पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्वेवाह. & 3 a दरवर्षी उडतो हें आपण प्रत्यक्ष पाहतों. तसेच एवढा विद्याप्रसार झाला असतां देशोन्नतीवर व्याख्यानं देणारे पासरीभर निपजत असतां माणसाची न्यून्यता खरोखर असू नये, पण स्वार्थपरायणतारूप राहूनें आमच्या सर्व उदासवृत्तीस ग्रासून टाकिलें आहे त्यामुळे आम्हाला असे हताश व्हार्वे लागते. पैसे आहेत ते कुटुंबपोषण व चैनीबाजी ह्यांत उडून जातात; आणि पुरुष आहेत तेवढयांना बायकाः पेोरें संभाळतांच पुरेवाट होते; तेव्हां त्याच्या हातून देशहिताचा उद्येोग ता काय होणार ? हिंदुस्थानांत दरसाल प्रजावृद्धि होते तेव्हा तेथे संपतिही वाढत असली पाहिजे, असें इंग्रज लोक म्हणतात. पण त्या बेट्याना हे कुठं माहीत आहे की, ह्या प्रजावृद्धीच्या पायींच आमच्या सर्व संपत्तीचे, उमेदीचे, बुद्धीचे, नीतीचे आणि धर्माचे मातेरें होत आहे ? मोक्षमुल्लर भट्टांच्या विद्वतेची वाखाणणी करणारे येथे पुष्कळ आहेत; पण मोक्षमुल्लरास अविवाहित राहिल्यानच एवढी विद्वत्ता व एवढे ग्रंथलेखन शक्य झालें हे एकाच्याही लक्षात येत नाही. मिल्ल -स्पेन्सरचीं बुके वाचून पोपटपंची कुरणें सेोपे आहे; पण त्याच्यासारखे दीर्घकाल किंवा यावजीव ब्रह्मचेर्य पाळून अहोरात्र शास्रव्यासंग करण्याला मात्र केोणाचेही धैर्य होत नाहीं ! कोणत्याही सुधारलेल्या देशाचा इतिहास पाहा, मोठ्या उमेदीचीं व धाडसाचीं कार्मे केली ती अशा पाशमुक्त पुरुषानीच केली व म्हणूनच त्या त्या देशाची भरभराट झाली. संसारशकटाची स्री, पुरुष ही दोन्ही चाके खरी, व चांगल्या स्रियेपासून पुष्कळ वेळां मदत होते हेंही खरे; पण एक तर चागल्या स्त्रिया दुर्मिळ व दुसरें कांही प्रसंगीं दुचाकी खटाच्यापेक्षा चलद धावणारी एकचाकी गाडी जशी बरी, तसेच कित्येक कामे मनुष्य एकटा असेल तरच होऊं शकतात. आणि देशाची, समाजाची व मानव जातीची उन्नति अशाच कामावर अवलंबून असते. घरीं बायकेो रडत आहे असे आठवताच समरागणी मोठमोठ्याचेदेखील धैर्य गळेल. पोराचे लोढणे मार्गे असते तर गुरुत्वाकर्षणाचे, प्रकाशाचे व गणिताचे अनेक शोध न्यूटनच्या हातून झाले नसते ससारपाश गळ्यांत असता तर बुद्ध-खिस्त-प्रेषितांनीं धर्मप्रसारार्थ पृथ्वीपर्यटण केले नसतें. इग्रज लोकाना व्यापाराचेद्वार आपलें समुद्रवलयांकित राज्य स्थापिता आपले नसते; ते मातृ भूमीच्या उध्दारासाठीं हजारों देशजननीभक्तानीं प्राण दिले ते दिले नसते. ह्यावचनावरून प्रस्तुत विषयाला आम्हीं इतके का महत्त्व दिले हे वाचकांच्या बहुतेक लक्षात आलेच असेल. तथापि बालब्रह्मचारी किंवा विधुरब्रह्मचारी असें पुष्कळ लोक आमच्यांत निपजूं लागल्यास किती फायदे होणार आहेत ह्याचे थोडें दिद्भर्शन करणें जरूर आहे. हिंदुधर्मशास्राप्रमाणें विवाहाची मुळींच जरूर नाही हे मार्गे सागितलें; तसेंच प्राचीन व अर्वाचीन वैद्यशास्त्राच्या दृष्टीनेंही त्याची आवश्यकता नाहीं. हे अनेक विद्वानांनीं सप्रमाण सिद्ध केल आहे. कोणास सशय असेल तर त्याने डॉ. くく