा उपहास केला होता, रा. ब. रानडे याच्या मतें हा उपहास अगदी गैरवाजवी आहे. असल्या गरीब विद्याथ्यास मुली देणारे गृहस्थच लग्नाचा सर्व खर्च सोसून शिवाय त्यांच्या विद्याभ्यासाकरिताही कांहीं मदत करतात हें कदाचित् डॉक्टरसाहेबांच्या लक्षांत राहिले नसेल. असो, अकाली मेलेल्या कै० वा. आगाशे, आपटे, गोखले, वैद्य, बाळ, टुछु, जेोशी, क्षीरसागर, मिरजकर, वगैरे सुमारें पन्नास लोकाच्या गृहस्थितीची चौकशी करिता असे आढळून येतें कीं, यापैकी बहुतेक लोक अगदी गरीब स्थितांतून वाढले असून त्यांचा विद्याभ्यास वारांनीं, स्नेहांच्या मदतीनें किंवा स्कॉलरशिपर्ने झालेला आहे. इतकी दगदग व त्रास सोसून युनिव्हर्सिटीच्या सर्व परीक्षा जे पास होतात त्यांच्या