पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ लो० टिळकांचे केसरींतील लेख पूर्वी फार सुधारलेले होतों म्हणून डौल मारणारांनी आपल्या प्राचीन वैभवाच्या आठवणीनेंच संतोष मानून न घेतां, तें गेलें कसे व पुनः कशार्ने आणतां येईल ह्याविषयीं विचार करणें अधिक श्रेयस्कर होईल. जन्मदरिद्रापेक्षां वडिलार्जित संपात उधळून कफल्लक बनलेला गर्भश्रीमंत अधिक निंदाई आहे हें जसें सर्वोना कबूल आहे, तसेंच आपला पूर्वीचा मोठेपणा व हल्लींची निकृष्ठावस्था पाहून आपणांस अत्यंत लज्जा व उद्वेग उत्पन्न झाला पाहिजे. असो. आपल्या पूर्वजाचे वैभव प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर त्याचेच अनुकरण केले पाहिजे, ही गोष्ट निर्विवाद आहे. ज्या गुणांच्या योगार्ने हा हिंदुस्थानदेश प्राचीनकाळीं अखिल जगतावर ललामभूत होऊन बसला होता, ज्याच्या योगार्ने ग्रीस, रोम वगैरे प्राचीन राष्ट्रांची आध्यात्मिक व आधिभौतिक उन्नति झाली होती, व ज्याच्या योगाने अर्वाचीनकाळीं युरोप व अमेरिकाखडातील देश सुधारणेच्या व स्वतंत्रतेच्या अत्युच्च शिखरावर जाऊन बसलेले आढळतात, त्या गुणांचे संपादन करण्याखेरीज आपल्या देशाचे पुनरुजीवन करण्यास दुसरा मार्ग नाहीं. अस्वार्थपरता, परमार्थदृष्टि, मानसिक औदार्य, आत्मसंयमन वगैरे गुण इंग्रज लोकांत जागृत आहेत म्हणूनच त्याना एवढे वैभव प्राप्त झाले आहे; तेव्हा त्याचा कित्ता गिरवावयाचा म्हणजे जाकीट, पाटलीन तेवढी न घेतां वरील गुण शिकले पाहिजेत, व तें करण्याला आम्ही वर सागितलेला एकच उपाय आहे. देशाची उन्नति करणे असेल तर अगेोदर आत्मसंयमन करण्यास शिकून स्वतःची मानसिक उन्नति केली पाहिजे; आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य परत मिळवावयाचे असेल तर आधी कुटुंबदास्यांतून पुष्कळ लोकानीं आपणांस मुक्त करून घेतलें पाहिजे. कोणींच लग्न करूं नये असें आम्ही म्हणत नाहीं. तसे म्हणणें वेडेपणाचे होईल व तसें घडणेही अशक्य आहे; परंतु विवाहारावरील हल्लींची आसक्ति कमी झाली पाहिजे. आजन्म ब्रह्मचर्यं पाळवलें नाहीं तरी निदान बिजवरांचे पुनर्विवाह बंद केले पाहिजेत; आणि येणेकरून तरी संसारपाशांतून मोकळे असे हजारों पुरुष देशकार्यासाठीं तनमनधन अर्पण करण्यास तयार झाले पाहिजेत. हल्लीं कोणतेंही देशहिताचे काम हातीं घ्यावयाला दोन मोठ्या अडचणी येतात; एक द्रव्याची व दुसरी माणसाची. राष्ट्रीय सभा सर्वांना हवी, पण फंड देण्याला लोक तयार नाहीत; आणि ह्यूमसाहेबाप्रमाणें तत्प्रीत्यर्थ येथे रात्रंदिवस झटणारे किंवा विलायतेस, आपली दाद लावण्याकरितां, जाण्याचे धैर्य करणारे पुरुष नाहीत अशी कुरकुर ऐकू येते. व्यापार, कारखान, उद्योग वाढले पाहिजेत खरें, पण त्याला भांडवल नाहीं व श्रम करणारे लोकही नाहींत, सामाजिक व धार्मिक सुधारणांचीही तीच रडकथा; तेव्हां द्रव्यबल आणि मनुष्यबळ ह्यांची जी आम्हांस एवढी वाण पडतें त्याचे कारण काय ? आमच्याजवळ मुळींच द्रव्य नाहीं. दारूखालीं, चैनीबाजीखालीं, व रिकाम्या खर्चाखालीं लाखौं रुपयांचा फन्ना