पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमचे आधुनिक विद्वान् अकालीं कां मरतात ? १६७ त्यांत लौकिक मिळविणें हें पुढील काम आहे. त्याचा सामान्य परीक्षेशीं कांहीं संबंध असू नये; परंतु शिक्षणक्रम जरी अशा रीतीनें सुधारला तरी विद्याथ्यांच्या हातांतच अकालमृत्युहरणाचे जे उपाय आहेत ते त्यांनीं अवश्य केले पाहिजेत. यापैकीं मुख्य उपाय म्हटला म्हणजे (३) ब्रह्मचर्य होय. विद्या पुरी हेोईपर्यंत तरी हें व्रत विद्याथ्र्यानीं अवश्य चालविलें पाहिजे.इंग्रजी राज्य होण्यापूर्वी आमच्या देशांत जे विद्वान् शास्री व पंडित झाले त्यांचा यासंबंधानें मोठा कटाक्ष असे; वें एकंदरीत हल्लीच्या गरीब स्थितीत तर अशा प्रकारच्या व्रताची फार जरूर आहे. रा० ब ० रानडे यानी यापेक्षा काही जास्त सागितलें नाहीं; तथापि आम्ही असे म्हणतों की, आजन्म किंवा दीर्घकाल ब्रह्मचर्य पाळणारे जर आमच्यामध्ये काहीं विद्वान् लोक निघतील तर त्यापासून त्याचे व राष्ट्राचे पुष्कळच हित होईल. असे; याप्रमाणे महाराष्ट्र-पदवीधर-विद्वानांच्या अकालिक मृत्यूच्या कारणांचा विचार झाल्यावर आधुनिक विद्वान् विद्याव्यासंगाचे काम परिक्षा संपल्यावर पुढे कोणत्या रीतीने चालवितात याची थोडीशी ह्ककित सागितली ती हकीकत त्यास आलेल्या जबाबावरून व विशेषत: नेटिव्ह प्रेसचे रिपोर्टर यानी केलेल्या रजिस्टर झालेल्या पुस्तकाच्या यादीवरून घेतली आहे. त्यामुळे या संबंधीं सर्व अनुमान ग्रॅज्युएट लोकानीं लिहिलेल्या पुस्तकावरूनच केले आहे हें उघड आहे. ही रीत कित्येकाच्या मते बरोबर नाही; कारण त्यांच्या मते पुष्कळ ग्रॅज्युएट विद्याव्यासंगात निमग्न असतील, परंतु ग्रंथ लिहिण्याची त्यास इच्छा अगर सवड नसेल. हें म्हणणे काही अंशीं बरोबर आहे. प्रो. जिन्सीवाले यांचे नाव ग्रंथकाराच्या यादींत नसले तरी त्यानीं आपला विद्याव्यासंग कायम राखिला नाही असें केोणीही म्हणणार नाहीं. परतु आम्हास जें अनुमान काढाआहे तें व्यक्ति संबंधाने नसून सामान्य वर्गाबद्दलच आहे, ही गोष्ट जर वरील आक्षेपकार नीट लक्षात आणतील तर ग्रंथप्रकाशना खेरीज सामान्य ग्रॅज्युएट वर्गाच्या परीक्षेोत्तर विद्याव्यासंगाचे दुसरे कोणतेही चागलें द्योतक चिन्ह नाहीं असें यांस आढळून येईल.गेल्या पंचवीस वर्षातील देशी भाषातील ग्रंथाचे सरकारी वार्षिक रिपोर्ट रा. ब. रानडे यांनीं तपासले आहेत. त्या रिपोर्टावरून असें अनुमान निघतें कीं ग्रंथकर्तृत्वाच्या कामीं दक्षिणी ग्रॅज्युएट लोकानी जितकें काम केले आहे त्यापेक्षां गुजराथी ग्रॅज्युएट मंडळींचे काम पुष्कळच कमी आह व पाशीचा नंबर तर दोहोंच्याही खाली लागतो. मराठी ग्रॅज्युएट मंडळीत डॉ. भांडारकर, कुंटेद्वय, पंडित ,तेलंग, चिपळूणकर, आपटे, वैद्य वगैरे पुष्कळ गृहस्थ आहेत. गुजराथी लोकांत त्रिवेदी, केोठारे, देसाई, द्विवेदी, शहा, गुजर, त्रिपाठी वगरे बरीच नांवें आहेत; परंतु दक्षिणी लोकांपेक्षा त्यांची संख्या